सरकारने राजस्थानमध्ये १८ हजार लिटर बनावटी खाद्यतेल ताब्यात घेतले असल्याची माहिती भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने [Fassi] त्यांच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर केली आहे. सर्व प्रसिद्ध ब्रॅण्डचे बनावटी खाद्यतेल अजमेरच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने जप्त केले असल्याची ती पोस्ट होती.

“विविध प्रसिद्ध ब्रॅण्ड्सची डुप्लिकेट लेबले वापरून बनावट आणि भेसळयुक्त खाद्यतेल तयार केले जात असून, उत्पादनचे चुकीचे ब्रॅण्डिंग केले जात आहे,” असे वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

अशा भेसळयुक्त आणि बनावटी खाद्यतेलाचा आहारात समावेश केल्याने, त्याचा आपल्या शरीर आणि आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो याची माहिती इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सुदीप खन्ना यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. भेसळयुक्त खाद्यतेल हे सामान्यतः निकृष्ट दर्जाचे तेल आणि टार्गेट तेल अशा दोन घातक किंवा खाण्यालायक नसणाऱ्या घटकांनी एकत्र करून बनवले जाते.

हेही वाचा : cinnamon skincare : चेहऱ्यावरील पिंपल्स घालविण्यासाठी ‘दालचिनी’ ठरेल गुणकारी? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

भेसळ करण्यासाठी निकृष्ट दर्जाचे पाम किंवा सोयाबीन तेल हे उच्च दर्जाच्या ऑलिव्ह किंवा अॅव्होकॅडो तेलांमध्ये मिसळले जाते.

तेलाच्या भेसळीची अजून एक सामान्य पद्धत म्हणजे कृत्रिम रंग आणि फ्लेवरिंग ही आहे.

“काही भेसळ पद्धतींमध्ये जुन्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामध्ये जुन्या आणि खराब तेलांवर पुन्हा प्रक्रिया करून, त्यांना गंध देऊन, त्याचा निकृष्ट दर्जा लपविण्याचा प्रयत्न केला जातो. ही भेसळ ग्राहकांची केवळ फसवणूकच करीत नाही, तर खऱ्या ब्रॅण्ड्समधील पोषक फायदे आणि सुरक्षिततादेखील कमी करते,” असे डॉक्टर खन्ना यांनी सांगितले आहे.

भेसळयुक्त नकली तेलांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? [How can fake cooking oils affect health?]

  • भेसळयुक्त तेलाचे सेवन केल्याने आरोग्यावर प्रचंड घातक असे परिणाम होऊ शकत असल्याचे डॉक्टर खन्ना यांनी स्पष्ट केले आहे.
  • अशा बनावटी तेलांमध्ये अनेकदा ट्रान्स फॅट्ससारखे अतिशय घातक पदार्थ उपलब्ध असतात; जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार, लठ्ठपणा व टाईप २ मधुमेह यांसारख्या मोठ्या प्रमाणात गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात.
  • या भेसळयुक्त तेलांमध्ये जड धातू, कीटकनाशकांचे घटक किंवा औद्योगिक रसायनांसारख्या अनेक हानिकारक व विषारी बाबी असू शकतात; ज्यामुळे यकृत व किडनीचे नुकसान होणे, न्यूरोलॉजिकल विकार, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात.
  • बनावटी तेलांमधील अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्सच्या कमतरतेमुळे सेल्युलर इंटिग्रिटीमधील समतोल राखण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच, जळजळ कमी करणाऱ्या आणि चयापचय क्रियांना मदत करणाऱ्या पोषक घटकांपासून शरीर वंचित राहते.

हेही वाचा : सफरचंदाचा रस दारू इतकाच घातक असतो? काय सांगतात तज्ज्ञ एकदा घ्या समजून….

अशा तेलांचे दीर्घकाळ सेवन केल्यास अनेक दीर्घकालीन गंभीर आजारांच्या समस्या लोकांमध्ये निर्माण होऊ शकतात.

बनावटी खाद्यतेलाच्या सेवनाचा दुष्परिणाम हा केवळ व्यक्तीच्या आरोग्यावरच नाही, तर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बाबींवरही होत असतो, असेही डॉक्टर खन्ना म्हणतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना या भेसळयुक्त तेलांमुळे उदभवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्याच्या दृष्टीने अधिक चिंता वाटू शकते, असेही ते म्हणतात.

“आर्थिकदृष्ट्या बनावटी तेलांमुळे ग्राहकांचा ब्रॅण्डेड तेलांवरील विश्वास कमी होऊन, त्या ब्रॅण्ड्सचे नाव खराब होते आणि त्यामुळे स्वाभाविकत: त्या खऱ्या उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे, तर अशा खोट्या उत्पादनांमुळे बाजारातील उत्पादने निवडताना ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तसेच, उत्पादनांवर लक्ष ठेवणाऱ्या नियामक संस्थांनादेखील अशा खोट्या उत्पादनांचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यात अडथळा निर्माण होतो,” असेही डॉक्टर खन्ना यांचे मत आहे.

बनावटी तेल कसे ओळखावे? [How can you identify fake oils?]

  • बनावटी तेल ओळखण्यासाठी आपल्याला रसायन, सेन्सरी आणि तांत्रिक पद्धतींची आवश्यकता असते. भेसळयुक्त तेल ओळखण्यासाठी खऱ्या तेलापेक्षा खोट्या तेलातील चवीचा वेगळेपणा, रंग किंवा वास तपासणे गरजेचे असते, असे डॉक्टर खन्ना म्हणतात.
  • फॅटी अॅसिड रचनेचा अभ्यास आणि क्रोमॅटोग्राफीद्वारे खाद्यतेलामधील भेसळयुक्त किंवा खाण्यासाठी योग्य नसलेल्या घटकांचा शोध घेता येऊ शकतो. शुद्ध खाद्यतेलांमध्ये काही विशिष्ट मार्कर किंवा खास प्रोफाइल्स असतात; ज्यांमुळे तेलाच्या शुद्धतेची तपासणी ही प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांमार्फत होऊ शकते.
  • ग्राहकदेखील तेलाच्या शुद्धतेची माहिती ही प्रतिष्ठित ब्रॅण्ड्सनी दिलेल्या ट्रेसेबिलिटी सिस्टीमद्वारे, क्यूआर कोडमार्फत [QR code] वा मान्यताप्राप्त अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे मिळवून, त्या आधारेही शुद्धतेची तपासणी करू शकतात.
  • खूप स्वस्त किमतीचे उत्पादन, उत्पादनावर लेबल योग्य पद्धतीने न लावणे यांसारख्या गोष्टींबद्दल तेलांच्या चिन्हांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून, त्यांना योग्य शिक्षण दिल्यानेदेखील ग्राहकांना बनावटी उत्पादने ओळखण्यास मदत होऊ शकते.

Story img Loader