Jaundice Symptoms Treatment Reasons: मागील काही दिवसांमध्ये मनोरंजन सृष्टीतील दोन कलाकरांना कावीळमुळे आपला जीव गमवावा लागला. लोकप्रिय अभिनेत्री अमनदीप सोही व चित्रपट निर्माते सूर्या किरण यांचे कमी वयातच निधन होण्यामागे कावीळ हा रोग कारणीभूत असल्याचे अहवालांमध्ये दिसून आले आहे. या लागोपाठ समोर आलेल्या प्रकरणांमुळे साहजिकच अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कावीळ हा रोग साथीच्या दरम्यान वेगाने पसरतो पण हा काही उपाचारच उपलब्ध नसलेला आजार नाही त्यामुळे कावीळमुळे निधन झाल्याचे ऐकून आधी अनेकांना धक्का बसू शकतो. पण सध्याची ही दोन प्रकरणे पाहता आपल्याला कावीळ या आजाराच्या तीव्रतेविषयी तसेच लक्षणे, उपचार व कारणांविषयी सुद्धा ठाऊक असणे आवश्यक आहे. आज आपण जगप्रसिद्ध ज्येष्ठ जठरांत्र शल्यचिकित्सक डॉ. अविनाश सुपे यांनी लोकप्रभाच्या कावीळ या रोगाविषयी सविस्तर जाणून घेऊया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काविळीवर झाडपाल्याचे औषध कामी येते का?
डॉ. सुपे सांगतात की, कावीळ झाल्याचे समजल्यावर घरगुती औषधे घेऊन ती बरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. वास्तविक असे करणे धोक्याचे असते. कारण काविळीचे वेगवेगळे प्रकार असतात. ते नीट समजून घेऊन औषधोपचार होणे गरजेचे असते. कावीळ झाली आहे किंवा होते आहे किंवा नुसता काविळीचा संशय जरी आला तरी लोक झाडपाल्याचं औषध देणाऱ्याकडे धाव घेतात, मग तो पाल्याचा रस असो, खायच्या पानातून द्यायचे काही औषध असो, चुन्याच्या पाण्यात हात टाकून कावीळ उतरवून पिवळे करणे असो किंवा कुण्या हकिमाकडे जाऊन डोक्यावर काही झाडून घेऊन कावीळ उतरवणे असो. आपल्याकडे अॅलोपथीमध्ये काहीही औषध नाही, हा समज वा गैरसमज अनेकांच्या मनात खोल रुजला आहे.
कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणेदेखील अनेक असतात आणि या कारणांवरूनच काविळीची उपचारपद्धती ठरवली जाते.
कावीळ म्हणजेच डोळ्याचा पिवळेपणा. त्यामुळे याच्या मुख्य लक्षणांमध्ये डोळे, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलटय़ा होणे इ. प्राथमिक लक्षणे दिसून येतात.
काविळीचे प्रकार कोणते? (Types Of Jaundice)
१) जंतुसंसर्गामुळे होणारी कावीळ- ज्याला इनफेक्टिव्ह हेपेटायटिस (Infective Hepatitis) म्हटले जाते.हिपेटायटिस = म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्ग (Virus) – अतिसूक्ष्मजिवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते.
२) हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतालक्षणे पाहून व रक्ततपासणी करून या काविळीचे निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णाला थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटिस ई होतो.
३) हिपेटायटिस बी, सी – हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरोसिस (Cirrhosis) होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच काविळीचे योग्य निदान करणे आवश्यक असते.
काविळ का होते? (Jaundice Causes)
१) दारूमुळे होणारी कावीळ: जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये यकृताला सूज येणे, पोटात पाणी होणे, सतत आजारी वाटणे अर्थात डोळे पिवळे होणे ही लक्षणं दिसतात. रक्ततपासणी करून या काविळीचे निदान करता येते. या काविळीमध्ये शेवटी यकृत सिरोसिस होते, म्हणजे यकृतच छोटे होते. सर्व यकृताच्या पेशी जाऊन फायबरचे धागे राहतात. त्यामुळे यकृताचे काम एकदम कमी प्रमाणात चालते व रुग्ण भ्रमिष्ट होऊ शकतो, बेशुद्ध होऊ शकतो. दारूमुळे यकृत खराब होऊन अनेक बळी जातात.
२) औषधांमुळे कावीळ: औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. उदा. टीबीवरील काही औषधं -(Rifampicin, Isoniazide), कर्करोग, मधुमेहावरील काही औषधे, एड्सवरील काही औषधे, काही वेदनाशामक, काही कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे चालू केल्यावर नियमित लक्ष द्यावे. विशिष्ट रक्ततपासणी करून घेत राहावी म्हणजे कावीळ लवकर लक्षात येते.
३) अवरोधक कावीळ: पित्ताशयाच्या नळीतील पित्ताच्या खड्याने किंवा स्वादुपिंडाला कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये काविळीबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते. अवरोधक कावीळचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. यावर उपाय हा दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे करावा लागतो.
४) काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात व कावीळ होते. उदा. हेमोलॅटिक जॉण्डीस (Hemolytic Jaundice) आजार यात रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते. ऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder) स्वत:च्या प्रतिकार शक्तीने झालेले आजार किंवा कावीळ
Congenital, यात जन्मजात यकृतातील दोषामुळे कावीळ होऊ शकते.
काविळीचे निदान कसे होते? (How To Test Jaundice)
१) रुग्णाची नीट तपासणी केली जाते. यकृताला किती सूज आहे, हे पाहिले जाते.
२) रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते. तिची तीव्रता कळते.
३) यूएसजी (USG) सोनोग्राफी करून – लीवरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तानलिका इ. पाहिले जाते. यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे हे या तपासणीतून कळते.
काविळीवर उपचार काय (Jaundice Treatment)
जंतुसंसर्गामुळे, प्रदूषित पाण्यामुळे : होणाऱ्या काविळीमध्ये हेपाटायटीस ए/ई वर खालील उपचार करावे.
१) रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा.
२) हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अॅक्टिव्ह असेल तर अॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते.
३) आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद तज्ज्ञांना विचारून सल्ला घ्यावा.
४) कावीळ झाली असता मद्यपान करू नये.
५) अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
काविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण लक्षात ठेवा या सगळ्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायलाच हवे.