Colon Cancer Symptoms: जगातील प्रसिद्ध आणि दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे निधन झाले आहे. पेले दीर्घकाळापासून कोलन कॅन्सर या आजाराने त्रस्त होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार अलीकडेच पेले यांच्यावर केमोथेरपी देखील करण्यात आली होती. परंतु त्यामुळे त्यांना फारसा दिलासा मिळत नाही. या आजारामुळे त्यांचे अवयव देखील काम करणे बंद केले होते. जाणून घ्या कोलन कॅन्सर या आजाराची लक्षणे आणि उपचार..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलन कॅन्सर किंवा कोलोरेक्टल कॅन्सरमुळे पेले यांच्या किडनी आणि हृदय खराब झाले होते. कोलोरेक्टल कॅन्सर आपल्या कोलन किंवा गुदाशयात होतो. याला रेक्टल कॅन्सर असेही म्हणतात.

जाणून घ्या कोलन कॅन्सर म्हणजे काय..

कोलनला मोठे आतडे म्हणतात. कोलन गुदाशय किंवा गुदद्वाराशी जोडते. कोलन आणि गुदाशय मोठे आतडे तयार करतात आणि ते पाचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोलोरेक्टल कॅन्सर कोलन किंवा गुदाशयाच्या आतील भागापासून सुरू होतो. याला पॉलीप म्हणतात.

वास्तविक, जेव्हा पॉलीपमध्ये कर्करोग तयार होतो, तेव्हा त्याचा हळूहळू गुदाशयाच्या आतील भिंतींवर परिणाम करते. वास्तविक, कोलन किंवा गुदाशयाच्या भिंती अनेक थरांनी बनलेल्या असतात. कोलोरेक्टल कॅन्सर सर्वात आतील थरापासून सुरू होतो आणि दुसऱ्या थरापर्यंत पसरतो. यानंतर तो शरीराच्या इतर अवयवांमध्येही पसरू लागतो.

( हे ही वाचा: विश्लेषण : ‘सर्वकालीन सर्वोत्तम’ पेले यांची मृत्यूशी झुंज…)

कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी तुम्ही स्वतःच खबरदारी घेणे गरजचे आहे. यामध्ये आतड्याच्या सवयींमध्ये बदल होतो. यासोबतच स्टूलद्वारे रक्त येऊ लागते. काहीही खाल्ल्यावर जुलाब किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोटात नेहमीच वेदना होतात. यासोबतच वजनही कमी होऊ लागते. कधीकधी उलट्या देखील होतात.

अशा प्रकारे कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव करा

कोलन कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच तुम्ही त्वरित तपासणीसाठी जावे. यासोबतच कार्बोहायड्रेटयुक्त आहार घ्या. ऍस्पिरिन देखील घेता येते. यासोबतच हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करा. त्याच वेळी, हा रोग टाळण्यासाठी, आपण धूम्रपान किंवा मद्यपान टाळावे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous footballer pele is suffering from colon cancer know its symptoms and treatment gps