Constipation Remedies: बद्धकोष्ठता किंवा ज्याला इंग्रजीत Constipation कॉन्स्टिपेशन म्हणतात, हे शब्द आपल्या कानावरून गेले नाहीत असं होणारच नाही. खाण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटातल्या लोकांना होताना दिसून येतो. आहारावर तुमचं आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काही घटकांचा समावेश करणं आरोग्याला फायदेशीर ठरू शकतं, असे मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप राव यांनी सांगितलं असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

बद्धकोष्ठता म्हणजे शौचाला जाताना त्रास होणे. सकाळीच पोट स्वच्छ न झाल्यास, दिवसभर पोट फुगलेले राहाते आणि चिडचिडेपणा वाढतो. तसंच बद्धकोष्ठता समस्या दुर्लक्षित केल्यास, अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते आणि अन्नातून पोषक तत्वे शोषून घेण्यात पचनसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. पचनक्रिया सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य पचनासाठी मोठ्या आतड्याचे निरोगी असणे आवश्यक आहे. शरीराचा हा अंतर्गत भाग स्वच्छ ठेवणे आणि रोगांपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. पोटाचा असह्य गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करता येईल, जाणून घ्या..

cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad
झुरळांचा त्रास आता कायमचा होईल गायब! ‘रात्रीचा भात’ वापरून होईल कमाल, पाहा जुगाडू उपाय
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतील खालील पदार्थ?

१. अंजीर

अंजीर पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतर ते खा. तसेच अंजीर दुधासोबतही खाऊ शकता. काही दिवस याचा वापर करा. तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

२. चिया बिया

चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी काम करतात. सकाळी कोमट पाण्यात चिया बियांचे सेवन केल्याने पोट चांगल्या प्रकारे साफ होण्यास मदत होते.

(हे ही वाचा: हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ ७ सुपरफूड्सचा आहारात समावेश करा, शरीराला ठेवा तंदुरुस्त!)

३. सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. सफरचंदात पेक्टिन असते, जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आवश्यक फायबर असते. सफरचंद सालीसोबतच खावे, कारण त्यातदेखील फायबर असते.

४. भिजलेले तुळशीचे बी

तुळशीचे बीज खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. एक ते दोन मोठे चमचे तुळशीचे बी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावे. सकाळपर्यंत हे बी फुगतात. त्यानंतर तुळशी बियांचे हे पाणी प्यायल्याने आराम मिळू शकतो.

५. पपई

पपई खाणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी चांगले आहे. पपईने पोट साफ राहते. यात भरपूर व्हिटॅमिन डी आहे. म्हणून दररोज शिजवलेले पपई खा.

६. त्रिफळा चूर्ण आणि मनुका

देशी तुपाशिवाय आयुर्वेदिक त्रिफळा चूर्ण, मनुका खाण्यानेदेखील बद्धकोष्ठतेपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. मनुका खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

(हे ही वाचा: १ लिटर पाण्यात प्लास्टिकचे अडीच लाख तुकडे! बाटल्यांतील पाणी प्यायल्यानं आतडे-हृदयाच्या आरोग्याचा धोका वाढतो?)

७. हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या आतड्यांना निरोगी ठेवण्याचे काम करतात. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतात. म्हणून जास्तीत जास्त आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

सध्या अनेकांना थंडीच्या दिवसात पचनासंदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेची समस्या अधिक प्रमाणात त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. वेळेवर बद्धकोष्ठतेवर उपाय न केल्यास, अनेक गंभीर आजार होऊ शकतात. वरील सांगितलेल्या घरगुती उपायांचा उपयोग केल्यास नक्की यातून तुम्हाला सुटका मिळू शकते.

Story img Loader