फॅट्स कमी होतात किंवा निघून जातात म्हणजे नक्की कुठे जातात?
म्हणजे ते घाम येऊन निघून जातात का कि शरीरात विरघळून जातात?
मग त्यात कोलेस्ट्रॉल कुठे जातं?
आणि आवश्यक फॅट्स म्हणजे नक्की काय?
लठ्ठ माणसाचं फॅट जातं कुठे?
एक ना अनेक प्रश्न …

फॅट्स म्हणजे सरसकट वाईट घटक असे मानणारा एक वर्ग अजूनही आपल्याकडे आहे. आजच्या लेखात आपण फॅट्स आपल्या शरीरात काय करतं आणि ते कुठे जातं याबाबत जाणून घेऊ. शरीरात चरबी ऊर्जा साठविण्यासाठी आणि पेशींचे रक्षण करण्यासाठी वापरली जाते. वैज्ञानिक भाषेत त्यांना ऍडिपोज टिश्यू असे म्हटले जाते. त्वचेखाली, अंतर्गत अवयवांमध्ये आणि मज्जातंतूंमध्ये ती एका ठराविक प्रमाणात असते. संपूर्ण शरीराच्या आरोग्याचे नियमन करण्यासाठी तिची अनेक महत्त्वपूर्ण कार्ये आहेत.

Sensex falls by 964 points print eco news
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Indrayani serial shooting is going on in the cold of Nashik
‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”
jayant Abhyankar
‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा
fraud with hundreds of employees by promising permanent jobs in health department
कायमस्वरूपी पदासाठी लाखो रुपये उकळले; आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक
fake medicines supplied from bhiwandi thane
धक्कादायक! ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री, आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता
Is it necessary to use masks to protect pets
पाळीव प्राण्यांना प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
health insurance situation in india, Indian insurance companies delay
अन्यथा : दवा, दुआ, दावा!

या चरबीचे कार्य काय?

१. ऊर्जा साठवण आणि योग्य वेळी वापर करणे

२. बाहेरच्या तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान राखणे

३. नाजूक अवयवांभोवती संरक्षण कवच तयार करणे

४. भुकेच्या संप्रेरकांचे संतुलन राखणे

५. शरारीरातील ऊर्जेचे संतुलन राखणे

६. ग्लुकोजचे नियमन करणे

७. इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करणे

८. रोगप्रतिकारकशक्ती राखणे

९. लैंगिक संप्रेरकांचे नियंत्रण करणे

१०. हाडांभोवती आवश्यक संरक्षण तयार करणे

आपल्या शरीरात फॅट्स पेशी ट्रायग्लिसेराईड्स साठवतात. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेल्या रक्तातील चरबीचा हा एक प्रकार होय. वजन कमी करण्यासाठी या घटकांचे विघटन होणे महत्वाचे असते. ट्रायग्लिसेराईड्स चयापचय करताना कार्बन डायॉऑक्साईड आणि पाण्याच्या अणू स्वरूपात चरबीचे विघटन करतात.

हेही वाचा… पावसाळ्यात महिलांच्या आरोग्याला धोका अधिक असतो का ?

थोडक्यात शासोच्छवास करताना सोडला जाणारा कार्बन डायॉक्साईडदेखील चरबीचे प्रमाण कमी करतो. याव्यतिरिक्त लघवी, अश्रू, घाम, मल आणि इतर शारीरिक द्रव्ये नष्ट होईपर्यंत पाणी झालेली चरबी आपल्या रक्तभिसरणात मिसळते. शरीराचं मेटाबॉलिसम योग्य प्रमाणात राखता यावं यासाठी मुबलक ऑक्सिजन शरीराला मिळणे आवश्यक असतं. शरीरातील चरबीच्या विघटनासाठी आपण कमी करत असलेल्या चरबीच्या तिप्पट ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणजे १० किलो मानवी चरबी कमी करण्यासाठी सुमारे ३० किलो ऑक्सिजन. (इन्हेल करणे) शरीरात सामावून घेणे आवश्यक आहे.

शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होत आहे, हे कसं समजणार?

१. इंच लॉस होणे

२. शरीरातील स्नायूंना योग्य वळण येणे

३. निरोगी वाटणे

४. व्यायाम करावासा वाटणे

५. शरीरात चपळाई येणे

६. शरीरात ऊर्जेचे संतुलन जाणवणे

आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा हालचाल करीत असताना ऊर्जा उत्सर्जित केली जाते. श्वासोच्छवास घेण्यापासून ते अन्न पचविण्यापर्यंत प्रत्येक क्रियांमध्ये बदलणारा मेटाबोलिसम फॅट्सच्या विघटनासाठी मदत करतो. अनेकदा चरबी कमी करण्यासाठी गोळ्या किंवा औषधे घेतल्यामुळे मेटाबोलिसम सुस्त होऊन परिणामी चरबीच्या संचयनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शरीरातील चरबी कमी करताना आहारातील चरबीचे प्रमाण योग्य प्रमाणात राखणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्याबद्दल पुढील भागात जाणून घेऊया.

Story img Loader