Fatty liver, these 3 drinks will reduce fatty liver: गेल्या काही वर्षांमध्ये फॅटी लिव्हरने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अगदी मद्याला स्पर्श न करणाऱ्यांनादेखील याचा त्रास होऊ लागला आहे. फॅटी लिव्हरमुळे अनेक आजार बळावतात आणि याचा आपल्या आरोग्यावर अगदी वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु, या फॅटी लिव्हरचा त्रास आपण या तीन ड्रिंक्सने घरच्या घरी नियंत्रणात आणू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या तीन मॅजिक ड्रिंक्सबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्वर्डप्रशिक्षित डॉ. सौरभ सेठी यांनी नुकतीच एक इन्स्टाग्राम रील शेअर केली आहे, ज्यात त्यांनी फॅटी लिव्हरच्या समस्येसाठी ग्रीन टी, कॉफी आणि बीटरूट ज्यूस या तीन मॅजिक ड्रिंक्स घेण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी indianexpress.com ने या ड्रिंकच्या संभाव्य फायद्यांबद्दल पोषणतज्ज्ञांशी संवाद साधला.

हेही वाचा… आरोग्याच्या ‘या’ ५ समस्या होतील झटक्यात दूर; जाणून घ्या ओवा, बडीशेपच्या मॅजिक ड्रिंकचे फायदे

“ग्रीन टीमध्ये कॅटेचिन हा घटक असतो, जो यकृताचे कार्य सुधारण्यास आणि यकृतातील फॅट कमी करण्यास मदत करतो. कॉफीचा वापर यकृतातील एन्झाइमच्या खालच्या पातळीशी (lower levels of liver enzymes) संबंधित आहे आणि हा संबंध यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीटरूट ज्यूसमध्ये बेटेन असते, जे यकृतामध्ये फॅट कमी जमा करते”, असे ‘Self care by suman’च्या संस्थापक आणि पोषणतज्ज्ञ सुमन अग्रवाल यांनी सांगितले.

ही ड्रिंक्स किती वेळा घ्यावीत?

“यकृताच्या आरोग्यासाठी दररोज तीन ते चार कप कॉफी, दोन ते तीन कप ग्रीन टी आणि एक कप बीटरूटचा रस घ्या”, असे पोषणतज्ज्ञ पूजा पालरीवाला यांनी सांगितले. पूजा यांच्या मते हे प्रमाण सामान्यतः सुरक्षित असते आणि यकृतातील एन्झाइमची पातळी कमी करण्यास, यकृताचे कार्य सुधारण्यास आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करते.

तथापि, पूजा यांनी हेदेखील सांगितलं की, जास्त प्रमाणात ग्रीन टी घेतल्याने यकृत विषारी होऊ शकते. तसेच बीटरूटच्या रसात नैसर्गिक शर्करा जास्त असते, ज्यामुळे जास्त प्रमाणात बीटरूटचा वापर काहींसाठी, विशेषत: मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकतो.

आहारतज्ज्ञ पूजा म्हणाल्या, “बीटरूटमधील बीटेन घटक यकृताच्या फॅटवर प्रक्रिया करण्यास आणि ते कमी करण्यास मदत करते. बीटरूटमध्ये नायट्रेट्सदेखील असतात, जे रक्त प्रवाह सुधारू शकतात आणि यकृताच्या चांगल्या कार्यास प्रोत्साहन देऊ शकतात.” फायबरची कमतरता आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने पूजा यांनी ज्यूसऐवजी सॅलेडमध्ये बीटरूटचा वापर करण्याची शिफारीस केली.

हेही वाचा… पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे

दोन्ही तज्ज्ञांनी अलर्टनेस, झोपेचा त्रास आणि इतर दुष्परिणाम टाळण्यासाठी सकाळी आणि दुपारच्यादरम्यान ग्रीन टी आणि कॉफीचे सेवन करण्याचे सुचवले.

अग्रवाल यांनीदेखील बीटरूटमध्ये शर्करा जास्त असल्याचे सांगितले आणि मधुमेहींनी ते टाळण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, “जास्त ग्रीन टी आणि कॉफीमुळे झोप कमी होणे, आम्लपित्त, लोहाचे शोषण कमी होणे आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात; म्हणून रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन करू नये. हे पेय जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर घेतले पाहिजे.”

नोट – हा लेख पब्लिक डोमेन आणि/किंवा आम्ही संवाद साधलेल्या तज्ज्ञांच्या माहितीवर आधारित आहे. तुमची दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatty liver these 3 drinks will reduce fatty liver home remedies for healthy lifestyle dvr