Is it okay to feed your dog fruits: काही श्वानांचे पालक पूर्णपणे पॅकेज्ड डॉग फूड देऊन त्यांचं पोषण करणे पुरेसे मानतात, पण पॅकेज्ड फूडशिवाय त्यांच्या आहारात काही फळे आणि भाज्या जोडल्या तर त्यात काही वाईट नाही. श्वानांना रोज भरपूर पोषणाची आवश्यकता असते आणि काही पोषण फळांद्वारे मिळू शकते. मार्स पेटकेअरचे सीनियर व्हेटेरिनेरियन डॉ. उमेश कल्लहल्ली (Umesh Kallahalli) यांनी सांगितले की, कोणती फळे आपल्या श्वानाला फायदेशीर ठरू शकतात आणि कशी!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सफरचंद : सफरचंद तुमच्या श्वानाच्या आहारात अप्रतिम भर घालतात, कारण त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आहारातील फायबर भरपूर असतात. “जीवनसत्त्वे आणि खनिजे श्वानांच्या शरीरातील मूलभूत प्रक्रियांचे नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्यांच्या नैसर्गिक संरक्षणासाठी ते आवश्यक आहेत”, असं डॉ. कल्लहल्ली म्हणाले.

हेही वाचा… “आम्हाला मूल नको होतं; पण…”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा! सांगितला मातृत्वाचा कमी बोलला जाणारा पैलू

ब्लूबेरी : ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात आणि ते श्वानाच्या मेंदूसाठी आणि पाचक आरोग्यासाठी चांगले असतात. ते जीवनसत्त्वे A, C आणि K नेदेखील समृद्ध आहेत. अभ्यास असे सूचित करतात की, ते पेशींचे नुकसान टाळण्यास, रात्रीची दृष्टी सुधारण्यास आणि ज्येष्ठ पाळीव प्राण्यांमध्ये मेंदूची क्षमता वाढवू शकतात.

कलिंगड : जर कलिंगडाच्या बिया काढल्या आणि त्यांना हे फळ खाऊ घातलं तर श्वानांसाठी ते उत्तम आहे. ते पोटॅशियम, जीवनसत्त्वे A, B6 आणि C ने समृद्ध असतात आणि आपल्या श्वानाला उष्ण दिवसांमध्ये हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.

केळी : केळी श्वानांसाठी कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत असू शकतात, पण त्यांचा वापर मापातच करावा. कारण केळ्यामध्ये जास्त साखर असते आणि जास्त साखर खाल्ल्याने विविध आरोग्य समस्या होऊ शकतात.

हेही वाचा…  बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता दररोज ३५,००० पावले चालायचा! चालण्याचा नेमका फायदा काय? वयोवृद्धांनी नेमकं किती चाललं पाहिजे?

इतर फळे जसे की अननस, स्ट्रॉबेरी, आंबा आणि संत्रेही तुमच्या श्वानासाठी पौष्टिक असू शकतात. पण, इतर कोणत्याही आहारासारखेच, त्यांचा वापर मापातच करावा. दुसरीकडे काही फळे जसे की चेरी आणि द्राक्षे पूर्णपणे टाळावीत, कारण ती तुमच्या श्वानासाठी विषारी ठरू शकतात.

शेवटी तुमच्या श्वानाच्या आहारात नवीन पदार्थ समाविष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून सल्ला घेणं उत्तम आहे आणि हे लक्षात घ्या की, श्वानांना आहारात फळांची आवश्यकता नाही, पण जर त्यांना आवडत असतील तर ती एक स्वस्त आणि सोपी गोष्ट म्हणून दिली जाऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feeding fruits to dog is okay or not which fruits should be fed to dogs know from experts dvr