fever can help you to weight loss : शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेले की ताप येतो. अचानक थंडी वाजणे, कसकस, , कमी-जास्त प्रमाणात येणारा ताप, विशिष्ट वेळेत येणारा ताप, मुरलेला ताप, व्हायरल ताप ; असे तापाचे असे विशिष्ट प्रकार आहेत. सध्याच्या वातावरणात ताप येण्याचे प्रमाण खूप आहे. यादरम्यान तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल की, ताप आल्यावर तो दोन ते तीन दिवस राहिला की आपले वजन कमी होते. तर असं नक्की का घडतं तुम्हाला माहिती आहे का? नाही… तर याचबद्दल आपण या लेखातून अधिक जाणून घेऊयात…

डिजिटल क्रिएटर व शास्त्रीय होमिओपॅथी प्रॅक्टिशनर डॉक्टर मंजरी राव यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे ; ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ताप हा कॅटाबॉलिक आहे ; जो अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कार्य करतो. पण, सोशल मीडियावर अशासंबंधित बरीच माहिती पसरत असतात. तर अशावेळी डॉक्टरांकडून पडताळणी करून घेण्यासाठी द इंडियन एक्सस्प्रेसने क्लिनिकल तज्ज्ञांशी चर्चा केली. तसेच हे समजून घेतलं की ताप आल्याने खरंच वजन कमी होतं का? वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी हा सुरक्षित उपाय ठरू शकतो का?

मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र
“तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
shrikant shinde maharashtra assembly election 2024
Shrikant Shinde in Sangli: श्रीकांत शिंदेंकडून युतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा? खानापूरबाबत जाहीर कार्यक्रमात म्हणाले…
This is what happens to the body when you suddenly stop taking diabetes medication Take care in advance to avoid diabetes
डायबिटीजची औषधे घेणे अचानक बंद केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

तर यावर बंगळुरूच्या मेडिसिन, एस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलच्या, लीड कन्सल्टंट आणि एचओडी डॉक्टर सुचस्मिता राजमान्या म्हणाल्या की, शरीरातील चयापचय अति तापमानामुळे वाढते आणि तुमचे वजन कमी होऊ शकते. जेव्हा तुम्हाला खूप ताप येतो तेव्हा तुमच्या शरीराला संसर्गाचा सामना करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. तर अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला जास्त कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होते. तिने नमूद केले की ही चरबी कमी (फॅट) होणे तात्पुरते असते.

हेही वाचा…रात्री झोपताना तुम्हालाही दूध पिण्याची सवय आहे का? मग १५ दिवसातून एकदा अशा प्रकारे करा दुधाचे सेवन; जाणून घ्या डॉक्टरांचे मत

तर नक्की असं का घडते?

तापाच्या वेळी शरीराचे तापमान नियंत्रित करणाऱ्या हायपोथालेमसच्या सेट पॉईंटमध्ये वाढ झाल्यामुळे असे घडते. ताप आल्यानंतर व्यक्ती पेशींच्या चयापचय क्रिया वाढतात व कॅलरीज बर्न होतात , त्वचेवरील रक्त प्रवाह कमी होते आणि आपले शरीर थरथर कापू लागते; ज्यामुळे शरीरात अधिक उष्णता निर्माण होते. यामुळे अशा वाढलेल्या चयापचय क्रियांमुळे वजन कमी होते, तर काही वेळा, संसर्गामुळे सायटोकाइन्स व रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे प्रकाशन होते ज्यामुळे वजन कमी ( Weight Loss) होऊ शकते ; असे डॉक्टर सुचस्मिता राजमान्या म्हणाल्या आहेत.

तर एस्टर आरव्ही हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन, लीड कन्सल्टंट डॉक्टर अरविंदा एस एन म्हणाल्या की, अति तापामुळे वजन कमी होत नाही. कारण – त्यामुळे डिहायड्रेशन होते ; जे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. जर वजन कमी होणे तापाशी संबंधित असेल, तरही क्रॉनिक इन्फेक्शन असणाऱ्यांनी हा उपाय टाळला पाहिजे.

वजन कमी (Weight Loss) करण्याचा हा सुरक्षित पर्याय आहे का?

उत्तर – नाही. वजन कमी करण्याचा हा सुरक्षित पर्याय नाही. ताप आल्यावर वजन कमी होणे म्हणजे तुमच्या शरीर प्रणालीमध्ये काही आजार आहेत ; ही खरोखरच हेतुपुरस्सर किंवा निरोगी प्रक्रिया नाही; त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जात नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, तापामुळे शरीरात चरबीपेक्षा (फॅट्स) पाणी कमी होते, अंतर्निहित रोगामुळे एखाद्याच्या अंतर्गत अवयवांना गंभीर नुकसान होऊ शकते; ज्यामुळे वजन कमी ( Weight Loss) करणे हा धोकादायक मार्ग ठरतो ; असे डॉक्टर सुचस्मिता राजमान्या म्हणाल्या आहेत.

जास्त तापामुळे वजन कमी होणे डिहायड्रेशनसह येते. कारण – घामाने शरीरातील द्रव कमी होते, स्नायूंचे नुकसान होऊ शकते. कारण शरीर ऊर्जेसाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन करू शकते. तापाने भूक व अन्नाचे सेवन कमी झाल्यास पोषक तत्वांची कमतरता सुद्धा उद्भवू शकते. शरीर संसर्गाशी लढण्यासाठी जास्त काम करत असल्यामुळे वजन कमी होणे हा एक योगायोग आहे. अति तापामुळे महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फेफरे, मेंदूतील रक्तस्राव आणि अर्धांगवायू होऊ शकतो ; असे बालरोगतज्ज्ञ, सल्लागार डॉक्टर प्रशांत मेदांता यांनी म्हंटले आहे.

डॉक्टर सुचस्मिता राजमान्य आणि प्रशांत मेदांता दोघेही मान्य करतात की, क्रॉनिक इन्फेक्शन, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, लहान मुले, वृद्धांनी वजन कमी ( Weight Loss) करण्यासाठी हा मार्ग निवडणे टाळावे.