बहुतेक तरुण माता बाळाच्या जन्मानंतर नैराश्यातून जातात, त्यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन (PPD) असे म्हणतात. कारण त्या बाळाचे पालनपोषण आणि त्यांच्या नव्या आयुष्याबरोबर जुळवून घेताना त्या नवीन आव्हानांचा सामना करतात. अनेक वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञांनी महिलांना ‘या’ तणावपूर्ण मानसिक स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने ‘Zurzuvae’ (zuranolone) ला PPD साठी पहिले तोंडावाटे दिले जाणारे औषध ( first oral medication) म्हणून मान्यता दिली आहे. या औषधामुळे गर्भवती महिला आशावादी होऊ शकतात. परंतु, अशा स्थितीमध्ये त्याचा वापर अधिकृत करण्यासाठी अजून बराच वेळ आहे आणि तोपर्यंत तज्ज्ञांना लवकर तपासणी करणे, लवकरात लवकर उपचार करणे आणि समुपदेशन सेवा घेण्यासाठी मातांना तयार करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

प्रौढांमधील पीपीडीच्या उपचारांसाठी दोन चाचण्यांद्वारे ( randomised trials) ‘Zurzuvae’ या औषधाचा प्रभावीपणा सिद्ध झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली. या चाचणीमध्ये सहभागी महिलांना PPD ची समस्या होती. मानसिक विकारांचे निदान आणि सांख्यिकी नियमावलीनुसार ( Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders criteria) या महिलांनी मोठ्या नैराश्याचा सामना केला होता आणि त्याची लक्षणे तिसऱ्या तिमाहीत किंवा प्रसूतीच्या चार आठवड्यांच्या आत सुरू झाली होती. प्लेसबो गटांच्या (placebo groups) तुलनेत, नियंत्रण चाचणीमध्ये (randomised control trial ) सहभागी झालेल्या आणि Zurzuvae हे औषध देण्यात आलेल्या महिलांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसली. शेवटच्या डोसनंतर ४२ व्या दिवसापर्यंत किंवा चार आठवड्यांपर्यंत त्याचा प्रभाव टिकतो असे दिसून आले.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?

याबाबत इंडियन एक्सप्रेसबरोबर संवाद साधताना दिल्लीच्या अपोलो इंद्रप्रस्थ हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अचल भगत यांच्या मते, ”Zurzuvae’ हे नवीन औषध गेम चेंजर ठरू शकते. आतापर्यंत PPD साठी उपचार म्हणून फक्त IV इंजेक्शन उपलब्ध होते. आता नवीन तोंडावाडे दिले जाणारे हे औषध गेम चेंजर कसे असू शकते? हे जाणून घेऊ या

”Zurzuvae (zuranolone) ला अलीकडे यूएस FDA ने PPD वर उपचार करण्यासाठी मान्यता दिली आहे. हे एक न्यूरोएक्टिव्ह स्टिरॉइड (NAS) GABA-A रिसेप्टर मॉड्युलेटर आहे, ज्याचा अर्थ ते “मेंदूच्या नेटवर्कचे संतुलन साधून”(rebalancing brain networks) कार्य करते. Zurzuva आणि इतर एंटीडिप्रेसन्ट (antidepressants) मधील फरक हा आहे की, ”ते लवकर कार्य करते आणि दिवसातून एकदा असे १४ दिवसांसाठी घेतले जाते. मात्र, भारतात अद्याप हे औषध उपलब्ध नसल्याने आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल”, असे डॉ. भगत यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशी औषधे घेणे महत्त्वाचे का आहे?

डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशी औषधे घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचे काही दुष्परिणाम असू शकतात. सामान्य नसलेले परंतु अधिक गंभीर दुष्परिणाम म्हणजे औषध घेणाऱ्यांमध्ये आत्मघाती प्रवृत्ती असू शकते. म्हणून ते नेहमी मनोचिकित्सकांच्या सल्ल्यानुसार घेतले गेले पाहिजे.

औषधाच्या लेबलवर चेतावणी दिली आहे की, ”Zurzuvae एखाद्या व्यक्तीच्या वाहन चालविण्याच्या आणि इतर संभाव्य धोकादायक ॲक्टिव्हिटी करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते.” रूग्ण त्यांच्या अशक्तपणाचे मूल्यांकन करू शकत नाहीत. त्यामध्ये शांत करणारे किंवा झोप आणणारे sedation चे जास्त प्रमाणदेखील असू शकते, म्हणून या औषधाचे सेवन करत असताना महिलांनी वाहन चालवणे किंवा जड यंत्रे वापरणे टाळावे. तसेच त्यांनी दारू पूर्णपणे टाळावी.

हे औषध घेणाऱ्यांमध्ये काही सामान्य दुष्परिणाम दिसून येतात. जसे की, तंद्री लागणे, चक्कर येणे, अतिसार, थकवा, नासोफॅरिंजिटिस (सामान्य सर्दी) आणि मूत्रमार्गात संसर्ग.

स्तनपान करणाऱ्या मातांनी याचे सेवन करावे का?

हे औषध आईच्या दुधातदेखील स्रावित (secreted) केले जाते; परंतु त्याचा बाळावर होणारा प्रभाव स्पष्टपणे नोंदविला गेलेला नाही. त्यामुळे आई औषध वापरत असताना बालरोगतज्ज्ञांनी मुलावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. कधीकधी स्तनपानासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा लागतो.

भारतीयांसंदर्भात नवीन औषध किती महत्त्वाचे आहे?

बऱ्याच स्त्रियांना त्रास होतो, कारण त्यांच्यामध्ये PPD चे निदान होत नाही आणि ९०% पेक्षा जास्त स्त्रियांना प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यासाठी उपचारदेखील उपलब्ध नसतात. प्रत्येक नवीन उपचारामध्ये नवी आशा देण्याची क्षमता असते. म्हणून, एक देश म्हणून आपल्याला उपचार लवकरात लवकर पुरवणे आणि सर्व महिलांना या सेवांचा लाभ मिळण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोणतीही एक उपचार रणनीती ही जादुई गेम चेंजर नाही; परंतु योग्य धोरणांची अंमलबजावणी केल्याने डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांना नैराश्य लवकर ओळखण्यासाठी प्रशिक्षित करतात. तसेच स्वस्त उपचारांचा लाभ मिळावा हे सुनिश्चित करतात. PPD मुळे विकृती आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची अधिक शक्यता असते.

PPD चा आई आणि बाळाच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

PPD हा एक सामान्य विकार आहे, ज्यामध्ये स्त्रियांना तीव्र चिंता, सतत दुःख, लाज, अपराधीपणा, झोपेत अडचणी, तणाव, पॅनिक अटॅक आणि आत्महत्येचे विचार किंवा प्रयत्न अशी लक्षणे जाणवू शकतात. काळजी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आई मानसिकरित्या उपलब्ध नसल्यामुळे मुलांचा शारीरिक आणि भावनिक विकास होण्यास विलंब होऊ शकतो. प्रसूतीनंतरच्या काळात नैराश्याच्या अनुभवामुळे १० टक्क्यांपर्यंत स्त्रिया प्रभावित होऊ शकतात.

हेही वाचा – ‘हे’ पदार्थ कमी खाल्ल्यामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका? कसा असावा तुमचा आहार, जाणून घ्या

सहसा हा टप्पा प्रसूतीनंतर सुरू होतो आणि त्यानंतरच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांपर्यंत टिकतो. याची कारणे म्हणजे प्रसूतीनंतर होणारे मोठे हार्मोनल बदल, शरीरात होणारे बदल, अस्वस्थता आणि वेदना, झोप न लागणे, स्तनपान करवताना होणारे बदल. तसेच गरोदरपणात होणाऱ्या आईकडे दिले जाणारे लक्ष आणि तिची घेतली जाणारी काळजी प्रसूतीनंतर कमी होते आणि अर्थातच दर दोन तासांनी नवजात बाळाकडे जास्त लक्ष दिले आणि काळजी घेतली जाते. शहरी वातावरणामध्ये, पोस्टपर्टम ब्लूजचा (Postpartum Blues) प्रसार जास्त असतो, कारण महिलांना या काळात आवश्यक असलेला मानसिक आधार अनेकदा कमी पडतो. प्रसूतीच्या चार आठवड्यांपासून PPD तीन महिन्यांच्या दरम्यान केव्हाही सुरू होऊ शकते आणि याची लक्षणे खूप गंभीर असू शकतात. एवढंच काय तर आई स्वतःला आणि बाळाला हानी पोहोचवू शकते

Story img Loader