चंदू चॅम्पियन स्टार कार्तिक आर्यनने तंदुरुस्त शरीर मिळवण्याकरिता त्याच्या शाकाहारी आहाराचे रहस्य सांगितले. कार्तिकने उघड केले की, “स्पोर्ट्स ड्रामामध्ये पॅरालिम्पियन ॲथलिट म्हणून त्याच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी त्याने हलक्या पर्यायासाठी भाता ऐवजी कौली भात (cauli rice) खाल्ला.”

अभिनेत्याने सांगितले की, “मी रात्रीच्या जेवणासाठी सूप घेण्याकडे वळलो आणि दुपारच्या जेवणासाठी भाताच्या ऐवजी कौली भात घेतला. कौली भात हा साधारणपणे किसलेल्या फुलकोबीपासून बनवलेला पदार्थ आहे. हा नेहमीचा भात नव्हता, परंतु आहारातील कर्बोदके काढून कमी केले आणि फायबरचे सेवन केल्यामुळे टोफू आणि कौली भातसारखे जेवण निवडले, जे वजन नियंत्रितसाठी अनुकूल होते. मी सॅलेड्स, बीन्स, मसूर आणि पनीर समृद्ध आहार स्वीकारला आहे.”

paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी

“बारीक चिरलेल्या किंवा किसलेल्या फुलकोबीपासून बनवलेला कोली भात हा भातप्रेमींसाठी कमी-कार्ब्स असलेला पर्याय आहे. कोली भाताचे अनेक फायदा आहे असे नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारशास्त्रप्रमुख डॉ. सुहानी सेठ अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा – जेवताना पाणी पिणे खरंच फायदेशीर आहे? जाणून घ्या, पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर कसा होतो परिणाम?

Cauli Riceचे प्रभावी पौष्टिक फायदे

कॅलरी आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी : एक कप शिजवलेल्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत (सुमारे २०० कॅलरीज आणि ४५ ग्रॅम कर्बोदकांमध्ये), कौली भातामध्ये फक्त २५ कॅलरीज आणि पाच ग्रॅम कर्बोदके असतात, ज्यामुळे ते पचण्यासाठी हलका आहार ठरतो.

फायबर चॅम्पियन : एक कप कौली भातामध्ये २-३ ग्रॅम फायबर असते, जे पचनास मदत करते आणि परिपूर्णतेची भावना वाढवते.

प्रोटीन पॉवर : यामध्ये मांसासारखे प्रोटीन पॉवरहाऊस नसले तरी सामान्य तांदळाच्या तुलनेत प्रति कप सुमारे दोन ग्रॅम प्रथिने त्यात असतात.

जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध : पोटॅशियम आणि मँगनीजसारख्या खनिजांसह जीवनसत्त्वे सी, के आणि बी जीवनसत्त्वे समृद्ध, कौली भात रोगप्रतिकारक शक्तीपासून हाडांच्या आरोग्यापर्यंत शरीराच्या विविध कार्यांना समर्थन देतात.

ब्लड शुगर फ्रेंडली : कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह कौली भात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकत नाही, जे मधुमेहाचे नियंत्रण करतात किंवा रक्तातील साखरेचे नियंत्रण शोधत आहेत, त्यांच्यासाठी ते योग्य बनवते.

हेही वाचा –“रात्री ९.३० वाजता ध्यान करते अन् १० वाजता झोपते”, समंथा रुथ प्रभुच्या दिनचर्येबाबत काय म्हणाले तज्ज्ञ?

नेहमीच्या भाताऐवजी कौली भात खाण्याचा विचार करत आहात? या मुद्द्यांचा विचार करा (Replacing regular rice? Consider these points)

कार्तिक आर्यनच्या मूव्ही ट्रान्सफॉर्मेशनप्रमाणेच, नेहमीच्या भाताऐवजी कौली भात खाणे एक आरोग्यदायी निवड असू शकते, असे डॉ. अग्रवाल म्हणाले. विशेषत: ज्यांना कॅलरी आणि कार्बचे सेवन कमी करणे, भाज्यांचा आहारात वापर वाढवणे, वजन किंवा रक्तातील साखर व्यवस्थापित करायचे आहे. पण, डॉ. अग्रवाल या घटकांचा विचार करण्याचा सल्ला देतात:

चव आणि पोत : कौली भात नेहमीच्या भाताप्रमाणे समाधान किंवा ऊर्जा घनता देऊ शकत नाही. त्याची रचना आणि चवदेखील भिन्न आहे, संभाव्यतः जेवणाच्या आनंदावर परिणाम करते.

थायरॉईड समस्या : फुलकोबीसारख्या क्रूसीफेरस भाज्या थायरॉईडच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणू शकतात. ज्यांना थायरॉईडची समस्या आहे, त्यांच्यासाठी संयम महत्त्वाचा आहे.

पाचक समस्या : कौली भातामध्ये उच्च फायबर घटकांमुळे आयबीएस असलेल्या लोकांना गॅस किंवा सूज येऊ शकते.

आहाराच्या गरजा आणि प्राधान्ये बदलू शकतात. कौली भात तुमच्या विशिष्ट पौष्टिक गरजा पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

Story img Loader