Drink lauki juice once a week : दुधी भोपळा अनेकांना आवडत नाही. घरात दुधी भोपळ्याची भाजी असेल, तर बरेच जण नाक मुरडतात; पण या अनेकांच्या नावडत्या दुधी भोपळ्याच्या भाजीत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. दुधी वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम व लोह मुबलक प्रमाणात असतं. दुधी आहारात घेतल्यानं हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही; मात्र दुधी खाल्ल्यानं तणावदेखील कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत नसेल, तर तुम्ही ज्युस करून त्याचं सेवन करू शकता. दरम्यान, आठवड्यातून एकदा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घ्या. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
leg Cramps
रात्रीच्या वेळी अचानक पायात क्रँप्स का येतात? ‘हे’ उपाय करा त्वरित मिळेल आराम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
eat, eat in middle of evening, health news,
Health Special : मधल्या वेळेत खावं का?
diwali cleaning tips hacks
फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ; काळपट, बुळबुळीत झालेली फरशी चमकेल अगदी नव्यासारखी
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”

दुधी भोपळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए आणि इतर महत्त्वाच्या पोषक घटक असतात. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते, असं यशोदा हॉस्पिटल्स हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी स्पष्ट केलं. दुधी भोपळ्याच्या रसामध्ये पाण्यात विरघळणारी ब व क ही जीवनसत्त्वं आणि ए, ई व के ही चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वं असतात. तसेच लोह, मॅग्नेशियम, फोलेट व पोटॅशियम हे घटकदेखील पुरेशा प्रमाणात आढळतात.

कोलेस्ट्रॉल कमी करते

रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणं आणि त्यामुळे हृदयविकार कमी होणं हे दुधी भोपळ्याच्या रसाच्या सातत्यपूर्ण सेवनामुळे साध्य होत असल्याचं डॉ. गुडे यांनी सांगितलं.

हायड्रेशन आणि कूलिंग इफेक्ट

तहान भागवते : दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन केल्यानं शरीर हायड्रेट राहतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या कडक उन्हाचा त्रास कमी होतो. ही बाब शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास आणि उष्माघात टाळण्यासाठी मदत करू शकते.

पचनासाठी फायदेशीर

दुधी भोपळ्यामधील उच्च फायबर आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन आणि बद्धकोष्ठता रोखून पचनास मदत करतं.

कमी आंबटपणा

दुधी भोपळ्याच्या रसामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात. त्यामुळे छातीत जळजळ आणि अपचनापासून आराम मिळतो.

वजन व्यवस्थापन भूक नियंत्रण

दुधी भोपळ्यामधील फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेेलं राखण्यास मदत करतं, भूक कमी करतं आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणास मदत होते.

त्वचेला फायदा होतो

दुधी भोपळ्यामधील उच्च पाण्याचं प्रमाण तुमच्या त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

केसगळती कमी होते

दुधी भोपळ्याच्या रसाच्या सेवनामुळे केस पातळ होणं, टक्कल पडणं इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते. केसांसाठी दररोज एक ग्लास दुधीचा रस प्यायल्यास फायदा होतो. केसांची वाढ चांगली होऊन, केस अकाली पांढरे होत नाहीत.

रक्तातील साखर नियंत्रण

दुधी भोपळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि त्यामुळे ही बाब मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.

मूत्रपिंडाचे कार्यास मदत

दुधी भोपळ्याच्या रसाच्या सेवनाने विषाक्त पदार्थ बाहेर काढून मूत्रपिंडाच्या कार्यास मदत करू शकतात.

टीप – दुधी भोपळ्याच्या रसाचे अनेक फायदे देत असले तरी, आपल्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> PCOS आहे, काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

दुधी खाताना कोणती काळजी घ्यावी?

दुधी शरीरासाठी फायदेशीर असली तरी संभाव्य दुष्परिणामांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे.

१. काही लोकांना दुधीची अॅलर्जी असू शकते, सूज येणे, पुरळ उठणे किंवा खाज येणे, अशा समस्या उद्भवू शकतात.

२. दुधीमधील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सामान्यत: तो सुरक्षित असला तरी रक्तातील साखरेच्या पातळीचं निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. कारण- दुधीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी खालावू शकते. त्यामुळे यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं.

३. विशेषतः जर दुधी कडू असेल, तर काही लोकांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुधी निवडताना तो कडू असणार नाही, याची खात्री करून घ्या.

Story img Loader