बडीशेप आणि ओवा यांचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे ते सध्या लोकप्रिय झाले आहे. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरूच्या येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ भारती कुमार यांनी सांगितले, “या हर्बल मिश्रणाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्याने आपल्या पाचक आरोग्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अनेक फायदे मिळू शकतात. पण, त्याचे काही संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात याची जाणीव ठेवूनच, त्याचा वापर करायला हवा.”

बडीशेप आणि ओवाच्या पाण्याचे आरोग्य फायदे

दररोज सकाळी बडीशेप आणि ओव्याचे पाणी पिण्याचे कुमार यांनी सांगितलेले आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

Fennel seeds carom seeds water benefits
आरोग्याच्या ‘या’ ५ समस्या होतील झटक्यात दूर; जाणून घ्या ओवा, बडीशेपच्या मॅजिक ड्रिंकचे फायदे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Boiled Ajwain Water Benefits
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? 
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

पचन सुधारते : बडीशेप आणि ओव्याचे पाणी पिण्याचा एक प्राथमिक फायदा म्हणजे त्याचा पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. बडीशेप आणि ओव्यामध्ये असे गुणधर्म आहेत की, जे पाचक एंझाइम्सना चालना देतात, पोषक घटकांचे विघटन टाळतात आणि शोषण वाढवतात. ही प्रक्रिया पोट फुगणे आणि गॅस यांसारख्या सामान्य पाचन समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

ब्लोटिंग आणि गॅस कमी होतो (Reduced Bloating and Gas) : बडीशेप आणि ओव्याचे पाणी सूज आणि गॅस कमी करण्यासाठी मदत करते. बडीशेप पोटफुगी दूर करण्याच्या (carminative) गुणधर्मांसाठी ओळखले जाते; जी पचनसंस्थेला शांत करण्यास आणि पोटात अडकलेला वायू बाहेर काढण्यास मदत करते. याच वेळी ओवा एकूण पाचन आरोग्यासाठी योगदान देतो.

हेही वाचा – तुम्ही रोज ‘च्युईंगम’ चघळता का? आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते : बडीशेप व ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते. याचे श्रेय बडीशेप आणि ओव्यातील संयुगांना दिले जाते; जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य राखण्यास मदत करते आणि ग्लुकोजचे पचन सुधारतात.

मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून आराम : मासिक पाळीच्या क्रॅम्पमुळे महिलांना त्रास होत असल्यास बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्यास आराम मिळू शकतो. बडीशेप आणि ओव्याचे दाहकविरोधी आणि वेदनशामक गुणधर्म मासिक पाळीशी संबंधित वेदना कमी करण्यास मदत करतात.

श्वासोच्छ्वासाचे आरोग्य जपते (Support for Respiratory Health) : ओवा पारंपरिकपणे श्वसनाच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी वापरला जातो. तो कफ बाहेर काढणारे औषध म्हणून काम करतो. तसेच त्यामुळे खोकला आणि सर्दीची लक्षणे दूर होण्यास मदत मिळते.

हेही वाचा – कोमात असलेल्या महिलेला पाळी येते का? इंटरनेटवर चर्चेत असलेल्या प्रश्नाचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

बडीशेप आणि ओव्याचे पाणी पिताना काय काळजी घ्यावी? (Considerations and precautions)

बडीशेप आणि ओव्याचे पाणी अनेक आरोग्यदायी फायदे देते; परंतु कुमार म्हणाले, “ते कमी प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.”

ॲलर्जीक प्रतिक्रिया : काही व्यक्तींना बडीशेप किंवा ओव्याची ॲलर्जी असू शकते. लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अस्वस्थता यांचा समावेश असू शकतो. तुम्हाला कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया जाणवल्यास त्याचा वापर बंद करा आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

हेही वाचा – ‘ताल’च्या क्लायमॅक्स शूटिंगपूर्वी अनिल कपूरने का घेतली होती रेकी! तज्ज्ञांकडून जाणून घ्या, रेकी म्हणजे काय?

औषधांशी प्रक्रिया : बडीशेप आणि ओव्याच्या काही औषधांसह प्रक्रिया होऊ शकते, जसे की अँटीकोआगुलंट्स किंवा मधुमेहावरील औषधे. हे टाळण्यासाठी आपण कोणत्याही औषधासोबत बडीशेप किंवा ओव्याचे पाणी पिण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

गर्भधारणा आणि स्तनपान : गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहारात ओवा आणि बडीशेपचे पाणी समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटाच्या समस्या (Sensitive Stomachs) : पोटाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी ओवा-बडीशेपचे पाणी प्यायल्याने अस्वस्थता किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कमी प्रमाणात सेवन करून पाहावे आणि प्रतिक्रिया तपासावी, अशी शिफारस केली जाते.

Story img Loader