यकृत हे सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, जे तुम्हाला निरोगी ठेवते. यकृत हे अन्न पचवण्यास मदत करते, टाकाऊ आणि विषारी घटक शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करते, हार्मोन्स नियंत्रित करते, पोषक द्रव्ये साठवते, प्रथिनांचे आणि शरीराच्या नैसर्गिक रासायनिक अभिक्रियासाठी एंजाइमचे उत्पादन करते. पण, जर तुम्हाला फॅटी लिव्हर झाले तर त्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि यकृताचे नुकसान यांसारख्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात. तुमचे वजन जास्त असल्यास, आरोग्यास हानिकारक अन्न खाल्ल्यास, व्यायाम न केल्यास, खूप मद्यपान केले असल्यास किंवा कौटुंबिक इतिहास असल्यास फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते.

“फॅटी लिव्हर (स्टीटोसिस) ही समस्या तेव्हा होते, जेव्हा यकृताच्या पेशींभोवती फॅट्स जमा होतात आणि फॅट्सचे ऊर्जेत रुपांतर होण्याची प्रक्रिया मंदावते. या स्थितीची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे ही स्थिती अनेकदा लवकर समजत नाही. यामुळे फॅटसचे चयापचय करण्यासाठी जबाबदार असलेल्या या महत्त्वाच्या अवयवांवर जास्त ताण येतो. यामुळे पुढे स्टीटोहेपेटायटीस, फायब्रोसिस आणि सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग यांसारख्या संभाव्य गंभीर गुंतागुंतीची समस्या होऊ शकतात”, असे बंगळुरूच्या ॲस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या एचपीबी आणि प्रत्यारोपण फिजिशियन विभागाच्या सल्लागार डॉ. मल्लिकार्जुन सकपाळ यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
Ravi Raja Joins Bjp and Left Congress
Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला धक्का! रवी राजा यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
gharoghari matichya chuli fame reshma shinde will get marry kelvan photos viral
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

हेही वाचा – अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?

“लिव्हर स्कारिंग (Liver scarring) ज्याला यकृत फायब्रोसिस म्हणतात. जसजशी ही समस्या आणखी वाढते, तसतसे सिरोसिस होण्याचा धोका (यकृत कायमस्वरूपी खराब होण्याची स्थिती) लक्षणीयरीत्या वाढते. सिरोसिसमुळे यकृत निकामी होऊ शकते, गंभीर प्रकरणांमध्ये यकृत प्रत्यारोपण आवश्यक आहे”, असे डॉ. चंदन कुमार यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ते हैद्राबादमधील लकडी पूल जवळील ग्लेनेगल हॉस्पिटलच्या हेपॅटोलॉजिस्ट आणि लीड विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

“फॅटी लिव्हर होण्यामागे मधुमेह, लठ्ठपणा, खराब कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी, कुपोषण, खूप मद्यपान करणे, जलद वजन कमी करणे आणि काही औषधे घेणे यांसारखी अनेक कारणे समाविष्ट आहेत”, असे डॉ. राजीव कोविल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ते ‘रंग दे नीला’ उपक्रमाचे सह-संस्थापकआणि झांड्रा हेल्थकेअर डायबेटोलॉजीप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा –इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

कालांतराने, यकृताभोवती जास्त प्रमाणात फॅट्स जमा झाल्यामुळे दाहकता जाणवते किंवा सूज येऊ शकते आणि नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) होण्याचा धोका दर्शवतो. त्यामुळे फायब्रोसिस, सिरोसिस, यकृताचे कायमचे नुकसान, मूत्रपिंडाचे आजार, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, टाइप २ मधुमेह आणि यकृताचा कर्करोग यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो,” असे डॉ. कोविल म्हणाले.

थकवा, ओटीपोटात अस्वस्थता, मळमळ, भूक न लागणे, अनपेक्षित वजन कमी होणे, कावीळ आणि पचनाच्या समस्या यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. “तळलेले, प्रक्रिया केलेले आणि अस्वास्थ्यकर अन्न खाणे, ज्यामध्ये सोडियमचे भरपूर प्रमाण, साखरेचे भरपूर प्रमाण असते आणि चिप्स, फ्रेंच फ्राईज, पास्ता, पिझ्झा, कपकेक, ब्रेड, कँडी, सोडा, पाणीपुरी आणि वडा पाव यांसारखे प्रिझर्व्हेटिव्हज हे फॅटी लवकर येण्यास प्रोत्साहन देऊ शकतात, असे डॉ. कोविल यांनी नमूद केले.

काय करावे?

“या आजाराचे लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. फॅटी लिव्हर रोग बहुतेकदा मेटाबॉलिक सिंड्रोमशी संबंधित असतो, ज्यामध्ये उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा आणि असामान्य कोलेस्ट्रॉल पातळी यासारख्या परिस्थितींचा समावेश होतो. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहार, व्यायाम आणि वजन कमी केले, जीवनशैलीतील बदल केले तर परिणामकारकपणे हा आजार बरा होऊ शकतो”, असे डॉ. सकपाळ म्हणाले.

“स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार घेतल्याने संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते. दररोज ४५ मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करून, निरोगी वजन नियंत्रित करून आणि मद्यपानाचे प्रमाण मर्यादित करून फॅटी यकृत विकसित होण्याचा धोका टाळता येतो. हायड्रेशन महत्त्वपूर्ण आहे; एखाद्या व्यक्तीने दिवसातून किमान दोन-तीन लिटर पाणी प्यावे”, असे डॉ. सकपाळ म्हणाले.

यकृताच्या आरोग्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.