पॉलीफेसिक झोप म्हणजे काय?

पॉलीफेसिक झोपेमध्ये व्यक्ती पारंपरिक ७-९ तासांच्या सलग झोपेऐवजी दिवसात अनेकदा लहान कालवधीची डुलकी घेतो. यामध्ये एक लोकप्रिय पद्धत म्हणजे दर चार तासांनी २० मिनिटांची झोप घेणे. अशा प्रकारे दिवसातून फक्त दोन तासांची झोप होते. काहींना यामुळे कार्यक्षमता आणि सर्जनशीलता वाढल्याचे वाटते, मात्र वैद्यकीय तज्ज्ञ या पद्धतीला शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रासाठी हानिकारक मानतात.

ही संकल्पना चकित करणारी वाटत असली तरी, झोपेच्या सवयीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होत असताना शरीर आणि मनावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले की, “पॉलीफेसिक झोप ही झोपेची एक पद्धत आहे, ज्यामध्ये झोप वेगवेगळ्या सत्रांत विभागली जाते. पारंपरिक मोनोफेसिक (सलग सात-नऊ तासांची झोप) किंवा बायफेसिक (झोपण्याची दोन वेगवेगळी सत्रे) झोप ही या पद्धतीपेक्षा वेगळी असते. ‘एव्हरीमॅन स्लीप शेड्यूल’ या पद्धतीत दर चार तासांनी २० मिनिटांची झोप घेतली जाते.”

हेही वाचा –अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

u

u

शरीरावर होणारे परिणाम

डॉ. हिरेमठ चेतावणी देतात की, कमी झोपल्याने तुमच्या शरीराला हानी होते. यामुळे झोपेचा एकूण वेळ कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला REM (Rapid Eye Movement) झोपेवर अवलंबून राहता येते, जे शरीराला ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी पुरेसे नाही. या झोपण्याच्या पद्धतीला समर्थन करणाऱ्या काहींनी लक्ष केंद्रित करणे आणि उत्पादकता वाढवल्याचा दावा केला असताना वैज्ञानिक पुरावे बहुतेक व्यक्तींना जाणवणारे खालील परिणाम सुचित करतात

१. स्मरणशक्तीवर परिणाम : पॉलीफॅसिक पद्धतीने झोप घेतल्यास पुरेशी झोप न मिळाल्याने दीर्घकाळापर्यंत मेंदूच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो, ही प्रक्रिया खोल (स्लो-वेव्ह) झोपेदरम्यान उद्भवते. नेचर न्यूरोसायन्स (२०१७) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, “विस्कळीत झोपेची चक्रे हिप्पोकॅम्पल (मेंदूचा स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचा भाग) क्रियाकलापांमध्ये अडथळा आणतात, जी स्मरणशक्ती महत्त्वपूर्ण आहे.

२. लक्ष व निर्णयक्षमता घटते :

विस्कळीत झोपेमुळे मेंदूवर कामाचा ताण वाढतो, मेंदूच्या प्रतिक्रिया देण्याचा वेळ वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. जर्नल ऑफ स्लीप रिसर्च (२०२०)च्या अभ्यासानुसार, “अशा झोपेच्या पद्धतीमुळे मेंदूची समस्या सोडवण्याची क्षमता व कार्यक्षमता घटते.”

हेही वाचा –Immunity Boosting Food : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

३. शारीरिक बदल :

डॉ. हिरेमठ यांच्या मते, “पॉलीफॅसिक झोपेचे वेळापत्रक पुरेशी ऊर्जा न मिळाल्याने अनेक शारीरिक बदल घडवून आणू शकतात.”

अशा झोपेमुळे शरीरात कॉर्टिसॉल (ताण निर्माण करणारे हार्मोन) पातळी वाढते, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी बिघडते, तणाव वाढतो आणि थकवा जाणवतो. विस्कळीत झोप रोगप्रतिकारक शक्ती कमी करते, सायटोकिन्स (रोगांशी लढणारे प्रथिने) उत्पादन घटते आणि आजार होण्याचा धोका वाढतो.

दीर्घकालीन परिणाम

सर्केडियन रिदम हे शरीराचे झोपेतून जागे होण्याचे चक्र नियंत्रित करते. डॉ. हिरेमठ हायलाइट करतात की, “पॉलीफॅसिक झोप हे सर्केडियन रिदममध्ये व्यत्यय आणते,” ज्यामुळे:

१. सर्केडियन रिदम बिघडते:

शरीर एक स्थिर वेळापत्रक राखण्यासाठी धडपडते, पुरेशी झोप न मिळाल्याने परिणामी हार्मोनल असंतुलन, थकवा आणि मूड विकार होतात. A Sleep Medicine Reviews (2020) अभ्यासावर जोर देण्यात आला आहे की, “दीर्घकाळापर्यंत सर्केडियन व्यत्यय मेटाबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा धोका वाढवतो.”

२. झोपेची कमतरता :

अशा झोपेमुळे झोपेची उणीव निर्माण होते. याचा परिणाम शरीरातील पेशी दुरुस्तीस, ग्लिम्फॅटिक सिस्टमद्वारे मेंदूतील विषारी घटकांच्या सफाईला आणि भावनिक समतोलावर होतो.

हेही वाचा – सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

लाइफस्टाइलहेल्थ

३. मानसिक आरोग्यावर परिणाम :

दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि चिंतेची समस्या निर्माण होते. जर्नल ऑफ क्लिनिकल सायकियाट्री (२०१९) च्या अभ्यासानुसार, अशा झोपेमुळे मूड डिसऑर्डर वाढू शकतात.

कोणासाठी हानिकारक?

लहान मुले, किशोरवयीन व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जुन्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी पॉलीफेसिक झोप विशेषतः हानिकारक ठरते. अल्पकालीन तणावपूर्ण परिस्थितीत शिफ्ट वर्कर्स किंवा सैन्यातील व्यक्तींसाठी ही पद्धत कधी कधी उपयुक्त ठरू शकते, पण दीर्घकाळासाठी आरोग्यासाठी ती धोकादायकच असते, असे डॉ. हिरेमठ सांगतात.

Story img Loader