बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. कामावर वेळेत जाण्यासाठी होणारी धावपळ, या धावपळीत शरीराला हवा तसा व्यायाम करायला वेळ न भेटणं. वेळेवर जेवण न करता बाहेर काहीतरी खाऊन वेळ मारुन नेणं, अशा अनेक चुकीच्या सवयींचे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यापैकी एक म्हणजे सतत होणारी गुडघेदुखी. वयस्कर लोकांप्रमाणे सध्या हा त्रास तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या त्रासाचं एक लक्षण म्हणजे तुमच्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो.
पायऱ्यांवर चढताना किंवा उतरताना, मांडी घालून बसताना, गुडघ्यांमधून आवाज येण्याच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागतो. अनेक वेळा आपण या आवाजाकडे दुलर्क्ष करतो. मात्र, गुडघ्यामधून आवाज येणं हे कधीकधी गंभीर समस्येचं कारण असू शकतं याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
हेही वाचा- कांद्याच्या रसाने खरोखरचं केस गळणे थांबतात का? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच
तज्ञांचे मते गुडघ्यांमधून आवाज येण्याच्या समस्येला ‘कॉन्ड्रेमलेशिया पटेला’ (chondromalacia of patella) असं म्हणतात. या स्थितीत गुडघ्याची वाटीच्या आतल्या भागात मऊपणा असतो. त्यामुळे गुडघ्याच्या पुढच्या भागात वेदना होतात. कॉन्ड्रेमलेशिया पटेलामध्ये, गुडघा मांडीच्या हाडावर सरकतो ज्याला फीमर असं म्हणतात. ज्यामध्ये गुडघा मांडीच्या हाडावर सरकतो आणि तिथे घासायला सुरूवात करतो.
कॉन्ड्रेमलेशिया पटेलाची लक्षणे –
गुडघ्यांच्या समोरच्या किंवा बाजूच्या भागात वेदना होणे. अनेकवेळा या दुखण्याचा त्रास इतका वाढतो की जमिनीवर बसणं आणि पायऱ्या चढणं कठीण होऊन जातं. गुडघ्यांतून कटकट असा आवाज येतो. तसंच गुडघे आणि सांधे सूजतात.
त्रास होण्याची कारणे –
हेही वाचा- हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल? फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या
स्नायू कमजोर झाल्यामुळे, पायाची बाहेर आणि आत हालचाल करण्यासाठीची जबाबदारी असणाऱ्या स्नायूंमध्ये असंतुलन असणे. जास्त धावल्यामुळे तसंच जास्त उड्या मारल्यामुळे गुडघ्याच्या सांध्यामध्ये तणाव येतो. किंवा गुडघ्याला काही जोराचा मार लागला तरी हा त्रास जाणवतो.
हालचालीचा अभाव –
अनेक तरुणांचे काम बैठे असल्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. यामुळे त्यांना गुडघे दुखण्याचा किंवा गुडघ्यातून आवाज येण्याचा त्रास जाणवतो. या समस्या टाळायच्या असतील तर त्यासाठी दररोज गुडघ्याचा व्यायाम करणं आवश्यक आहे. मात्र, अनेकजण जीममध्ये किंवा इतर ठीकाणी अचानक गुडघ्याचा व्यायाम करायला सुरुवात करतात. ज्यामुळे गुडघे दुखू लागतात. शिवाय गुडघे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असून आपल्या संपूर्ण शरीराचे वजन उचलण्याचे काम गुडघे करतात असंही तज्ञ सांगतात त्यामुळे या गुडघ्यांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. करते.
या समस्येवर उपाय काय?
हेही वाचा- हिवाळ्यात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे
गुडघ्याच्या जुन्या दुखापतीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपणाला कॉन्ड्रेमलेशिया पटेलाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यासाठी डॉक्टरांना भेटणं त्यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय यासाठी यासाठी एक्स-रे आणि एमआरआय स्कॅनही करणे जरुरी असते. शिवाय साधे उपचार आणि व्यायामानेदेखील ही समस्या दूर होऊ शकते.
अशी घ्या काळजी –
विटॅमिन ‘डी’ – विटॅमिन ‘डी’ हाडांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. सूर्यप्रकाश हा विटॅमिन ‘डी’चा सर्वोत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे दररोज रोज ३० मिनिटं उन्हात बसणं आवश्यक आहे.
वजन उचलणे टाळा – गुडघेदुखीची समस्या भेडसावत असेल, तर तुम्ही जास्तीचे वजन उचलणे टाळा. जेणेकरुन तुमच्या गुडघ्यावर जास्त ताण येणार नाही.
योग्य आहार – नियमित योग्य आहार घ्या, तुमच्या आहारात फळे, भाज्या, काजू इत्यादींचा समावेश करणे गरजेचं आहे.