Manoj Pahwa Fitness Story : मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांना तुम्ही अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहिले असेल. हे दोन्ही दिग्गज अभिनय क्षेत्रातील कलाकार खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत. चित्रपट, थिएटर व टेलिव्हिजनमधील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे मनोज पाहवा यांनी अलीकडेच एका प्रोजेक्टवर काम करताना त्यांच्या फिटनेस प्रवासाविषयी एक विनोदी किस्सा सांगितला (Fitness Story) . ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत, त्यांच्या फिटनेस ट्रेनरने काही दिवसांनंतर त्यांचे सेशन कसे सोडले याबद्दल सांगितले. कारण- मनोज पाहवा यांच्या नाश्त्याच्या दिनचर्येमुळे त्यांच्या वर्कआउटवर पडदा पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनोज आणि त्यांचे सहकलाकार निनाद कामत या दोघांनी स्वतःला थोडे फिट ठेवण्याचे ठरवले. स्टाफबरोबर (कर्मचारी) ते एक कर्मचारी घेऊन गेले आणि निनाद, मनोज यांनी एक ट्रेनर शेअर केला. परंतु, तो ट्रेनर एक महिन्यानंतर पाच किलो वाढवून गेला. कारण- इथे त्याची ड्युटी होती की, ‘माखन भोग’ येथे जाऊन, तिथे बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या, कचोरी घेऊन येणे. ७ वाजता शूटिंगला येण्याआधी कचोरी विक्रेत्याकडे यायचे. “आम्ही सेटवर जात आहोत. तुम्ही एक काम करा, ७ किंवा ७ वाजून ३० मिनिटांनी २० ते २५ कचोरी घेऊन या”, असे मनोज फिटनेस ट्रेनरला म्हणायचे (Fitness Story). त्यामुळे मनोज यांचा फिटनेस ट्रेनर त्यांच्यासाठी एक तात्पुरता स्पॉटबॉय बनला होता. मनोज यांच्या पत्नी सीमा म्हणाल्या, “तो पळून गेला आणि म्हणू लागला ‘मी काय करू. माझी वाट लावून टाकली’ आणि १० ते १५ दिवसांत तो ट्रेनर निघून गेला.”

तर ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रश्न हा उभा राहतो की, अनियमित वेळापत्रक आणि आहाराचे सेवन करताना फिटनेस राखण्यासाठी तुम्ही कसा प्लॅन केला पाहिजे?

तर हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, सल्लागार, आहारतज्ज्ञ व सर्टिफाइड डायबेटीस एज्युकेटर (certified diabetes educator), कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. अनियमित वेळापत्रक आणि आनंदाने फिटनेस (Fitness Story) राखण्यासाठी धोरणात्मक नियोजन आवश्यक आहे (Fitness Story). त्यासाठी हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT)सारख्या लहान, प्रभावी वर्कआउट्सना प्राधान्य द्या. अगदी १५ ते ३० मिनिटांसाठी त्यांना नॉन-निगोशिएबल अपॉइंटमेंट म्हणून हाताळा.

फळे, भाज्या, लिन्स प्रोटिन्स (lean proteins) आणि संपूर्ण धान्यांवर लक्ष केंद्रित करून, आरोग्यदायी पर्यायासाठी न्यूट्रिएंट डेन्स (nutrient-dense) जेवण आधीच तयार करा. दिवसातून लहान हालचाली करून सक्रिय राहा. शेवटी संपूर्ण आरोग्य आणि कार्यक्षमतेला समर्थन देण्यासाठी उत्तम झोपेला प्राधान्य द्या (Fitness Story) . या उपायांमुळे व्यग्र जीवनशैली असूनही फिटनेस राखला जातो.

कचोरी, पुरी यांसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे दीर्घकालीन आरोग्य आणि वजन कमी करण्यावर कसा परिणाम करतात?

कचोरी आणि पुरी यांसारख्या जड, तळलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने दीर्घकालीन आरोग्य आणि वजन कमी करण्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, (Fitness Story ) कनिक्का मल्होत्रा ​​म्हणतात की, तळलेल्या पदार्थांमध्ये सामान्यत: कॅलरी, अनहेल्दी फॅट्स, ट्रान्स फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे कॅलरीजचे सेवन वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब यांच्यावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांमुळे टाईप-२ चा मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन स्थिती विकसित होण्याचा धोका जास्त असतो.

कनिक्का मल्होत्रा ​​पुढे सांगतात की, तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे धमन्या बंद होऊ शकतात आणि चयापचय प्रक्रियेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. तसेच चरबी साठवली जाून, भूक वाढते. त्याशिवाय अनेक तळलेल्या स्नॅक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या मैद्यासारख्या घटकांतील ग्लायसेमिक इंडेक्सने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, तसेच वजन वाढू शकते. चयापचयाचे विकारही वाढू शकतात. त्यामुळे सस्टेनेबल (शाश्वत) वजन व्यवस्थापन (sustainable weight management) साध्य करण्यासाठी आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी अशा पदार्थांचे मर्यादित प्रमाणातच सेवन केले पाहिजे.

निरोगी जीवनशैलीसाठी पारंपरिक पदार्थांमध्ये बदल करण्याचे आरोग्यदायी मार्ग –

चवीशी तडजोड न करता पारंपरिक पदार्थांना आरोग्यदायी बनवण्यासाठी, कनिक्का मल्होत्रा ​​सुचवितात की, पर्यायी धान्यांच्या जागी संपूर्ण धान्य (उदा. तपकिरी तांदूळ किंवा संपूर्ण गव्हाचे पीठ) आणि चिकन किंवा टर्की (chicken or turkey)सारखे पातळ प्रथिने असलेले उच्च चरबीयुक्त मांस आदी पौष्टिकता, चव वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे या पदार्थांमध्ये भाज्यांचा समावेश करा.

“अनारोग्यकारक फॅट्स कमी करण्यासाठी तळण्याऐवजी बेकिंग, वाफवणे किंवा ग्रिलिंग यांसारख्या आरोग्यदायी स्वयंपाक पद्धतींचा पर्याय निवडा. भाज्या किंवा सॅलड्सयुक्त नियंत्रित खाण्याचा सराव करा. अधिक मीठ किंवा चरबीऐवजी औषधी वनस्पती, मसाले, लिंबूवर्गीय फळे वापरून चव वाढवा, निरोगी जीवनशैलीचे समर्थन करताना अन्न स्वादिष्ट आणि समाधानकारक राहील याची खात्री करा” ; असे कनिक्का मल्होत्रा सांगतात.