Constipation Relief Home Remedies : आरोग्या चांगलं राहण्यासाठी शरीरात आतड्यांची हालचाल योग्य पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक असतं. जर एखाद्या व्यक्तीला दिर्घकाळापासून आतड्यांचे आजार असतील, तर त्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे पचन क्रियेतली अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन आणि मोठ्या प्रमाणात फायबर असलेल्या अन्नपदार्थांचं पुरेसं सेवनं न केल्यामुळं बद्धकोष्ठतेसारखा आजार डोकं वर काढतो. तणाव, हार्मोनल चेंजेस आणि पचन क्रियेच्या समस्येमुळं बद्धकोष्ठता होऊ शकते. ताणतणाव, हार्मोनल चेंजेस आणि पचन क्रियेच्या समस्येमुळं बद्धकोष्ठतासारखे आजार होऊ शकतात. यावर उपाय म्हणून या पाच गोष्टी तुम्ही फॉलो करु शकता.
१) पाणी पिणे : दिवसभर हायड्रेटेड राहण्यात अनेकांना समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून तुम्ही भरपूर पाणी पिऊ शकता. विशेषत: सकाळी गरम किंवा कोमट पाण्याचं सेवन करणं या समस्येपासून दिलासा देऊ शकतं. पाणी पिल्यावर शरीरात डिहायड्रेशन आणि आतड्यांची हालचाल चांगली राहू शकते.
२) लिंबू पाणी : लिंब्याचा रस पिल्यावर तुमच्या शरीरातील पचन क्रिया चांगली राहते. तसंच शरीरातील टॉक्सीन्स बाहेर फेकायलाही मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी लिंबू पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात लेमन ज्यूस टाकून त्यांचं सेवन करावं. लिंबू पाणी पिल्यावर शरीराल पोषक द्रव्ये मिळतात. ज्यामुळं बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दिलासा मिळू शकतो.
३) केळी खाणे : पिकलेली केळी खाणे बद्धकोष्ठतेसारख्या गंभीर समस्येसाठी रामबाण उपाय ठरु शकतं. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पचन क्रियेतही अडथळा निर्माण होत नाही. केळी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण बद्धकोष्ठता असलेल्या व्यक्तींसाठी केळ्याचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.
४) कॉफी : एक कप गरम कॉफी पिल्याने बद्धकोष्ठतेपासून दिलासा मिळू शकतो. शरीरात आतड्यांची हालचाला योग्य पद्धतीने होण्यासाठी कॉफीचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. कॉफी पिणे शरीरातील चरबी कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते.
५) व्यायाम : आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यावर पोटातील मसल्स मजबूत राहतात. तसेच शरीरात योग्य प्रकारे रक्तस्त्राव सुरु राहतो. योग्य व्यायाम आणि सकस आहाराचं सेवन केल्यावर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.