मान्सूनचे आगमन होताच उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका मिळते, पण त्याचबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात; विशेषत: आपल्या डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या. वाढलेली आर्द्रता आणि ठिकठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी, अशा वातावरणामुळे डोळ्यांना विविध प्रकारचे संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरणारी परिस्थिती निर्माण होते. या आजारांमुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि उपचार न केल्यास, संभाव्यतः अधिक त्रास होऊ शकतात. अथ्रेया (Athrey) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या नेत्रतज्ज्ञ डॉ. नव्या सी. पावसाळ्यात वाढणाऱ्या पाच सामान्य डोळ्यांच्या संसर्गाबद्दल आणि तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी धोरणांबद्दल सांगतात.

डॉ. नव्या सांगतात की, “पावसाळ्यात डोळ्यांना संसर्गाचा धोका वाढतो. हे कोणते संसर्ग आहेत? ते कसे पसरतात आणि ते रोखण्यासाठी काय उपाय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Ravi Rana amravati unhappy, Ravi Rana latest news,
Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त

पावसाळ्यात होणारे पाच सामान्य प्रकारचे डोळ्यांचे संसर्ग

डोळे लाल होणे (Pink Eye): या संसर्गामुळे डोळ्यांना लालसरपणा, खाज सुटणे, पाण्यासारखा स्त्राव आणि डोळे चुरचुरत असल्याचे जाणवणे. संक्रमित व्यक्तीच्या
थेट संपर्कात आल्यास त्याचा प्रसार होतो.

जीवाणूजन्य संसर्ग (Bacterial Conjunctivitis) : जीवाणू संसर्गामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात होणारी दाहसारखी लक्षणे दिसतात. हे बहुतेकदा जाड, पिवळसर स्त्राव दर्शवते आणि प्रतिजैविक (Antibiotic) उपचारांची आवश्यकता असू शकते.

स्टाय (Stye): तेल ग्रंथींच्या जीवाणू संसर्गामुळे पापणीवर वेदनादायक लाल फोड येतो. ते थोडे मोठे झाल्यास सूज येते, दृष्टी अंधूूक होऊ शकते.

फंगल केरायटिस (Bacterial Conjunctivitis) : कॉर्नियाचा हा संसर्ग (डोळ्याच्या पुढच्या भागत स्पष्टपणे दिसतो) बुरशीमुळे होतो. यामुळे वेदना, लालसरपणा, अंधूक दृष्टी, प्रकाश संवेदनशीलता आणि स्त्राव होऊ शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स परिधान करणारे विशेषतः संवेदनाक्षम असतात.

(हेही वाचा – दही खरोखरच थंड आहे की ते शरीरामध्ये उष्णता वाढवते? दह्याचा शरीरावर कसा होता परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….)

डोळे कोरडे पडणे (Dry Eye) : हा जरी संसर्ग नसला, तरी डोळे कोरडे होण्याचा त्रास असेल तर पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता त्याची लक्षणे आणखी बिघडवू शकतो. हे घडते कारण आर्द्रता अश्रूंच्या बाष्पीभवनास अडथळा आणते, ज्यामुळे डोळ्यावर पाण्याचा थर तयार होतो, जो त्वरीत बाष्पीभवन होतो आणि डोळ्याचा पृष्ठभाग कोरडा राहतो.

डोळ्यांची सौम्य जळजळ आणि डोळ्यांना गंभीर संसर्ग झाला आहे हे कसे ओळखावे?

डॉ. नव्या यांच्या मते, डोळ्यांची सौम्य जळजळ होत असेल तर सामान्यतः “लालसरपणा, खाज सुटणे आणि पाणी येणे यांचा समावेश होतो. मेडिकलमध्ये मिळणारे डोळ्यात टाकण्यासाठीचे औषध(Eye Drop) किंवा warm compresses वापरून ही लक्षणे सामान्यत: काही दिवसात दूर होतात.”

डोळ्यांना गंभीर संसर्गाच्या बाबतीत, तीव्र वेदना, प्रकाश सहन न होणे, अंधूक किंवा कमी दृष्टी आणि जाड किंवा रंगीत स्त्राव अशी लक्षणे दिसतात. “तुम्हाला ही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. उपचारात उशीर केल्याने कॉर्नियाचे नुकसान किंवा दृष्टी कमी होणे यांसारख्या गुंतागूंत होऊ शकतात,” अशी चेतावणी डॉ. नव्या देतात.

तुम्हाला खात्री नसल्यास सावधगिरी बाळगा आणि डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते स्थितीचे अचूक निदान करू शकतात आणि योग्य उपचारांची शिफारस करू शकतात.

पावसाळ्यात निरोगी डोळ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय

पावसाळ्यात तुमच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी काही सोप्या, पण प्रभावी सवयींचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे डॉ. नव्या सांगतात.

हाताची स्वच्छता : आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवा, विशेषत: डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी. जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डोळे चोळणे टाळा.

इतरांना टॉवेल, रुमाल किंवा डोळ्यांचा मेकअप देणे टाळा : टॉवेल, रुमाल किंवा डोळ्यांचा मेकअप, इतरांचा मेकअप शेअर करू नका. या वस्तू सहजपणे संक्रमित होऊ शकतात.

स्वच्छता : तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. विशेषतः तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येणारे पृष्ठभाग जसे की फोन स्क्रीन, दरावाज्याचे हँडल यांसारख्या वारंवार स्पर्श केलेल्या वस्तू नियमितपणे निर्जंतूक करा.

कॉन्टॅक्ट लेन्स काळजी : तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यास कडक स्वच्छता पद्धतींचे पालन करा. निर्देशानुसार तुमचे लेन्स स्वच्छ आणि निर्जंतूक करा आणि दूषित होण्याचा धोका कमी करण्यासाठी दररोज डिस्पोजेबल लेन्स वापरण्याचा विचार करा.

संरक्षणात्मक चष्मा वापरा : पाऊस, वारा आणि संभाव्य त्रासांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी घराबाहेर असताना सनग्लासेस घाला

Story img Loader