5 Foods To Eat on Empty Stomach: तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर तुमचा दिवस कसा जाईल हे काही प्रमाणात अवलंबून असते. सकाळीच योग्य पदार्थ निवडून खाल्ल्याने एकूण आरोग्यावर सुद्धा लक्षणीय परिणाम होत असतो. विशेषतः रिकाम्या पोटी आपण सर्वात आधी काय खाता हे पाहणे महत्त्वाचे असते. यावर आपली चयापचय क्रिया, दिवसभराची ऊर्जा पातळी, भूक अवलंबून असते. पोषणतज्ज्ञ साक्षी लालवानी यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर सकाळी उठताच काय खायला हवे याविषयी सांगितले होते. आहारतज्ज्ञ आणि मदरहूड हॉस्पिटल्स, गुडगाव येथील सल्लागार, निशा मंडल, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करताना रिकाम्या पोटी काय खाल्ल्यास कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रिकाम्या पोटी ‘या’ पाच पदार्थांचे सेवन ठरू शकते फायदेशीर
जायफळ पूड
रिकाम्या पोटी जायफळाचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचनासाठी मदत करणाऱ्या एन्झाईम्सचे उत्पादन वाढते. जठराच्या हालचाली वाढून पचनाचा वेग वाढण्यास सुद्धा मदत होऊ शकते. विशेषतः ज्यांना अपचन व पोट फुगण्याची सतत तक्रार असते अशा लोकांनी जेवणाच्या आधी सुद्धा जायफळ पावडर खावी. जायफळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तसेच शरीरातील दाह कमी होण्यास मदत होऊ शकते. लक्षात घ्या गर्भारपणात रिकाम्या पोटी जायफळ खाणे टाळायला हवे तसेच सामान्य स्थितीत शुद्दच दररोज केवळ १ मिग्रॅ इतक्याच प्रमाणात जायफळ पावडरचे सेवन करावे अन्यथा यामुळे आतड्यांच्या संबंधित तक्रारी जाणवू शकतात.
अंजीर
मंडल पुढे सांगतात की, अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यात पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. सकाळी काहीही खाण्याआधी अंजीर खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहू शकते. गर्भवती महिलांना लोह, फोलेट आणि फायबर समृद्ध अंजीर खाल्ल्याने संभाव्य फायदे मिळू शकतात. गर्भाच्या विकासास समर्थन मिळणे आणि न्यूरल ट्यूब दोष टाळणे या फायद्यांचा यात समावेश असतो. रिकाम्या पोटी, अंजीर खाल्ल्याने आतड्याची चांगली हालचाल होऊन पचनास मदत होऊ शकते तसेच दिवसभरात उच्च ऊर्जा पातळी राखण्यासाठी सुद्धा याची मदत होते.
मेथीचे दाणे व आलं
मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याच्या आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यात मदत करू शकतात. दुसरीकडे आल्याच्या सेवनाने सकाळी उठताच होणारी मळमळ थांबवता येऊ शकते. आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म जे पचनातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. मेथीचे दाणे आणि आल्याचं एकत्र सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास फायदा होऊ शकतो. गर्भवतींनी रिकाम्या पोटी याचे सेवन करू नये.
हलीम
हलीमच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आणि ई यांसह पोषक घटक असतात, जे निरोगी रक्त आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. याव्यतिरिक्त, हलीम बियांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते जे श्वसन आरोग्य सुधारण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. न्याहारीपूर्वी हलीमचे सेवन केल्यास नाष्ट्यातील पोषक तत्वांचे नीट शोषण होण्यास मदत होऊ शकते. व्हिटॅमिन सी समृद्ध फळांसह याचे सेवन केल्याने पचनास मदत होते आणि हलीम बियांमधून लोहाचे शोषण वाढते. दररोज एक चमचे हलीम बियाणे ६० टक्के लोहाची गरज पूर्ण करते, ज्यामुळे ते गर्भधारणेदरम्यान फायदेशीर ठरते.
काळ्या चण्याची पावडर
काळ्या चण्याच्या पावडरने तुमचा दिवस सुरू केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात, पचन सुधारण्यास आणि उच्च फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. या कहाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर असल्याने याचाही शरीराला फायदा मिळू शकतो. काळे चणे रात्रभर भिजवून खाल्ल्यास आतड्यांच्या हालचालीला मदत होऊ शकते ज्यामुळे पचन सुधारते. काळ्या चण्याच्या सेवनाने लघवीचे प्रमाण वाढून शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होऊ शकते परिणामी मूत्रपिंडाचे आरोग्य सुद्धा सुधारू शकते.
हे ही वाचा<< एक महिना दुध, दही, चीज, बटर खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतील? वजनापासून ते आजारांपर्यंत परिणाम वाचा
लक्षात घ्या, आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी तुमच्या आरोग्य स्थितीची पूर्णपणे माहिती असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा आवर्जून घ्या. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जी असल्यास त्यानुसार आहाराचे नियोजन करावे.