Food to Avoid in Morning: योग्य आहार हा उत्तम आरोग्यासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळेच कोणती गोष्ट कधी खावी, याचे काही अलिखित नियम आहेत. अनेकदा आपल्याला भूक लागलेली असते. अशा वेळी आपण रिकाम्या पोटी वाटेल ते खातो. मात्र, रिकाम्या पोटी काहीही खाणे धोकादायक ठरू शकते याची कल्पना तुम्हाला आहे काय? काही वेळा ते तुमच्या जीवावरही बेतू शकतं. पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, तुम्हाला माहिती आहेत का? निरोगी राहण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची खबरदारी घ्यावी लागते. रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत, याच विषयावर डॉ. पाटील यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. तेव्हा ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ…

उपाशीपोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पाच पदार्थ!

१. मसालेदार पदार्थ

अनेकांना चटपटीत, मसालेदार खाणे पसंत असते. मात्र, मसालेदार अन्न कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण- मसालेदार अन्नामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी

२. कॉफी

सकाळी उठल्यावर अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. अनेकांना सकाळ, संध्याकाळ आणि अगदी दुपारीही कॉफी लागते. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अपचन आणि पोटाचा त्रास होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे पचनक्रियाही बिघडते. अपचनामुळे अनेक समस्यांची सुरुवात होते.

(हे ही वाचा : रोज सकाळी लिंबासह नारळपाणी सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार? एकदा समजून घ्या फायदे व तोटे )

३. चहा

चहा अॅसिडिक असल्याने रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरीराचा अॅसिडिक बॅलन्स बिघडतो. त्यामुळे तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि शरीरातील अनेक पेशींना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ मधुमेहाचा धोका वाढतो. तेव्हा उपाशी पोटी चहा पिऊ नये.

४. तळलेले पदार्थ

सकाळी उठल्यावर जे पाहिजे ते खा; पण तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका. सकाळी उठल्याबरोबर तळलेले अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्ही दिवसभर पोटाच्या समस्यांना बळी पडू शकता. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर तळलेले पदार्थ खाऊ नका.

५. कोल्ड ड्रिंक

सकाळची सुरुवात कधीही थंड पेय किंवा थंड पाण्याने करू नये. असे केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. सकाळी उठल्यावर तोंड न धुता, रिकाम्या पोटी फ्रिजचे पाणी पिऊ नये. असे केल्यास तुमच्या आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते. रिकाम्या पोटी फ्रिजमधील पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तसेच पोटासंबंधीच्या इतर समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.