Cholesterol Removing Fruits: कोलेस्ट्रॉल हा एक चिकट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकार, रक्तवाहिनीचे आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लठ्ठपणा, जास्त घाम येणे, त्वचेचा रंग बदलणे, छाती व पाय दुखणे असे त्रास होऊ शकतात. जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते तेव्हाहृदयविकार आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉलमुळे अन्य अवयवांवर परिणाम होऊन भविष्यात ऑपरेशन करण्यापर्यंत कष्ट पडू शकतात. त्याआधीच तुम्हाला शौचावाटे कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकायचे असेल तर त्यासाठी काही उपयुक्त फळांचे सेवन करायला हवे.
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणानंतर तुम्ही फळ खाल्ल्यास पुन्हा मध्ये मध्ये लागणारी भूक कमी होते परिणामी तुम्हाला उत्तम डाएट व वेळेवर जेवण असे रुटीन बनवता येऊ शकते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणारी फळे कोणती पाहूया…
1) फायबर युक्त फळे (Fiber Rich Fruits)
निरोगी हृदयासाठी निरोगी आहार राखणे महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होऊ शकते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आपल्या आहारात विरघळणारे फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. सफरचंद आणि नाशपाती सारख्या फळांमध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर मुबलक असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, फायबर-समृद्ध अन्न, रक्तदाब संतुलित ठेवण्यास व तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.
2) बेरी (Berries)
बेरी या फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या बायोएक्टिव्ह रसायनांचे पौष्टिक स्त्रोत आहेत. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे हृदयरोग आणि जुनाट आजार टाळण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडेंट युक्त बेरी कोलेस्टेरॉलची पातळी आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी इत्यादी खाणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.
3) केळी (Banana)
केळी हे एक अष्टपैलू आणि खाण्यास सोपे फळ आहे ज्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे, फायबर आणि सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लुकोज सारख्या नैसर्गिक शर्करा असतात. केळी पोटॅशियमचे उत्कृष्ट स्त्रोत देखील आहेत जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम सारखे अतिरिक्त पोषक देखील असल्याने यामुळे शरीराला आम्लावर मात करण्यास मदत होते.
4) लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruits)
संत्री आणि लिंबू अशा लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यात अँटिऑक्सिडंट गुण असतात जे हानिकारक एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतात. तसेच निरोगी कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमधील व्हिटॅमिन सी देखील हृदयरोग आणि रक्तदाबाचा धोका कमी करते.
हे ही वाचा<< बीटरूट खाऊन वजन वेगाने होते कमी? हृदय व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सेवनाची ‘ही’ योग्य पद्धत पाहा
5) अवाकाडो (Avocado)
अवाकाडो हे पोषक तत्वांचे उत्तम शोषक म्हणून ओळखले जाते आणि आपल्या शरीराला आपल्या आहारातून योग्य पोषक तत्वे मिळविण्यात मदत करतात. अवाकाडो हा हृदयासाठी फायदेशीर मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. ते शरीराला आहारातील इतर पोषक तत्वे शोषून घेण्यास आणि (HDL) आणि (LDL) कोलेस्ट्रॉल पातळी दोन्ही नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)