आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास मिठाच्या पाण्याने करणे ही एक अशी सवय आहे, ज्याच्या संभाव्य आरोग्य फायद्यांमुळे सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मिठाचे पाणी योग्यरित्या तयार केले आणि संयमाने प्रमाणात सेवन केल्यास शरीरासाठी अनेक फायदे होऊ शकतात. शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यापासून ते पचनक्रियेत सुधारणांपर्यंत मिठाचे पाणी पिण्याच्या अनेक फायद्यांमुळे आरोग्य आणि निरोगीपणाची काळजी घेणार्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे.
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हेरनो ऑफिशियलच्या वरिष्ठ पोषणतज्ज्ञ साधना सिंग यांनी सांगितले की, “साधे पाणी पिणे हे शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आवश्यक असताना, खारट पाणी इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्याचादेखील फायदा देते. जे नियमित व्यायाम करतात, खूप घाम गाळतात किंवा गरम हवामानात राहतात, त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. हर्बल टीमध्ये वापरलेल्या औषधी वनस्पतींवर अवलंबून असते की त्या विविध आरोग्य फायदे देऊ शकतात; परंतु ते खारट पाण्यासारखे इलेक्ट्रोलाइटची भरपाई करू शकत नाही. “हर्बल टीबरोबर मीठ-पाणी एकत्र करणे किंवा ते वेगवेगळ्या वेळी सेवन करणे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी एक चांगला दृष्टिकोन देऊ शकते.”
सकाळी मीठ-पाणी पिण्याचे पाच आरोग्य फायदे (Five health benefits of drinking salt water in the morning)
सिंग यांनी सांगितले की, “सकाळी मिठाचे पाणी पिण्याचे काही विशिष्ट फायदे असू शकतात:
मिठाचे पाणी शरीरातील पाण्याची पातळी राखते आणि इलेक्ट्रोलाइटची भरपाई करते. (Hydration and Electrolyte Balance)
सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराइडसारखे इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यासाठी मीठ-पाणी मदत करते. इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याची पातळी राखते आणि मज्जातंतूचे कार्य आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी देखील ते आवश्यक आहेत.
व्यायाम केल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते, कारण या क्रियांमुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात.
पाचक आरोग्य (Digestive Health)
मिठाचे पाणी पोटात पाचक एन्झाईम्स आणि हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन उत्तेजित करू शकते, पचनक्रिया सुधारण्यास आणि अन्नातील पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते.
आतड्यांमध्ये पाणी खेचून, मल मऊ करून बद्धकोष्ठता (constipation) कमी होण्यास मदत होते.
त्वचेचे आरोग्य
मिठाच्या पाण्यातील खनिजे त्वचेची स्थिती, जळजळ कमी करून आणि बरे होण्यास प्रोत्साहन देऊन एक्जिमा (eczema) आणि सोरायसिस (psoriasis ) सारख्या स्थिती सुधारण्यास मदत करू शकतात.
त्वचेचे पीएच पातळी हायड्रेट करून आणि संतुलित करून त्वचेच्या संपूर्ण आरोग्यासाठीदेखील ते योगदान देऊ शकते.
श्वसन आरोग्य
मिठाच्या गुळण्या करण्यामुळे घसा खवखवणे आणि श्वसन मार्गातील दाहकता कमी होण्यास मदत होते.
हे घशातील श्लेष्मा साफ करण्यास मदत करू शकते.
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते (Detoxification)
मिठाचे पाणी सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून काम करू शकते, लघवीचे उत्पादन वाढवते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते.
मिठाचा प्रकार आणि सेवनाची योग्य पद्धत (Type of salt and recommended for this practice)
“हिमालयीन गुलाबी मीठ किंवा समुद्री मीठ यांसारख्या अपरिष्कृत क्षारांची निवड करा, ज्यात अतिरिक्त आरोग्य फायदे देऊ शकतील असे खनिजे असतात. टेबल मीठ (table salt) वापरणे टाळा. या मिठावर भरपूर प्रक्रिया केली जाते आणि ही खनिजे काढून टाकली जातात,” अशी शिफारस सिंग यांनी केली आहे.
थोड्या प्रमाणात सेवन करण्यास सुरुवात करा. सुमारे १/४ चमचे मीठ एक कप कोमट पाण्यात विरघळते. सहन होत असल्यास तुम्ही हळूहळू प्रमाण अर्धा चमच्याने वाढवू शकता. पण, आपल्या शरीरामध्ये होणारे बदल किंवा संकेत याकडे लक्ष ठेवा आणि आपल्या सहनशीलतेपेक्षा जास्त मीठ न खाणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा.
संभाव्य धोके आणि खबरदारी (Potential risks and precautions)
माफक प्रमाणात मिठाचे पाणी पिणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असते, परंतु सिंग ठामपणे सांगतात की, “काही धोके विचारात घेणे आवश्यक आहे.”
उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब असलेल्या किंवा उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या दिनचर्येत खारट पाण्याचा समावेश करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किडनीच्या समस्या : जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने मूत्रपिंडावर भार पडू शकतो. ज्यांना मूत्रपिंडाच्या समस्या आहेत, त्यांनी सावध राहून वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डिहायड्रेशन : गंमत म्हणजे, जास्त मीठ-पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. दिवसभर साध्या पाण्याच्या वापरासह मीठ पाण्याचे सेवन संतुलित करणे महत्त्वाचे आहे.
पचनाच्या समस्या : काही लोकांना मिठाच्या पाण्याच्या सेवनाने सूज येणे किंवा वारंवार शौचास जावे लागू शकते. असे झाल्यास, मिठाचे सेवन कमी करा किंवा वापर बंद करा.
© IE Online Media Services (P) Ltd