प्रत्येक महिलेला तिच्या मासिक पाळीच्या चक्राचा मागोवा घेणे गरजेचे आहे जेणेकरुन ती अनियमित येणाऱ्या पाळीसाठी सावध राहू शकते, त्याचबरोबर हे तुमच्या आरोग्याबाबत बरेच काही सांगते. तसेच यामुळे तुम्हाला आणि तुमच्या आरोग्य पुरवठादारांना, तुमच्या मासिक पाळीदरम्यान विकसितन होणाऱ्या पॅर्टन जाणून घेण्यास मदत होते जे संभाव्य धोक्याबाबत तुम्हाला सुचित करू शकतात.

हा मुद्द्यावर भर देताना, स्त्रीरोग-प्रसुती तज्ज्ञ , डॉ. अमिन खालिद यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, मासिक पाळी येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हे रोजच्या जीवनात अंतर्भूत करणे महत्त्वाचे आहे.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

तुमच्या मासिक पाळीच्या चक्राचा मागोवा घेण्याची ५ कारणे

  • १. तुमच्या शरीर आणि मासिक पाळीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मदत करते.
    तुम्हाला जरी वाटत असले की मासिक पाळीचे सामान्य चक्र २८ दिवसांचे असते पण हे लक्षात घ्या की हे प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होत नाही. मासिक पाळीच्या चक्राचा कालावधी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो आणि २१ ते ३५ दिवसांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या मासिक पाळीच्या चक्राला सामान्य मानले जाते.
    तुमच्यासाठी सामान्य मासिक पाळीचे चक्र किती कालावधीचे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरुन तुम्ही काही तरी चुकीचे घडत असे तेव्हा ते ओळखू शकता.

    हेही वाचा – गर्भवती महिलांनी हेअर डाय करणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर
  • २. गर्भधारणा होण्यासाठी अथवा टाळण्यासाठी होते मदत
    गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तुमचे प्रजनन दिवस समजून घेणे आणि तुमचे ओव्हुलेशन कधी होण्याची शक्यता आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, ज्यांना गर्भधारणा टाळायची आहे त्यांच्यासाठी, या दिवसांत लैंगिक संभोगापासून दूर राहिल्याने तुम्ही कोणतेही गर्भनिरोधक वापरत नसल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

    याबाबत सहमती दर्शविताना गुडगाव येथील द ऑरा स्पेशॅलिटी क्लिनिक आणि क्लाऊड नाईन हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागारा आणि प्रसुतीतज्ज्ञ डॉ. रितू सेठी सांगतात की , तुमच्या मासिक पाळीचे चक्र तुम्हाला तुमची प्रजननक्षमता केव्हा चांगली आहे हे सांगते आणि त्यानुसार नियोजन करण्यास मदत करते.
  • ३. मासिक पाळी आणि हार्मोनल बदलांसाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार करते
    आपल्यापैकी बहुतेकांना मासिक पाळीपूर्वी काही किंवा इतर लक्षणे असतात. हे डोकेदुखी, मूड बदलणे, सूज येणे, अतिसार किंवा स्तन कोमलता असू शकते. त्यामुळे, तुमची मासिक पाळी कधी येणार आहे हे जाणून घेतल्याने तुम्हाला हे बदल चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यास मदत होते.
  • ४. तुमच्या शरीरात काहीतरी चुकीचे घडत आहे का हे जाणून घेण्यास मदत करते.
    त्यामुळे, जर तुमच्या मासिक पाळीचे चक्र अनियमित असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे कारण यामागे एक मूलभूत कारण असते, ज्यासाठी मूल्यमापन आणि उपचार आवश्यक असतात.

    तुमच्या मासिक पाळीचा मागोवा घेतल्याने तुम्हाला विसंगती आणि अनियमिततेच्या पॅटर्नची कल्पना येईल. तुमच्या मागील काही महिन्यांच्या सायकलची नोंद ठेवल्याने तुमच्या डॉक्टरांना योग्य निदान करण्यात खूप मदत होते.

    ५. तुमच्या महत्त्वाच्या कामाचे किंवा कार्यक्रमांचे उत्तम नियोजन करू शकता
    मासिक पाळीच्या दिवसांमध्येतुम्ही तुमच्या सर्वोत्तम स्थितीत नसाता. मासिक पाळीपूर्वीची लक्षणे दिसल्याने तुमची उत्पादकता आणि सर्जनशीलता काही प्रमाणात बाधित होऊ शकते. म्हणून, जर तुमच्याकडे तुमच्या काही गोष्टी ठरलेल्या असतील ज्यासाठी तुम्ही तयार असण्याची शक्यत असेल तर तुम्ही त्यांचे नियोजन आणि वेळापत्रक या दिवसांपासून ठेवू शकता. हे तुमच्या साठी उत्तमपण कार्य करेल.

    याव्यतिरिक्त, डॉ सेठी म्हणाले, “तुमच्या मासिक पाळीचा मागोवा घेऊन तुमच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नियंत्रण ठेवून, तुम्ही तुमच्या शरीरावर अधिक नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अधिक सक्षम होऊ शकता.”

    हेही वाचा : Eye Health: उन्हाळ्यात उष्णतेमुळे तुमचे डोळे कसे होतात खराब? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

डॉ सेठी यांच्या मते, तुम्ही तुमच्या मासिक पाळीचा मागोवा घेऊ शकता असे काही मार्ग येथे आहेत:

  • कॅलेंडर पद्धत: यामध्ये प्रत्येक महिन्याच्या तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसाचा मागोवा ठेवणे आणि तुमची पुढील मासिक पाळी सुरू होईपर्यंत दिवसांची संख्या मोजणे समाविष्ट आहे. हे तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या लांबीचा अंदाजे अंदाज देऊ शकते.
  • बेसल बॉडी टेंपरेचर पद्धत: यामध्ये दररोज सकाळी अंथरुणातून उठण्यापूर्वी बेसल थर्मामीटरने तुमचे तापमान मोजावेलागते. ओव्हुलेशननंतर तुमच्या मूलभूत शरीराचे तापमान सामान्यत: किंचित वाढते, जे तुम्हाला सर्वात जास्त प्रजननक्षम असताना अंदाज लावण्यात मदत करू शकते.
  • ग्रीवाच्या श्लेष्मा निरिक्षण पद्धत: तुमच्या मासिक पाळीत तुमच्या ग्रीवाच्या श्लेष्माचे प्रमाण आणि सातत्य यातील बदलांचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे.तुमच्या ग्रीवाच्या श्लेष्माचा पोत आणि रंग हे सूचित करू शकते की तुमची सर्वाधिक चांगली प्रजनन क्षमता केव्हा चांगली आहे.
  • स्मार्टफोन अॅप्स: अशी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत जी तुमची मासिक पाळी सुरू होण्याच्या आणि समाप्तीच्या तारखांची नोंद करून, तुमच्या पुढील मासिक पाळीचा अंदाज घेऊन आणि प्रजननक्षमतेबद्दल माहिती देऊन तुमचा मासिक पाळीता मागोवा घेऊ शकते.