5 Tips for Managing Diabetes : हल्ली अनेकांना डायबेटीसमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मनाप्रमाणे काही खाता येत नाही, शरीर थकल्यासारखे वाटते, वारंवार लघवी होते अशा अनेक गोष्टींचा त्रास डायबेटीसच्या रुग्णांना होत असतो. त्यामुळे अशा लोकांना आहाराची फार काळजी घ्यावी लागते. कारण- काही वेळा रक्तातील वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित राखणे खूप आव्हानात्मक बनते. अनेक उपाय करुनही काही फरक जाणवत नाही, अशा वेळी आम्ही तुम्हाला २०२५ च्या सुरुवातीलाच डॉक्टरांनी सांगितलेल्या पाच जबरदस्त टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही डायबेटीसपासून मुक्त राहू शकता. या टिप्स नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आहारतज्ज्ञ व डायबेटीस एज्युकेटर डॉ. कनिका मल्होत्रा यांनी मधुमेह व्यवस्थापन कशा प्रकारे केले पाहिजे यासाठी पाच सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

१) जेवणानंतर शरीरावर होणारा परिणाम समजून घ्या

तुम्ही दुपारचे जेवण सेवन केल्यानंतर पु्न्हा रात्रीचे जेवण करताना तुमचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते याचे निरीक्षण करा. प्रथिने आणि फायबरयुक्त संतुलित आहार घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. पण, त्यानंतरच्या जेवणामुळे ग्लायसेमिक प्रतिसादावरही सकारात्मक परिणाम होतो.

२) जेवणाची वेळ आणि काय खाणार हे आधी ठरवा

तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही कधी आणि कसे खाता याला अधिक महत्व आहे. डॉ. मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, दिवसाच्या सुरुवातीला कार्बोहायड्रेट्स खाणे इन्सुलिनची पातळी वाढवते.

याव्यतिरिक्त कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाण्यापूर्वी प्रोटीन आणि स्टार्च नसलेल्या भाज्यांचे सेवन केल्याने ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्याशिवाय रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते.

३) जेवणापूर्वी आणि जेवणानंतरचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा

डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. परंतु, त्याची एक ठरावीक वेळ ठरवणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. डॉ. मल्होत्रा ​​सांगतात की, जेवण करण्यापूर्वी चालणे किंवा मध्यम शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. तसेच जेवणानंतर चालल्याने ग्लुकोजची वाढ कमी होते आणि त्यामुळे एकूण ग्लायसेमिक नियंत्रण सुधारते.

४) नियमित झोप घ्या

शरीरातील चयापचय क्रिया सुधारण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. त्यावर मल्होत्रा ​​सांगतात की, “झोपेच्या खराब पद्धतीमुळे इन्सुलिनची पातळी वाढते; ज्यामुळे डायबेटीसवर नियंत्रण मिळवणे अवघड होते.

भूक नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी दररोज सात ते नऊ तासांची चांगली झोप गरजेची आहे.

५) कोल्डड्रिंक्स पिणे टाळा अन् हायड्रेटेड राहा

डायबेटीस नियंत्रणात ठेवताना अनेकदा हायड्रेशनकडे दुर्लक्ष केले जाते. त्यात पाणी किंवा हर्बल टी हे डायबेटीसच्या रुग्णांसाठी चांगले पर्याय आहेत. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते आणि भूकही नियंत्रणात राहते. पण, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शक्यतो कोल्डड्रिंक्स पिणे टाळा.

अशा पाच टिप्स फॉलो केल्यास ना केवळ रक्तातील साखरेचे प्रमाणाच नियंत्रणात राहत नाही, तर संपूर्ण आरोग्याला चालना मिळते. मल्होत्रा ​​यांच्या माहितीनुसार, तुम्ही अशा प्रकारे रोजच्या जीवनात लहान-मोठे चांगले सातत्यपूर्ण बदल केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. परंतु, निरोगी आरोग्यासाठी कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five tips to manage diabetes in 2025 how lifestyle daily routine affect blood sugar sjr