भाज्या आपल्या शरीरासाठी पोषक तत्त्वांचा उत्तम स्रोत आहेत. भाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला वेळोवेळी समजावले जात असते. हिरव्या भाज्या खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करणे असो, वाढवणे असो वा हेल्दी राहणे असो; या प्रत्येक स्थितीमध्ये लोक त्यांच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या समाविष्ट करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला फ्लॉवर खाण्याचे काही आर्श्चयकारक फायदे सांगणार आहोत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी फ्लॉवर आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो याची सविस्तर माहिती दिली आहे

मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. उषा किरण सिसोदिया यांनी सांगितले की, फ्लॉवर ही फक्त पौष्टिक भाजी नसून, पोषणाचे पॉवरहाऊस आहे. डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी अनेकदा त्यांच्या रुग्णांना चांगल्या आरोग्यासाठी फ्लॉवर खाण्याची शिफारसही केली आहे. फ्लॉवरमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते आणि अँटी-ऑक्सिडेंट व इतर पौष्टिक घटकांचे प्रमाण जास्त असते. फ्लॉवर पावसाळ्यात खाणे शक्य असले तरी त्याची निवड आणि साफसफाई करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण- पावसाळ्यात ओलसर स्थितीमुळे भाजीपाल्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. फ्लॉवर खाण्याआधी तो स्वच्छ आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी फ्लॉवरला कोमट मिठाच्या पाण्यात धुऊन घेणे महत्त्वाचे आहे,” असे डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी सांगितले आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
surya shukra gochar 2024 jupiter and sun will come face to face these 3 zodiac sign luck
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींवर भाग्यलक्ष्मीची कृपादृष्टी; सूर्य-शुक्र एकमेकांसमोर येताच मिळेल अपार धन अन् समृद्धी
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

तर, डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी सांगितलेले फ्लॉवरचे आरोग्यदायी फायदे पाहू या. डॉक्टर सिसोदिया यांच्या मते, १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये खालील पोषक घटक असतात …

कॅलरी : २७ kcal
कार्बोहायड्रेट : ५ ग्रॅम
साखर : १.९ ग्रॅम
फायबर : २ ग्रॅम
प्रथिने : १.९ ग्रॅम
चरबी : ०.३ ग्रॅम
व्हिटॅमिन सी : दैनिक मूल्याच्या अंदाजे ८०% (डीव्ही)
व्हिटॅमिन के : सुमारे २०% डीव्ही
फोलेट (व्हिटॅमिन बी ९) : सुमारे १४% डीव्ही
व्हिटॅमिन बी ६ : डीव्हीच्या सुमारे १०%
पोटॅशियम : २९९ मिलिग्रॅम किंवा डीव्ही च्या सुमारे ९%
मॅंगनीज: डीव्हीच्या सुमारे ८%
मॅग्नेशियम : डीव्हीच्या सुमारे ४%
फॉस्फरस : डीव्हीच्या सुमारे ४%
पॅन्टोथेनिक ॲसिड (व्हिटॅमिन बी ५) : डीव्हीच्या सुमारे ७%
रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी २) : डीव्हीच्या सुमारे ५%
लोह : डीव्हीच्या सुमारे ३%

फ्लॉवरचे आरोग्यदायी फायदे :

डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी फ्लॉवरच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे सांगितले आहेत :

१. अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध : फ्लॉवर अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीजने समृद्ध असतो. फ्लॉवरमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात .

२. पचनास मदत करते : फ्लॉवर हे आहारातील फायबर पचनास मदत करते आणि आतडे निरोगी ठेवते.

३. यकृत डिटॉक्सिफाय करते : फ्लॉवरमध्ये ग्लुकोसिनोलेट्ससारखी संयुगेही असतात; जी यकृत साफ ठेवण्यास मदत करतात.

४. हाडांचे आरोग्य सुधारते : अनेकांना माहीत नसेल की, फ्लॉवरमधील व्हिटॅमिन के (Vitamin K) हाडांना मजबूत करण्याचे काम करते .

५. कर्करोगास कारणीभूत घटकांचा प्रभाव कमी : फ्लॉवरमध्ये शक्तिशाली आणि मजबूत अँटी-ऑक्सिडंट्स असतात; जे पेशींचे कार्य मजबूत करतात. फ्लॉवरमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात; ज्यामुळे कर्करोगास कारणीभूत घटकांचा प्रभाव कमी होतो.

मधुमेही फ्लॉवर खाऊ शकतात का?
डॉक्टर उषा किरण सिसोदिया म्हणाल्या की, मधुमेहाचे रुग्णही फ्लॉवर खाऊ शकतात. फ्लॉवरमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स व फायबर असतात आणि त्यामुळे फ्लॉवर मधुमेहींसाठी एक चांगला पदार्थ आहे. फ्लॉवर मधुमेहविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि मधुमेह टाळण्यास तो मदत करतो

गर्भवती महिलांसाठी फ्लॉवर फायदेशीर आहे का?
फ्लॉवर गर्भवती महिलांसाठीसुद्धा फायदेशीर आहे. कारण- त्यात ‘फ्लोटेट कंटेन्ट’ आहे; जे गर्भाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याव्यतिरिक्त फ्लॉवरमधील जीवनसत्त्व आणि खनिजे गर्भवती व गर्भाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

फ्लॉवरची भाजी किंवा फ्लॉवरचे पदार्थ खाताना या गोष्टी लक्षात ठेवा :
डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांच्या मते, फ्लॉवर हे आहारासाठी चांगले असले तरीही काळजी घ्यावयाच्या
बाबी पुढीलप्रमाणे :

१. ॲलर्जी : काही व्यक्तींना फ्लॉवर खाल्ल्यावर ॲलर्जी होऊ शकते. खाज सुटणे किंवा सूज येणे, अशी त्याची लक्षणे आहेत. फ्लॉवर खाल्ल्यानंतर तुम्हाला अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही भाजी खाणे टाळू शकता आणि डॉक्टराश किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

२. अतिसेवन : अधिक फ्लॉवर खाल्ल्याने फायबरमुळे गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या किरकोळ पचन समस्या उदभवू शकतात.

फ्लॉवरबद्दल गैरसमज :
डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी गेल्या अनेक वर्षांत फ्लॉवरच्या भाजीबद्दल काही गैरसमज लोकांकडून ऐकले आहेत. ते गैरसमज आणि
त्याबद्दल त्यांनी मांडलेली मते खालीलप्रमाणे :

१. पहिला गैरसमज- फिकट रंगाचा फ्लॉवर पौष्टिक नसतो : फ्लॉवरचा रंग जरी फिकट असला तरीही त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर फायदेशीर संयुगे मुबलक प्रमाणात असतात.

२. दुसरा गैरसमज– फ्लॉवर ब्रोकोलीपेक्षा कमी आरोग्यदायी आहे : ब्रोकोली आणि फ्लॉवरचे वेगवेगळे पौष्टिक तत्त्व आणि अद्वितीय आरोग्यदयी फायदे आहेत. ब्रोकोली आणि फ्लॉवरचे पोषण अगदी सारखेच आहे. या दोघांच्या न्युट्रिशनमध्ये फारच कमी फरक आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )