दर पाच मिनिटांनी गजर बंद करून झोपत असाल तरी आता चिंता नसावी, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनात सांगण्यात आलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार- गजर पुन्हा पुन्हा बंद करून झोपण्याचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. झोपेसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार साधारण ३० मिनिटांच्या दरम्यान तुम्ही जितक्या जास्त वेळा गजर बंद करता, तितकीच तुम्हाला लवकर जाग येण्यास मदत होऊ शकते, असं निदर्शनास आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, तरीही काही तज्ज्ञ या गोष्टींशी सहमत नसल्याचं दिसतं. याबाबत डॉक्टर मझर अली केअर हॉस्पिटल मधील मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, झोपेतून उठून तुम्ही पुन्हा थोड्या वेळासाठी झोपता तेव्हा ती झोप ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करीत नाही किंवा तिचा काही फायदादेखील नसतो. खरं तर जेव्हा तुम्ही गजर बंद करून परत झोपता, तेव्हा नव्यानं लागलेल्या झोपेतून पुन्हा ती झोप पूर्ण होण्याआधीच तुम्हाला उठावं लागतं.

“अशा आपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीमध्ये चिडचिड करणं, गोंधळल्याप्रमाणे वागणं, थकवा आल्यासारखं वाटणं यांसारखी लक्षणं दिसतात. त्यालाच इंग्रजीमध्ये ‘स्लिप इनर्शिया’ (Sleep Inertia) असं म्हणतात.” असं ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम”सह बोलताना डॉक्टर अली म्हणाले.

बापरे! कानात कसेतरी होतेय म्हणून डॉक्टरांना दाखवले, तर सापडला कोळी…

या संदर्भात बोलताना डॉक्टर अली म्हणाले की, जर तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल किंवा कमी झाली असेल, तरच काही मिनिटांची अधिक झोप घेणं योग्य ठरेल. पण, अशी वेळ फार कमी येते.

“संतुलन हे महत्त्वाचं आहे; गजर एक-दोनदा बंद करण्यात कोणतीही हानी नाही; पण ही गोष्ट सतत केल्यानं मात्र तुमच्या झोपेचं तंत्र बिघडू शकतं आणि पुन्हा एकदा तुम्हाला आपुऱ्या झोपेचा सामना करावा लागू शकतो,” असंही ते म्हणाले.

झोपेचं गणित सुधारण्यासाठी डॉक्टर अली यांनी काही उपाय सुचवले आहेत ते पाहा

१. झोपेची एक ठरावीक वेळ नियोजित करा.
२. झोपण्याआधी काय करावं, काय नको ते ठरवा.
३. झोपण्याआधी मोबाइल, टीव्ही यांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा.
४. आपल्या गरजेनुसार झोपेचं प्रमाण निश्चित करा आणि आवश्यक तितकीच झोप घ्या.

कधीतरी गजर बंद करून पुन्हा झोपण्यानं काही त्रास होणार नाही; पण तरीही योग्य आणि ठरावीक झोप घेण्याची सवय स्वत:ला लावून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला अधिक तरतरी येईल आणि तुमचा दिवस अजूनच चांगला जाईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Focus on healthy sleep habits and routine to wake up feeling refreshed and alert dha