यूरिक अॅसिड शरीरात तयार होणारं टॉक्सिन आहे. आपल्या सर्वांच्या शरीरात यूरिक अॅसिड तयार होतं आणि किडनीच्या माध्यमातून ते फिल्टर होतं. त्यानंतर यूरिनच्या माध्यमातून शरीरातून यूरिक अॅसिड बाहेर फेकलं जातं. डाएटमध्ये प्यूरीनच्या फूड्सचे अधिक सेवन केल्यावर शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढू लागतं. किडनीच्या माध्यमातून युरिक अॅसिड शरीराच्या बाहेर फेकण्यात जेव्हा अडथळा निर्माण होतो, तेव्हा हे टॉक्सिन क्रिस्टलच्या रुपात जमा व्हायला लागतात. ज्यामुळं हायपरयूरिसीमिया नावाचं आजार होऊ शकतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूरिक अॅसिड वाढल्यामुळं हात-पाय आणि गुडघ्यात वेदना होऊ लागतात. तसेच सूज येण्याची समस्याही डोकं वर काढते. जर यूरिक अॅसिडचं उपचार केलं नाही, तर शरीरातील हाडांची मजबूती कमी होऊ शकते. यूरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी डाएट करणे खूप महत्वाचं असतं. जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि प्यूरिनच्या डाएटपासून दूर राहावं.

एम्सचे माजी कंसल्टेंट आणि साओल हार्ट सेंटरचे फाउंडर आणि डायरेक्टर डॉ बिमल झांजेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाएटमध्ये काही पदार्थांचं सेवन केल्यामुळं किडनीला यूरिक अॅसिडला बाहेर काढणे सोपं होऊ शकतं. काही पदार्थांचं सेवन केल्यावर सहजपणे यूरिक अॅसिडला बाहेर काढलं जाऊ शकतं. यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणकोणते पदार्थ प्रभावी ठरु शकतात.

नक्की वाचा – लघवीद्वारे अतिरिक्त ब्लड शुगर शरीराबाहेर काढून टाकतो ‘हा’ भात? तज्ज्ञ सांगतात, “डायबिटीज रुग्णांनी….”

विटॅमिन सी चं सेवन करा आणि यूरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवा

विटॅमिन सी चं सेवन केल्यामुळं यूरिक अॅसिडवर सहजपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. यूरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही विटॅमिन सी चा समावेश असेलेल्या पदार्थांचा समावेश तुमच्या डाएटमध्ये करु शकता. डाएटमध्ये चेरी, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी, ब्रोकली आणि टॉमेटोचा समावेश असला पाहिजे. अशाप्रकारच्या डाएटमुळं यूरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण अधिक सोपं होतं.

फायबरचा डाएटमध्ये समावेश करुन घ्या

ज्या लोकांचं यूरिक अॅसिड वाढलं आहे. त्यांनी डाएटमध्ये फायबरचा समावेश करावा. फायबरचा समावेश असणारे फूड्स यूरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यात खूप फायदेशीर ठरतात. मोठ्या प्रमाणात फायबर असलेल्या डाएटमध्ये ओट्स, साबुत अनाज, ब्रोकली आणि भाज्यांचा समावेश करा. हे सर्व फूड्स यूरिक अॅसिडला बाहेर फेकू शकतात.

भरपूर पाणी पिल्यावर यूरिक अॅसिड लघवीद्वारे जाणार बाहेर

ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. अशा लोकांनी पाणी भरपूर प्यावं. पाणी पिल्यावर
शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर जाण्यासाठी मदत होते. तुम्ही पाण्याचं जितकं सेवन कराल, त्याचं फायदा किडनीला यूरिक अॅसिड बाहेर फेकण्यात होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these easy 4 steps to get control on uric acid and gout kidney problems healthy diet tips know from the expert nss