आहारस्वातंत्र्य आहार नियमनाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं त्यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो तो म्हणजे फूड फ्रीडम म्हणजेच आहार शैलीबाबत स्वातंत्र्य! आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय स्वातंत्र्य म्हटलं की कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी करण्याचा आपल्याला अधिकार मिळतो आता ही गोष्ट मनासाठी करताना त्याच्यामध्ये नैतिकता अनैतिकता चूक बरोबर योग्य अयोग्य परिणामी दुष्परिणामी असे अनेक मापदंड मोजले जातात स्वतःच्या शरीराला मानवेल असं स्वतःच्या जागेत किंवा आपण आपल्या राहत्या जागेत पिकेल असं आपल्या शरीराला प्रकृतीला रुसेल अशा प्रकारचा आहार नियमन करणं प्रत्येक आहारतज्ज्ञांद्वारे सांगितलं जातं.
भारतामध्ये ऋतूमानानुसार आहारामध्ये फरक केला जातो. भारतीय आयुर्वेदाप्रमाणे हे साधारण तीन हजार वर्षांपूर्वीचं शास्त्र आहे ज्यामध्ये आहार शास्त्रामध्ये प्रकृती आणि वातावरण यांचं नातं खूप जुनं आहे . भारतात उपलब्ध असणाऱ्या वेगेवेगळ्या रंगांच्या, गंधाच्या,पोषणतत्वांनी भरपूर असणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे भारतीय आहार जैवविविधतापूर्ण असल्याचे देखील आढळून येते.
आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा
भारतीय थाळी ही जगातला उत्तम आहारशास्त्राचा नमुना आहे असं सांगितलं जातं. त्याचं कारण असं की भारतीय आहारात असणारे वेगवेगळे पदार्थ बऱ्यापैकी पोषणतत्त्वांना पूर्णत्व देतात. अगदी वेगवेगळ्या तृणधान्यांपासून ते लोणच्यांपर्यंत भारतीय आहारातील प्रत्येक पदार्थामध्ये मुबलक पोषकतत्त्वे असतात.
भारतीय आहारामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी धान्ये, त्यांचा शक्य तितकं कमी प्रक्रिया केलेला आहारातील उपयोग आणि त्यावर केले जाणारे पाक संस्कार यामुळे भारतीय आहाराला आहार शास्त्रात वेगळे स्थान आहे. अनेक भारतीय पदार्थांमध्ये ज्या क्रमाने ते शिजवले जातात किंवा उकडून त्यावर फोडणी देणे किंवा एकत्र केले जाणे अशा प्रकारचे पाक संस्कार होतात त्यामुळे त्याचे पोषणमूल्य वाढते.
आणखी वाचा: Health Special: पाणी पिणं इतकं का महत्त्वाचं?
उदाहरणार्थ फोडणीसाठी वापरले जाणारे हिंग , मोहरी प्रथिनेयुक्त पदार्थ सहज पचण्यासाठी मदत करतात. अनेक भारतीय पदार्थांमध्ये वरून लिंबू पिळण्याची पद्धत आहे. यामुळे त्या पदार्थातील लोह उत्तम प्रमाणात शरीरात शोषले जाते तसेच अनेक पदार्थांचा ग्लायसेलिक इंडेक्स कमी होतो आणि कर्बोदकांचे प्रमाण योग्य प्रमाणात शोषले जाते.
बार्ली , कडधान्ये यामध्ये असणारे तंतुमय पदार्थ आतड्याचे आरोग्य उत्तम ठेवतात. भारतीय पदार्थातील वैविध्यामुळे केवळ पोषणमूल्येच नव्हे तर आतड्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाणदेखील योग्य प्रमाणात राखले जाते असे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे.
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असणारे वेगेवेगळ्या मसाल्यांचे पदार्थ फंक्शनल फूड्स म्हणून प्रसिद्ध आहेत. मसालेदार पदार्थांमध्ये असलेल्या फिनोलिक कंपाऊंड्स मुळे फिनोलिक कंपाउंड (म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यांचं ऊर्जेचे मूल्य जरी कमी असलं तरी सुद्धा शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांसाठी ) साठी हे पदार्थ उपयुक्त असतात जिरे , हळद , मिरपूड यासारखे अनेक मसाल्याचे पदार्थ पाश्चात देशातदेखील पोषक वरदान म्हणून लोकप्रिय आहेत.
भारतीय थाळी पद्धतीला आहार शास्त्रातील प्रमाण थाळी असे मानले जाते . उदाहरणा दाखल आपण साधी सोपी शाकाहारी महाराष्ट्रीयन थाळी विचारात घेऊ.
कोशिंबीर -वरण-भात तूप-उसळ -पालेभाजी -पोळी किंवा भाकरी -लोणचं या थाळीमध्ये- आपलं कोशिंबीर म्हणून गाजराची किंवा काकडीची कोशिंबीर म्हणा किंवा तुम्ही मिश्र भाज्यांची कोशिंबीर प्रमाण मानू शकता . -आहारात तंतुमय पदार्थ आणि ऍन पचण्यासाठी आवश्यक हरितकं यांचा समावेश आहे. वरण असेल तर त्यात प्रथिने आणि जीवनसत्त्वे आहेत.
भात – कर्बोदके आणि आवश्यक उत्प्रेरके (एन्झाइम्स )
तूप- स्निग्ध पदार्थ ( आवश्यक स्निग्धांश आणि रेचक )
उसळ – प्रथिने , जीवनसत्त्वे, खनिजे
पालेभाजी – हरितके आणि पोषणमूल्य, तंतुमय पदार्थ , रेचक
पोळी / भाकरी – खनिजे, तंतुमय पदार्थ
लोणचे – प्रोबायोटिक आणि प्रिबायोटिक
दही – प्रिबायोटिक , पाचक सूक्ष्मजैविक
हे सगळं वाचतानाच आहारनियमनातील विविध महत्वाची पोष्ट तत्त्वे आपल्या आहारात आहेतच याच सजग भान येतं. वरील थाळीतील प्रत्येक पदार्थाचे प्रमाण हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते कसे साध्य करायचे हे लक्षात घेण्यासाठी एक सोपा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे :
माफक जिन्नस+ नेमकं प्रमाण =मुबलक पोषण ! याच शाकाहारी थाळीचे स्वरूप मांसाहारी असेल तर मांसाहारी पदार्थांचा समावेश करताना संतुलित पोषण साधण्यासाठी याच थाळीमध्ये पूरक बदल केले जातात आणि अर्थात प्रथिनांचे प्रमाणदेखील वाढते .
लक्षपूर्वक अभ्यास केल्यास तुमच्या हेही लक्षात येईल कि विविध प्रदेशांमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबद्दल हाच नियम बऱ्यापैकी लागू होतो.
केवळ खाण्याचे पदार्थ आणि पाकसंस्कारच नव्हे तर भारतीय बैठक ही अन्न पचण्यासाठी उत्तम पद्धत मानली जाते. पिढीजात वारसा असणारे सुखासन म्हणजे मांडी घालून बसणे आणि जेवणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील पचनेंद्रियांसाठी उपयुक्त आहे. शिवाय जेवण झाल्यानंतर केले जाणारे वज्रासन पचनासाठी आणि सर्वांगीण आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण ज्या प्रदेशात राहतो तिथल्या अन्नाबद्दल अभिमान आणि भान हे दोन्ही असणं आवश्यक आहे. आहार स्वातंत्र्याबद्दल विचार करताना आपल्या मातीतले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी आपण आग्रही असणं महत्त्वाचं आहे.
फूड फ्रीडम च्या निमित्ताने समस्त मराठी वाङ्मयप्रेमी मंडळींची हक्काने माफी मागत आपल्या एका जुन्या म्हणींमध्ये थोडासा बदल करते : खाईन तर स्वदेशी नको ते परदेशी !
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !