डोकेदुखीची तक्रार करणारे अनेक जण असतात. वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेणाऱ्या रुग्णांमध्ये डोकेदुखीचा त्रास असणारे रुग्ण बहुसंख्य असतात. विशेषतः ऑफिसमध्ये सतत स्क्रीनकडे पाहून काम केल्यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. अनेक लोक डोके दुखते म्हणून कधी काही गोळ्या घेतात; तर कधी डोकेदुखी सहन न झाल्याने अनेकांवर डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते. डोकेदुखी ही बाब सामान्य असली तरी त्याच्या वेदना मात्र कधी कधी असह्य होतात. खरे तर प्रत्येक व्यक्तीच्या डोकेदुखीचे कारण वेगवेगळे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोकेदुखीची कारणे कोणती?

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता, डोळ्यांवर किंवा मानेवर जास्त दाब, झोप न लागणे व वेदनाशामक औषधे जास्त खाणे यांमुळेही डोकेदुखी होऊ शकते. अनेकदा तणावामुळे खूप डोके दुखते. पुरेशी झोप न घेणे हेदेखील डोकेदुखीचे मुख्य कारण असू शकते. पण सातत्याने डोके दुखत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण- हे मायग्रेनचे लक्षण असू शकते.

मायग्रेन हा सामान्य, मध्यम आणि व तीव्र स्वरूपाचा असतो. मायग्रेनमध्ये होणारी डोकेदुखी ही अत्यंत गंभीर आणि त्रासदायक असते. हे लवकर नियंत्रणात येत नाही. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, या प्रश्नावर फोर्टिस रुग्णालयाचे (मोहालीचे असोसिएट कन्सल्टंट न्यूरोलॉजी) डॉ. इशांक गोयल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊ डाॅक्टर काय सांगतायत…

(हे ही वाचा : खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘ही’ तीन पेय? फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या)

‘हे’ पदार्थ खाल्ल्याने होते डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास

डॉ. गोयल म्हणतात, “मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी चीज, चॉकलेट आणि कॅफिन किंवा गोड पेये यांसारखे काही पदार्थ टाळावेत. त्यामध्ये फेनिलेथिलामाइन नावाचे संयुग असते; जे मायग्रेनला चालना देते. त्याचप्रमाणे केळी आणि बीअरमध्ये हिस्टामाइनसारखे इतर ट्रिगर असतात; तर आइस्क्रीम आणि वाईनमध्ये टायरामाइन असते.

तसेच साखरेऐवजी वापरण्यात येणारे कृत्रिम गोडवा देणारे स्वीटनर, दारूचे अतिसेवन, खूप जास्त शेंगदाणे एका वेळी खाल्ल्याने, आइस्क्रीम, एमएसजीवाले पदार्थ खाणे यांमुळे मायग्रेन उदभवण्याची शक्यता असते. तसेच चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे मायग्रेनचा त्रास आणखी वाढतो.

‘हे’ खाद्यपदार्थ खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो दूर

डाॅक्टर सांगतात की, मायग्रेनपासून सुटका करून घ्यायची असेल, तर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात ताजी फळे, भाज्या आणि योग्य अन्नपदार्थांचा समावेश करा.

ओमेगा-३ फॅटी अॅसिड वाढल्याने मायग्रेन असलेल्या लोकांना मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे सुक्या मेव्याचे सेवन केल्याने मायग्रेनग्रस्तांना फायदा होऊ शकतो. सुक्या मेव्यामध्ये मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक घटक, तसेच न्यूट्रिएंट्स भरपूर असतात.

भरपूर पाणी प्यायल्याने हायड्रेशनची पातळी चांगली राहिली, तर मायग्रेन टाळण्यास आणि त्याची लक्षणे कमी करण्यास मदत होऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food lists limit or indulge in case you have chronic headaches and migraine pdb
Show comments