उन्हाळा सुरु झाला की घाम आणि उष्णतेचा त्रास वाढायला सुरुवात होते. अनेकदा शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थिती आपल्या शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी आणि शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेयांचा आणि पदार्थांचा आहारात समावेश करतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे फळ कलिंगड हे देखील शरीर थंड ठेवण्यास मदत होते. कलिंगडामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, जीवनसत्त्वे B1 आणि B6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, लायकोपीन ही जीवनसत्व असतात मात्र बरेच लोक कलिंगड खाणे टाळतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर असते. आज आम्ही तुम्हाला मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड खावे की नाही? याबद्दल माहिती देणार आहोत.
मधुमेह समस्या
मधुमेह एक जीवनशैली संबंधित समस्या असल्याने मधुमेही रूग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. अशा परिस्थितीत साखरेचे रुग्ण अधिक कलिंगड खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल. म्हणून मधुमेह रूग्णांनी टरबूज मर्यादित प्रमाणात घ्यावा असा सल्ला डॉक्टर देतात.
मधुमेहींनी कलिंगड कमी खावे
मधुमेही रुग्ण कलिंगड माफक प्रमाणात खाऊ शकतात, कारण कलिंगडामध्ये भरपूर पाणी असते आणि त्यामुळे ग्लायसेमिक भार कमी होतो. कलिंगड हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे आणि त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. अशावेळी कलिंगड कमीत कमी प्रमाणातच खावे. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे आणि साखरेची पातळी झपाट्याने बदलते त्यांनी कलिंगड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल, तर तुम्ही याचे भरपूर सेवन करून आरोग्यास लाभ मिळवू शकता.
हेही वाचा – Haircare tips: लांब केस हवेत? मग केळीच्या सालीचे पाणी ठरेल केसांसाठी उपयोगी
टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांनी कसे खावे टरबूज
टाईप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तीने कलिंगड किंवा इतर कोणत्याही फळाचा नाश्त्यात किंवा अन्नामध्ये समावेश केला असेल, तर त्याला हेल्दी फॅट आणि प्रोटीन यांच्यासोबत आहार संतुलित करावा लागेल. कारण हेल्दी फॅट आणि प्रोटीन रक्तातील साखरेचे शोषण कमी करतात. इतर फळांप्रमाणे कलिंगडही नाश्त्यात किंवा जेवणात घेता येते. केवळ एका गोष्टीची काळजी घेणे अवश्यक आहे. टाईप 2 मधुमेह असलेली व्यक्ती कलिंगड खात असेल तर त्याने उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांसोबत कलिंगड खाणे टाळावे. त्याने कलिंगडासोबत नट, बिया, हेल्दी फॅट फूड आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
हेही वाचा- चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान! कॅडबरीमध्ये आढळतोय ‘हा’ व्हायरस जाणून घ्या किती आहे धोकादायक
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नेहमी संतुलित आणि निरोगी आहार घ्यावा. ज्यामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश असेल. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, परंतु तरीही, मधुमेह असलेले लोक तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांच्या आहारात फळांचा समावेश करू शकतात. कमी साखर आणि जास्त फायबर असलेले पदार्थ खाणे चांगले. फळांचे रस, स्मूदी, पॅकेज केलेले ज्यूस पिणे टाळा. टरबूज व्यतिरिक्त संत्री, जांभूळ, द्राक्ष, सफरचंद, पीच, किवी, नाशपाती ही फळे खाऊ शकता.