This Seven Foods Help Fight Inflammation : जळजळ होणे ही आपल्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, यात शरीर संरक्षणासाठी किंवा शरीर हिलिंगसाठी इंफ्लेमेटरी सेल्स जखम झालेल्या जागेवर पाठवण्याचे प्रयत्न करत असतात. पण, तरीही तीव्र जळजळ कमी होत नाही तेव्हा ती अनेक आजारांचे कारण ठरू शकते; ज्यामध्ये संधिवात, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या रोगांचा समावेश आहे. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.

हैदराबाद येथील बंजार हिल्सच्या केअर हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटीशियन सुषमा यांच्या मते, या लढाईत अन्न हे एक शक्तिशाली शस्त्र (Foods Help Fight Inflammation) आहे, त्यामुळे तुमच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करून, तुमच्या शरीराची जळजळ लक्षणीयरीत्या कमी करू शकतात आणि एकूणच तुमचे आरोग्य सुधारू शकतात. कारण दीर्घकाळ होणारी जळजळ तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकते. त्यामुळे जळजळ, सूज येणे यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.

डायटीशियन सुष्मा यांच्या मते, शरीरावर एखाद्या जखमेची जर दीर्घकाळ सूज राहिली, तर ती आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी परिणाम करू शकते. त्यामुळे सूज नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सूज कमी केली तर आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते.

हेही वाचा…Healthy Habits : जपानमध्ये लोक दीर्घकाळ का जगतात माहिती आहे का? ‘या’ तीन गोष्टी तुम्हीही करा फॉलो; वाचा तज्ज्ञांचे मत

एक्यूट आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन (Acute vs. Chronic) : एक्यूट इन्फ्लेमेशन दाह, दुखापतीला अल्पकालीन प्रतिसाद ही चांगली गोष्ट आहे. हे शरीर बरे होण्यास मदत करते. तथापि, दीर्घकाळ जळजळ (क्रॉनिक इन्फ्लेमेशन), एक सतत आग, शरीरातील स्वस्थ, बळकट पेशींचे नुकसान करू शकते आणि विविध आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

शरीराची एक लढाई : क्रॉनिक इन्फ्लेमेशन (तीव्र जळजळ) सूज किंवा इतर समस्या निर्माण होतात, तेव्हा शरीरात एका प्रकारची लढाई चालू असते, यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे थकवा, वेदना, मूड बदलतो आणि यामुळे तुमच्या जीवनाची गुणवत्ताही घसरू शकते.

रोग प्रतिकारशक्ती : दीर्घकाळ होणाऱ्या जळजळीमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीत व्यत्यय येऊ शकतो, यामुळे ऑटोइम्यून आजार म्हणजेच शरीराची प्रतिकारशक्ती आपल्या स्वतःच्या पेशींवर हल्ला करते.

सूज कमी करण्यासाठी शक्तिशाली आहार हे शस्त्र (Foods Help Fight Inflammation) आहे हे समजल्यावर आता त्याचा आहारात समावेश करण्याची तयारी करूया! यासाठी डायटीशियन सुषमा यांनी पुढील सात पदार्थांना आहारात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. कारण हे पदार्थ आपल्या शरीराला सूजविरुद्ध लढण्यास मदत करू शकतात…

१. मासे (फॅटी फिश) :

सॅल्मन, मॅकेरल, सार्डिन हे ओमेगा ३ फॅटी ॲसिडमुळे जळजळ कमी करण्यास मदत होते.

२. बेरी (बेरीलिशिअस डिफेन्स) :

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी हे अँटिऑक्सिडंट्सनी भरलेले असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

३. हिरव्या पालेभाज्या :

पालक, काळे, स्विस चर्ड यामध्ये (नुट्रीशनल पॉवरहाऊस) आहेत, भरपूर पोषण आणि आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे जळजळ टाळण्यास (Foods Help Fight Inflammation) मदत करतात.

४. नट्स :

बदाम, अक्रोडमध्ये चरबी, फायबर, अँटिऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करण्यासाठी एकत्र काम करतात.

५. ऑलिव्ह ऑइल :

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, त्याच्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलीफेनॉल्ससह, शक्तिशाली दाहकविरोधी गुणधर्म (अँटी-इन्फ्लेमेटरी) प्रदान करते.

६. द गोल्डन वॉरियर हळद :

हळद या मसाल्यात मसाला ज्यात करक्यूमिन नावाचा शक्तिशाली अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट संयुग असते, ज्यामुळे सूज कमी करण्यात आणि निरोगी ठेवण्यात मदत होते.

७. टोमॅटो :

टोमॅटो Lycopene ने समृद्ध असतो, जो एक अँटीऑक्सिडंट आहे. हे सूजविरुद्ध लढण्यास आणि काही आजारांपासून संरक्षण करण्यासही (Foods Help Fight Inflammation) मदत करू शकतात.