जेवणाच्या चुकीच्या सवयी, बदललेली जीवनशैली, वाढत्या प्रदूषणाचा वातावरणासह खाद्यपदार्थांवर होणारा परिणाम या कारणांमुळे रक्त अशुद्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. रक्त अशुद्ध झाल्यास रक्ताद्वारे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना मिळणारे पोषकतत्त्व मिळत नाहीत आणि यामुळे काही आजरांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे रक्त शुद्ध असणे गरजेचे असते. यासाठी काही पदार्थ फायदेशीर ठरू शकतात, जे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीट
बीटरूटमध्ये बीटासायनिन हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे अँटीऑक्सिडेंट आढळते. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. रोजच्या जेवणात किंवा सॅलेडमध्ये याचा समावेश करू शकता किंवा बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करून साधारण १० मिनिटांपर्यंत पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर त्यात थोडी काळी मिरी आणि जिरे पावडर मिसळा. दोन ते तीन आठवडे प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

आणखी वाचा: सतत होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं लगेच जाणून घ्या

आले आणि लिंबू
आले वाटून घेऊन त्यात २ ते ३ थेंब लिंबाचा रस टाका, त्यानंतर त्यात थोडे मीठ आणि काळी मिरी टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

तुळशीची पानं
तुळस अनेक कारणांसाठी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच तुळशीच्या पानांमध्ये ऑक्सिजनही भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.

कडुनिंबाची पानं
रक्त शुद्ध करण्यासाठी कडुनिंबाची पानं फायदेशीर मानली जातात. यासाठी कडुनिंबाची पानं रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता किंवा पानं वाटून पाण्यात मिसळून ते पाणी प्या.

आणखी वाचा: सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या

लसूण
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्याबरोबर रक्त शुद्ध होण्यासही मदत मिळते.

आवळा
रक्तातील अशुद्ध घटक काढून रक्त शुद्ध करण्यास आवळा फायदेशीर मानला जातो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foods which naturally purify blood must include in daily diet pns