Walking vs Stair Climbing Health Benefits: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांनी जर योग्य त्या व्यायामाची निवड केली, तर वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत मिळू शकते. अनेकांच्या मते, चालणे हा सर्वांत लोकप्रिय व्यायाम असला तरी, जिने चढणे-उतरण्याचा व्यायाम अधिक प्रभावी ठरू शकतो.
“जिना चढण्यामुळे अधिक तीव्र स्वरूपाचा व्यायाम होतो, जो कॅलरीज लवकर बर्न करतो; तर चालणे हा एक सौम्य, अधिक सुलभ व्यायाम प्रदान करतो, जो विविध प्रकारच्या फिटनेस पातळीसाठी योग्य आहे.”, दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाल सिंग हे दोन्ही व्यायामांचे फायदे सांगून, त्यातील कोणासाठी कोणता व्यायाम सर्वांत योग्य आहे आणि तो तुमच्या फिटनेस दिनचर्येत प्रभावीपणे कसा समाविष्ट करायला हवा हे स्पष्ट करतात.
वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम फायदेशीर?
वजन कमी करण्याच्या बाबतीत, पायऱ्या चढणे हा चालण्यापेक्षा अधिक प्रभावी व तीव्र स्वरूपाचा व्यायाम आहे. डॉ. सिंग यांच्या मते, पायऱ्या चढण्यामध्ये तीव्रता जास्त असल्याने कमी वेळेत लक्षणीयरीत्या जास्त कॅलरीज बर्न होतात.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

या व्यायामामध्ये अधिक स्नायुसमूह सहभागी होत असल्याने कॅलरीज लवकर खर्च होतात. ऑस्टिओआर्थरायटिस किंवा हालचाल आव्हानांसारख्या सांध्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हा व्यायाम फायदेशीर नाही. कारण- गुडघे आणि कंबरेवरील वाढत्या दाबामुळे अस्वस्थता किंवा दुखापत होऊ शकते. ज्यांची फिटनेस पातळी जास्त आहे किंवा ज्यांना जलद वजन कमी करायचे आहे, त्यांना जिना चढणे अधिक प्रभावी वाटेल.

याउलट चालणे हा कमी परिणाम देणारा व्यायाम आहे, ज्यामुळे सांधेदुखी, श्वासोच्छ्वासाच्या समस्या किंवा जास्त वजन असलेल्या लोकांसाठी तो एक सौम्य व अधिक सुलभ पर्याय ठरतो. पायऱ्या चढण्यापेक्षा चालण्यामुळे कमी कॅलरीज बर्न होतात; परंतु तो व्यायाम जास्त काळ करता येतो, ज्यामुळे निरोगी जीवनशैली राखण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चालणेदेखील अधिक समावेशक आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या फिटनेस पातळीच्या लोकांना दुखापतीचा धोका कमीत कमी असताना नियमित शारीरिक हालचालींमध्ये सहभागी करता येते.

चालण्यामुळे बर्न झालेल्या कॅलरीजच्या बरोबरीने किती पायऱ्या चढायच्या?

कॅलरीज बर्नच्या बाबतीत पायऱ्या चढणे आणि चालणे कसे तुलनात्मक आहे याबद्दल विचार करणाऱ्यांसाठी डॉ. सिंग स्पष्ट करतात की, १५ मिनिटांसाठी पायऱ्या चढणे आणि जमिनीवर चालणे यांची तुलना केल्यास चालण्यापेक्षा पायऱ्या चढल्याने सुमारे १५ ते २० पट जास्त कॅलरीज बर्न होऊ शकतात.

चालण्याच्या सेशनच्या वजन कमी करण्याच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी, सुमारे २० ते ३० मिनिटे पायऱ्या चढल्याने समान परिणाम मिळू शकतात, प्रत्येकासाठी हा व्यायाम योग्य नसला तरी. वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्याने अधिक परिणाम साधू शकतो. अर्थात, फिटनेस रूटीनमध्ये त्याचा समावेश करण्यापूर्वी वैयक्तिक आरोग्य घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For lose weight instantly walking or climbing steps what is more better sap