Papaya leaves benefits : अनेक लोक घरी आवडीने पपईचे झाड लावतात आणि पपईचा आस्वाद घेतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पपई खूप आवडते. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला माहितेय का, फक्त पपईच नाही, तर या झाडाची पानेसुद्धा तितकीच पोषक असतात; जी आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यात मदत करतात. पपईची पाने आरोग्यदायी फायद्यांसाठी पारंपरिक उपायांमध्ये फार पूर्वीपासून वापरली जात आहेत. बेंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटल्सचे सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन आणि सल्लागार व आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पपईच्या पानांचे सेवन करण्याचे आरोग्य फायदे

डेंग्यूमुळे अनेकदा शरीरात प्लेटलेट्सची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळीदेखील कमी होऊ शकते.अशा वेळी पपईच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पपईच्या पानांचा अर्क प्लेटलेट्सची संख्या वाढवू शकतो, विशेषतः डेंग्यू रुग्णांमध्ये. ‘जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजी’ (२०१३)मध्ये प्रकाशित झालेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये असे दिसून आले आहे की, पपईच्या पानांच्या अर्कामुळे डेंग्यूच्या रुग्णांमधील प्लेटलेट्सच्या संख्येत पाच दिवसांत लक्षणीय सुधारणा झाली.

दुर्धर विकारांचा धोका कमी करण्याची क्षमता

पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई व फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर ठेवतात. पपईच्या पानांचे पाणी नियमित प्यायल्याने पेशी खराब होत नाहीत. या पानांच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स हृदयविकार, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या विकारांचा धोका कमी करू शकतात. पपईच्या पानांचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी होते.

सूज कमी करण्यासह सांधेदुखी, स्नायूदुखीपासून आराम

पपईच्या पानांच्या पाण्यात अल्कालॉइड्स व फ्लेव्होनॉइड्स यांसारखी संयुगे असतात, जी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे सांधेदुखी, स्नायूदुखी यांसारख्या त्रासांपासून आराम मिळू शकतो.

पचनासह मधुमेहाच्या व्यवस्थापनास मदत

पपईच्या पानांच्या सेवनाने पचनास मदत होते. डॉ. श्रीनिवासन सांगतात की, आतड्याच्या आरोग्यासही या पानांचे सेवन फायदेशीर आहे. रक्तातील साखरेचे नियमन, मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास पपईची पाने मदत करतात.

केसांची वाढ होते

पपईच्या पानांचे पाणी केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पपईच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह यांसारखे पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे केस गळणे कमी होते आणि केस पांढरे होत नाहीत.

विषारी पदार्थ बाहेर काढण्यास उत्तम उपाय

पपईच्या पानांचे पाणी हे एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे पाणी यकृत आणि किडनीद्वारे हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते; ज्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत पार पडते.

जास्तीत जास्त परिणामकारकतेसाठी पपईच्या पानांचे सेवन कसे करावे?

पपईच्यां पानांचा ताजा रस, चहा किंवा अर्क म्हणून सेवन केला जाऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारते या पानांच्या ताज्या रसामध्ये सर्वाधिक फायदे देणारे केंद्रित असलेल्या निरोगी पदार्थांपैकी एक आहेत.उकळत्या पानांपासून तयार केलेला चहा पचनाच्या समस्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जास्तीत जास्त आरोग्यदायी फायद्यांसाठी ताज्या किंवा कमीत कमी प्रक्रिया केलेल्या पोषक घटकांच्या सेवनाचा सल्ला दिला जातो.

पपईची पाने वापरताना लोकांनी घ्यावयाची खबरदारी

पारंपरिक उपाय म्हणून पपईची पाने वापरताना, व्यक्तींनी अनेक प्रकारची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषत: गर्भवती, स्तनपान किंवा औषधे घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यांना पपईची अॅलर्जी आहे त्यांनी ते पूर्णपणे टाळावे.”

डेंग्यू झाल्यास पपईच्या पानांचे सेवन करू शकता; मात्र पूर्णपणे त्यावरच अवलंबून न राहता, इतर उपचारही सुरू ठेवावेत. पपईच्या पानांचे उत्पादन घेताना नेहमी गुणवत्तेला प्राधान्य द्या. त्याव्यतिरिक्त त्यांचे फायदे समजून घेताना चुकीच्या माहितीपासून सावध राहा.

“पपईची पानांचा कोणताही उपाय करण्याआधी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या; विशेषत: जर तुम्ही औषधे घेत असाल किंवा तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर. पपईच्या पानांच्या अतिसेवनामुळे अतिसार, पोटात पेटके किंवा अॅलर्जीक प्रतिक्रियांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

Story img Loader