Frequent Cough: खोकला ही एक सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाला भेडसावत असते. खोकला हा आजार नसून एक प्रकारची रिॲक्शन आहे जे आपले शरीर फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास किंवा श्वासाच्या नलिकेमध्ये धूलिकण गेल्यावर देते. सहसा खोकला स्वतःच बरा होतो आणि त्याला उपचारांची आवश्यकता नसते, परंतु खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास ते गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसीन येथील पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिनचे डॉक्टर पनागिस गॅलियात्सॅटोस म्हणतात, “तुमचे नाक हा एकमेव मार्ग आहे जे बाहेरील वातावरणाचा तुमच्या शरीरावर परिणाम करू शकते. सर्व प्रकारचे संक्रमण आणि ऍलर्जी धुळीतून आपल्या नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला आजारी बनवतात.

( हे ही वाचा: मधुमेह रुग्णांची Blood Sugar 600mg/dl च्या वर गेल्यास होऊ शकतो मृत्यू; जाणून घ्या शुगर कंट्रोल करण्याच्या टिप्स)

पोस्टनेसल ड्रिप सिंड्रोम ( Postnasal drip)

पोस्टनेसल ड्रिप सिंड्रोम, ज्याला अप्पर एअरवे कफ सिंड्रोम असेही म्हणतात, हे सतत खोकल्याचे एक सामान्य कारण आहे. जेव्हा एखादा विषाणू, ऍलर्जी, धूळ किंवा केमिकल तुमच्या नाकात शिरते, अशावेळी नाकातून श्लेष्मा बाहेर येतो. जेव्हा हा श्लेष्मा नाकातून बाहेर येण्याऐवजी तुमच्या घशात येतो तेव्हा या स्थितीला पोस्ट नेसल ड्रिप म्हणतात. यामध्ये तुम्हाला खूप खोकला येतो.

त्यांनी सांगितले, “तुमच्या शरीरातील बहुतेक कफ रिसेप्टर्स तुमच्या श्वासनलिकेमध्ये आणि व्होकल कॉर्डमध्ये असतात आणि तेथे जे काही घडते त्याची प्रतिक्रिया शरीर खोकल्याच्या स्वरूपात देते.

( हे ही वाचा: आयुर्वेदानुसार दुधासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात विषासमान; चुकूनही यांचे सेवन करू नका)

अस्थमा

दमा हे दीर्घकाळ खोकल्याचे आणखी एक सामान्य कारण आहे. हे श्वासनलिकेमध्ये सूज आल्याने होते, ज्याचे काम फुफ्फुसात हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे आहे. सूज आल्यामुळे श्वासनलिकेमध्ये जाड श्लेष्मा तयार होण्यास सुरवात होते, ज्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो, त्यामुळे तुम्हाला खोकला सुरू होतो. खोकल्याद्वारे, तुमचे शरीर ऑक्सिजनचा पुरवठा पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करते. संसर्ग, हवामानातील बदल, ऍलर्जी, तंबाखू, अनेक प्रकारच्या औषधांमुळेही दमा होऊ शकतो.

संक्रमण

बरेचदा असे होते की तुम्हाला सर्दी, फ्लू किंवा न्यूमोनिया होऊन गेला तरीही तुमचा खोकला बराच होत नाही. वास्तविक, त्यावेळी तुमची फुफ्फुसे बरी झालेली असतात पण या काळात नवीन कफ रिसेप्टर्स तयार होऊ लागतात आणि प्रत्येक नवीन गोष्टीसाठी तुम्हाला जुन्या गोष्टी काढून जागा बनवावी लागते. त्याच प्रकारे हे नवीन खोकला रिसेप्टर्स देखील त्यांचे स्थान बनवतात त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला खोकला येतो.