मागील काही वर्षांपासून भारतासह परदेशातही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. पण, त्या परिस्थितीत जगणे अनेकांसाठी अवघड होत आहे. बदलती जीवनशैली, खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयी, एका जागी बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव; अशी अनेक कारणे लठ्ठपणासाठी जबाबदार धरली जातात. पण, शरीरात वाढणाऱ्या चरबीमागे आणखी एक प्रमुख कारण समोर आलं आहे. एका रिसर्चनुसार, आहारातून आपल्या शरीरात जाणाऱ्या फ्रुकटोजमुळे (फळांपासून तयार केलेली साखर) अनेकांमध्ये लठ्ठपणा आणि शरारीत कॅलरीज वाढण्याची समस्या जाणवत आहे, परिणामी लिव्हर खराब होण्याचीही भीती वाढत आहे.

यामुळे तुम्हीदेखील पॅनकेक्सवर मॅपल सिरप टाकून खात असाल किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये गोड फ्रूट सिरपचा वापर करत असाल तो कमी केला पाहिजे. कारण यामुळे तुमचे निरोगी शरीर डॅमेज होत आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही

फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स ऑफ द रॉयल सोसायटी बीमध्ये प्रकाशित एका नवीन अहवालानुसार, शरीरात फ्रुकटोजचे प्रमाण वाढल्यास लठ्ठपणा वाढवू शकतो. यामुळे लिव्हरची फॅट बर्न करण्याची क्षमता मंदावते. आहारातील ग्लुकोजचं प्रमाण लिव्हरचे फॅट बर्न करण्याचे कार्य करते, तर फ्रुकटोज शरीरात कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण वाढवण्यास चालना देते. यामुळे उपाशी पोटी फ्रुकटोज असलेले पदार्थ खाणे शरारीसाठी घातक ठरते.

फ्रुकटोज चयापचय ग्लुकोज चयापचयपेक्षा वेगळे

फळांमधून मिळणारे फ्रुकटोज हे निरोगी आहाराचा भाग असू शकते. आपण अनेकदा फळं खात नाही किंवा खाल्ली तर कमी प्रमाणात खातो, पण काही गोड पदार्थ्यांमधून फ्रुकटोज आपल्या शरीरात जाते, त्यावेळी ते आपल्या शरीरावर विपरित परिणाम करते.

विशेषत: कॉर्न सिरपमध्ये (एचएफसीएस) हाय फ्रुकटोज आढळते. ज्यामुळे वजन वाढणे आणि लठ्ठपणा वाढण्याची समस्या निर्माण होते. एचएफसीएस बहुतेकदा अशा पदार्थांमध्ये जोडले जाते, ज्यात चरबी किंवा साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.

फ्रुकटोज आणि ग्लुकोजमुळे होणारी शरीरातील चयापचय क्रिया वेगवेगळी आहे. ग्लुकोजमुळे संपूर्ण शरीरात चयापचय क्रिया सुरू असते, पण फ्रुकटोजमुळे प्रामुख्याने यकृतामध्ये चयापचय होते. यामुळे जास्त प्रमाणात फ्रुकटोज सेवन केल्याने यकृताचे कार्य बिघडते. अशाने फ्रुकटोजचे चरबीत रुपांतर होते, जे नंतर यकृतामध्ये तसेच ऍडिपोज टिश्यूमध्ये साठवले जाते.

दुसरं म्हणजे फ्रुकटोज सेवनाने ग्लुकोजच्या प्रमाणात इन्सुलिन स्राव उत्तेजित होत नाही. यामुळे लेप्टीनचे उत्पादन कमी होऊ शकते, हा मेंदूला तृप्तीचे संकेत देण्यासाठी जबाबदार हार्मोन आहे. परिणामी, जे लोक जास्त प्रमाणात फ्रुकटोज सेवन करतात त्यांना जेवणानंतर तितकेसे समाधान वाटत नाही, ज्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात खाते आणि जास्त कॅलरीजही सेवन करते.

फ्रुकटोजचे सेवन टाळण्यासाठी तुम्ही बेरी, लिंबूवर्गीय फळे आणि खरबूज यांसारखी फळं खा. तसेच पालेभाज्या, काकडी आणि भोपळी मिरची यांसारख्या भाज्या उत्तम मानल्या जातात. तृण धान्य, लीन प्रोटीनचा आहारात समावेश करा. हाय फ्रुकटोज कॉर्न सिरप खाणे टाळा. यात साखरयुक्त पेये, मिष्टान्न आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा वापर मर्यादित करा. आवश्यकता असल्यास नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

फ्रुकटोज पदार्थांपेक्षा संतुलित आहार खाणे एकंदर आरोग्यासाठी चांगले असते. कारण फ्रुकटोजचे सेवन भूक नियंत्रणाशी संबंधित हार्मोनलमध्ये अडथळा आणतात, यामुळे ग्रेलिनचा स्तर वाढू शकतो. हा एक संप्रेरक आहे, जो भूकेला उत्तेजित करतो, तर पेप्टाइड YY चे स्तर कमी करतो, जो परिपूर्णतेचे संकेत देतो. हा हार्मोनल असंतुलन अन्नाचा वापर वाढवण्यासाठी योगदान देऊ शकतो.

पाश्चात्य पदार्थ, भरपूर शर्करायुक्त पेये, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मिठाईत जास्त प्रमाणात फ्रुकटोज असते. जवळजवळ सर्व प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये फ्रुकटोजचा समावेश असतो. यामध्ये सोडा, गोड फळांचा रस, पॅकेट फूड, फ्रोजन जंक फूड्स, ब्रेड्स, कुकीज, एनर्जी ड्रिंक, जॅम आणि जेली, आइस्क्रीम काही ब्रेड आणि पेस्ट्री, मध, अ‍ॅगेव्ह सिरप, मॅपल-फ्लेव्हर सिरप, गुळ, पाम किंवा नारळापासून तयार केलेली साखर यांचा समावेश आहे.

फ्रक्टोज हा साखरेचा असा प्रकार आहे जो फळांपासून, भाज्यांपासून आणि काही नैसर्गिक गोड पदार्थांपासून तयार केला जातो. बाजारातील अनेक पदार्थांमध्ये फ्रक्टोजचं प्रमाण अधिक असते. केवळ फ्रुकटोजमुळेच लठ्ठपणाची समस्या वाढत नाही, तर इतर आहार आणि जीवनशैलीतील घटकांमुळेही ही समस्या अजून वाढतेय. यामुळे सार्वजनिक आरोग्य उपक्रमांनी जास्त प्रमाणात फ्रुकटोज सेवनाच्या जोखमींबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर आणि लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Story img Loader