Chia seeds health benefits: साखरेऐवजी गूळ घेतल्यास किंवा दररोज दोन लसूण पाकळ्या खाल्ल्यास शरीराचे काय होते हे समजून घेतल्यानंतर आम्ही दोन आठवडे दररोज चिया बिया खाल्ल्याने चयापचयावर काय परिणाम होतात हे शोधण्याचा प्रयत्न केला. गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केले की, दररोज एक चमचा चिया बिया तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ हे खरे आहे का? चिया बिया लहान असतात; पण पोषक घटकांनी भरलेल्या असतात. म्हणूनच बरेच लोक त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग म्हणून त्यांचे सेवन करतात. गुरुग्रामच्या मदरहूड हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ निशा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

दोन आठवडे चिया बिया खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

पचनशक्तीत सुधारणा

चिया बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर दररोज चिया बिया खाल्ल्याने तुमच्या आतड्यांच्या हालचाली नियंत्रित होण्यास मदत होते. मात्र, सोबतच जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायला नाहीत, तर ते पोटफुगीचे कारण बनू शकते.

दिवसभर ऊर्जा मिळण्यास हातभार

चिया बिया हळूहळू ऊर्जा सोडतात, ज्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय राहता. त्यात प्रथिने, निरोगी चरबी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे उर्जेची पातळी राखण्यास मदत करतात.

चांगले हायड्रेशन

चिया बियांच्या सेवनाने तुमचे शरीर जास्त काळ हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते. जर तुम्ही व्यायाम करीत असाल किंवा उष्ण हवामानात राहत असाल, तर हे सेवन उत्तम ठरते.

वजन नियंत्रण

चिया बियांच्या सेवनाने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जास्त खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, चिया बियांचेही जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात.

हृदय सशक्ततेकडे वाटचाल

चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयासाठी चांगले असते. नियमित सेवनाने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

त्वचा व केसांचे आरोग्य राखण्यास प्रोत्साहन

चिया बियाण्यांमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला वृद्धत्वापासून वाचवण्यास मदत करतात. ते मजबूत आणि चमकदार केसांनादेखील प्रोत्साहन देतात.

“दोन आठवडे चिया बिया खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. मात्र हे लक्षात ठेवा की, ते कमी प्रमाणात खाणे आणि भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी ते त्यांना स्मूदी, दही किंवा सॅलडमध्ये घालून देण्याचा प्रयत्न करा.