Constipation Remedies In Winter: दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळी पथ्य बाजूला ठेवून जीवाची मौज करायची असं तुम्ही ठरवलं असेल तर तुमच्या या प्लॅनला आणखी सोपं करण्यासाठी आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जर पोट स्वच्छ असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास नसेल तर आपल्याला खाताना सुद्धा मनसोक्त आनंद घेता येतो. खरंय ना? पण अलीकडे रोजच्या आयुष्यात काही चुकीच्या सवयींमुळे अनेकांना बद्धकोष्टतेचा त्रास असतो. थंडीच्या दिवसांमध्ये सतत तहान लागण्याचे प्रमाण असल्याने पुरेसे पाणीही प्यायले जात नाही त्यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो. आज आपण अशाच बद्धकोष्ठता त्रस्त मंडळींसाठी उपाय पाहणार आहोत.

शाश्वत आयुर्वेदाचे संचालक डॉ विकास वर्मा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की अनियमित पचनामुळे उद्भवणारी बद्धकोष्ठ ही अशी स्थिती आहे ज्यात आतड्याची पुरेशी हालचाल होत नसल्याने मल पुढे सरकण्यास त्रास होतो. यामुळे अस्वस्थता भासू शकते आणि व्यक्तीची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तीन टिप्स शेअर केल्या:

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी ३ मुख्य पदार्थ

  • जेवणानंतर गूळ आणि तूप
  • दुपारी 3-4 च्या दरम्यान खरबूज (उपलब्ध नसल्यास केळी)
  • तीळ (शक्यतो पोळी/भाकरीवर लावून सेवन करणे)

याविषयी सविस्तर माहिती देत डॉ वर्मा म्हणाले की, गुळ, हा अधिक फायबर असणारा पदार्थ आहे आणि त्यामुळे पचनाचा वेग वाढतो. “जेव्हा गुळामध्ये तूप घातलं जातं, तेव्हा हा कॉम्बो आतड्यांमध्ये वंगण म्हणून काम करू लागतो आणि आतड्यांच्या हालचाली सुलभ करण्यास मदत करतो. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप व थोडा गुळ एकत्र करून सेवन करावे.

दुसरीकडे, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई येथील आहारतज्ज्ञ आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. उषाकिरण सिसोदिया यांनी सांगितले की, मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी मात्र तूप आणि गुळ एकत्र खाणे टाळावे.

डॉ वर्मा यांच्या माहितीनुसार, आयुर्वेदानुसार पित्त दोष हा पचनाशी जोडलेला असतो आणि दुपारी ३ ते ४ या वेळेत शरीराचे चयापचय सक्रिय असते. खरबूज हा फायबर आणि हायड्रेट्सने समृद्ध असतो, म्हणूनच दुपारच्या जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटणाऱ्यांनी किंवा ३ ते ४ मध्ये थोडी भूक लागत असणाऱ्यांनी हा पर्याय नक्की निवडावा. कारण यामुळे शरीराला हायड्रेशन मिळतेच पण आतड्यांची हालचाल सुद्धा सुलभ होण्यास मदत होते.

तिसरा पर्याय म्हणजे तीळ. डॉ. वर्मा यांनी नमूद केले की “तिळातील फायबर, चांगले फॅट्स आणि महत्त्वपूर्ण खनिजे याला एक पौष्टिक पर्याय बनवतात. तुम्ही तुमच्या चपातीच्या पिठात तीळ घालू शकता किंवा खाण्यासाठी भाजून घेऊ शकता ”

बद्धकोष्ठता कमी करण्याचे अन्य मार्ग

त्रिफळा

अमलाकी (भारतीय गूजबेरी), बिभिताकी (बहेरा) आणि हरिताकी (चेनुलिक मायरोबालन) या तीन महत्त्वाच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे मिश्रण त्रिफळा म्हणून ओळखले जाते. “त्रिफळा आतड्याच्या हालचाली सुधारते, पचनसंस्था स्वच्छ करते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करते. तुम्ही झोपेच्या आधी एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यासह घेऊ शकता.

एरंडेल तेल

एरंडेल तेल नैसर्गिक फॅटी ऍसिडने समृद्ध आहे जे आतड्यांना वंगण घालते. तुम्ही सकाळी एक कप कोमट दुधात एरंडेल तेल घालून घेऊ शकता. तुमच्या आहारात एरंडेल तेल घालताना, आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

फ्लॅक्ससीड

फ्लॅक्ससीडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे मल मऊ होण्यास मदत करते नियमितपणे पचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही एक चमचा फ्लॅक्ससीड कोमट पाण्यात किंवा दह्यासह खाऊ शकता.

आल्याचा चहा किंवा कोरफड

डॉ वर्मा यांनी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात काही थेंब मधासह आल्याचे तुकडे घालून तयार केलेला चहा पिण्याची शिफारस केली.याशिवाय तुम्ही कोरफडीचा गर सुद्धा पाण्यात मिसळून सेवन करू शकता.

हे ही वाचा<< २१ वर्षीय तरुणीचा कॅफिनयुक्त लिंबू सरबताने मृत्यू! एनर्जी ड्रिंक तुमच्या शरीरात नेमके कोणते त्रास वाढवू शकतं?

दरम्यान, डॉ वर्मा यांनी अधोरेखित केले की “स्वतःहून कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. प्रत्येक शरीराचा प्रकार वेगळा असतो आणि अशा आयुर्वेदिक उपचारांच्या वापराने प्रत्येक शरीराची प्रतिक्रिया भिन्न येऊ शकते.