पूर्वीच्या काळी तुपाशिवाय चपाती खाल्ली जात नसे. शतकानुशतके भारतात तुपाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तुप लावलेली चपाती जेव्हा मसूराच्या डाळीबरोबर खाल्ली जात असे, तेव्हा त्यातून खूप सुंदर सुगंध येत असे. यामुळे मनही प्रसन्न व्हायचे. मात्र, आजच्या काळात इतर अनेक प्रकारच्या गोष्टींमुळे तुप खाण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले आहे. पूर्वी तूप शुद्ध असायचे, आजकाल तुपातही भेसळ वाढली आहे. पण, तुपाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उभा राहतो.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला तुपाचा वापर चपातीसोबत थोड्या प्रमाणात करत असाल तर त्यामुळे कोणतेही नुकासान होणार नाही उलट त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. काही लोकांनी तूप माफक प्रमाणात वापरल्यास त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो कारण जास्त प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास नुकासान होऊ शकते. त्यामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, की तुपाच्या सेवनामुळे कोणाला नुकसान होऊ शकते आणि कोणाला फायदा होऊ शकतो.
तुपाच्या सेवनामुळे कोणाचे नुकसान होणार नाही
न्युज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मॅक्स नानावटी हॉस्पिटलमधील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. रसिका माथूर सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असते. एखाद्यासाठी तूप फायदेशीर असू शकते आणि एखाद्यासाठी नुकसानदायक असू शकते. यासाठी प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य कसे आहे हे जाणून घ्याव लागते. जर व्यक्तीचे आरोग्य आधीच कमकुवत असेल तर त्याला तुपाचा फायदा होत नाही. दुसरीकडे, जर निरोगी व्यक्तीने तुप कमी प्रमाणात खाल्ले तर त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. अशा स्थितीत चपातीला तूप लावून कोणी खाल्ल्यास त्यांचे नुकसान होत नाही.
हेही वाचा : शहरातील प्रदुषणामुळे तुमचे केस खराब होतायेत का? ‘अशी’ घ्या काळजी, डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय
काय तुमचे वजन कमी होते
रसिका माथूर यांनी सांगितले की, ”वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना तूप मदत करते की नाही, याबाबत अॅलोपॅथमध्ये उल्लेख नाही. तुपाचे थोडेसे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते असे मानले जाते. तूप लावलेली चपाती सकाळी खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही. म्हणजेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. चपातीला तूप लावल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणखी कमी होतो. म्हणजेच यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होईल. निरोगी कोलेस्टेरॉल वाढवण्यासही तूप मदत करू शकते.
हेही वाचा : तासनतास मोबाईल, लॅपटॉप वापरून डोळ्यांवर ताण येतोय? ‘अशी’ घ्या काळजी
नुकसान काय आहे
डॉ.रसिका माथूर यांनी सांगितले की, तुपाच्या अतिसेवनानेही नुकसान होऊ शकते. जे लोक हृदयरोगी आहेत किंवा ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढले आहे त्यांनी जर तुपाचे सेवन जास्त केले तर ते जास्त नुकसान करू शकते. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही खूप उच्च तापमानात तूप ठेवता तेव्हा त्याची रचना बदलते, ज्यामुळे शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होतात. मुक्त रॅडिकल्सची निर्मिती म्हणजे अनेक रोगांचे घर असते म्हणूनच एक किंवा दोन चमच्यांपेक्षा जास्त तूप योग्य नाही.