भारतातील प्रत्येक घरात आल्याचा सर्रास वापर केला जातो. एक तर आल्याचा चहा किंवा भाजीमध्ये वापरण्यात येणारी आल्याची आणि लसणाची पेस्ट अशाप्रकारे आल्याचा आपल्या रोजच्या आहारात हमखास समावेश होतो. आल्यामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. सर्दी, खोकल्यासारख्या व्हायरल आजारांवर तर आल्याचा चहा रामबाण उपाय मानला जातो, कारण यामुळे घशात होणारी खवखव कमी होण्यास मदत मिळते. आले खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील, पण काही आजारांमध्ये आले खाणे धोकादायक ठरू शकते. कोणते आहेत ते आजार जाणून घ्या.

या आजारांमध्ये आले खाणे टाळा

आणखी वाचा: कच्ची केळी खाणे आरोग्यासाठी अशाप्रकारे ठरते फायदेशीर; लगेच जाणून घ्या

पचनक्रियेशी निगडित आजार
जर कोणाला पचनाची समस्या असेल किंवा पचनक्रियेशी निगडित काही आजार असतील तर अशा परिस्थितीत आले खाणे टाळावे. कारण आले खाल्ल्याने ते आजार बळावू शकतात. दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त आले खाल्ल्याने हार्टबर्न, डायरीया, सतत ढेकर येणे अशा समस्या येऊ शकतात.

ब्लीडिंगची समस्या
जर एखाद्या व्यक्तीची सर्जरी होणार असेल तर त्या व्यक्तीला त्याआधी किमान २ आठवडे आधी आलं न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण आले खालल्याने ब्लीडिंगची समस्या उद्भवते.

रक्तदाब कमी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी आले खाणे टाळावे
ज्या व्यक्तींना रक्तदाब कमी होण्याचा त्रास आहे, त्यांनी आले खाणे टाळावे. कारण जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्याची, अस्वस्थ वाटण्याची शक्यता असते.

आणखी वाचा: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण

त्वचेची किंवा डोळ्याची एलर्जी असणाऱ्यांनी टाळावे
त्वचेची किंवा डोळ्याची एलर्जी असणाऱ्यांनी आले खाणे टाळावे, आले खाल्ल्याने ही एलर्जी वाढू शकते. जेवणात किंवा वातावरणात बदल झाल्यास काही जणांना लगेच त्वचेची किंवा डोळ्यामध्ये एलर्जी होते, अशा व्यक्तींनी आले खाणे टाळावे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader