Sleep can get rid of bad memories: नकारात्मक आठवणी जेव्हा आपल्या मनात येतात, तेव्हा त्या खूप त्रासदायक ठरू शकतात, ज्यामुळे आपली मानसिक स्थिती खराब होऊ शकते आणि आपली विचारशक्ती कमी होऊ शकते. २०२४ मध्ये ‘Psychological and Cognitive Sciences’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जागे असताना सकारात्मक आठवणी आठवल्यामुळे माणसांमध्ये नकारात्मक भावना आणि डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते.
या अभ्यासात त्यांनी हे देखील सांगितलं की, झोपेत सकारात्मक आठवणी आणि आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मनातून नकारात्मक आठवणींना काढून टाकण्यात मदत करू शकतात. ह्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी indianexpress.com ने एका आरोग्यतज्ज्ञांशी संवाद साधला.
डॉ. पार्थ नागदा (कन्सल्टंट, सायक्रियाटिक, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई) यांनी सांगितले की झोप आपल्या वाईट आठवणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. “सर्वप्रथम स्मरणशक्ती आणि भावनिक प्रक्रिया मजबूत करण्यासाठी महत्त्वाची आहे. झोपेच्या जलद हालचालीच्या टप्प्यात भावनिक प्रक्रिया होते, ज्यामुळे कालांतराने नकारात्मक आठवणींचा प्रभाव कमी होतो,” असं ते म्हणाले.
डॉ. नागदा यांनी स्पष्ट केले की, ‘सिनॅप्टिक प्र्यूनिंग’ नावाची एक प्रक्रिया आहे, जी अनावश्यक नसलेल्या तांत्रिका मार्गांना कमी करून अनावश्यक विचार कमी करते. हे मेंदूला डिक्लटरिंग किंवा फॉरमॅटिंग करण्यास मदत करते. झोपेची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कोर्टिसोल या तणाव हार्मोनवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. स्वप्नंदेखील आपल्याला आपल्याच आठवणी कमी त्रासदायक पद्धतीने पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी सुरक्षित जागादेखील प्रदान करते.
त्यांच्या मते, एक किंवा दोन रात्रीची चांगली झोप आपला भावनिक त्रास कमी करू शकते. “साधारणपणे, झोपेच्या सवयी नियमित असाव्यात, जेणेकरून लांब काळासाठी सुधारणा दिसू शकतात. जर तुम्ही नियमित झोपेसोबत इतर जीवनशैलीतील बदल, जसे की व्यायाम, ध्यान, थेरपी किंवा औषधे यांचा समावेश केला तर चांगले परिणाम मिळू शकतात,” असे त्यांनी सुचवले.
डॉ. श्रेष्ठा गुप्ता (सहाय्यक प्राध्यापक, सफदरजंग हॉस्पिटल) यांनी सांगितले की, झोपेमुळे स्मृती मजबूत होण्यास, भावनिक प्रक्रिया होण्यास, मेंदूचा विकास होण्यास, तो जागृत होण्यास मदत होते. एकंदरीत REM झोप मजबूत रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे, जी पहाटे २-४ च्या सुमारास साध्य करता येते. या टप्प्यातील मेंदूच्या लहरी दुखापत दुरुस्त करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.