Tina Ahuja’s Weight Struggle: अभिनेता गोविंदाची मुलगी टीना आहुजाने २०१५ मध्ये ‘सेकंड हँड हसबंड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, पण हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. अलीकडेच तिने कर्ली टेल्सिला दिलेल्या एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीत ती डाएटिंग आणि बॉडी इमेजविषयी स्पष्टपणे बोलताना दिसली. तिने एक परिपूर्ण शरीर मिळविण्यासाठी कसे कठोर डाएट केले याविषयी सांगितले.

टीना सांगते, “मी प्रत्येक प्रकारचे डाएटिंग केले आहे. माझ्या किशोरावस्थेपासून माझ्याकडे एक न्युट्रिशनिस्ट होती. आलुच्या पराठ्यात ६००-७०० कॅलरी असतात, आलुचा पराठा खाण्याचा मी कोणालाही सल्ला देत नाही, मी फक्त ब्लॅक कॉफी घ्यायची. पण मी आता अशा टप्प्यावर आहे, जिथे मला आता खूप चांगले अन्न खायचे आहे. मी बेरी खाते, स्मूदी घेते, वर्कआउट करते, ग्रीन ज्युस पिते, नट्स खाते आणि आता मला खूप चांगली झोप येते.”

टीनाने वडील गोविंदाविषयीसुद्धा सांगितले. जेव्हा तिचे वजन वाढले होते तेव्हा तिच्या शरीरावर टीका केली जायची. जेव्हा तिला विचारले की, गोविंदा अजूनही तिच्यातील कमतरता तिला दाखवतो का, त्यावर ती म्हणाली, “आता नाही, तर माझ्या किशोरवयापासून हे चालू आहे. ते म्हणायचे ‘तू फिट राहा, चांगले दिसायला हवे; लठ्ठपणा, अनहेल्दी आहे, चांगले वाटत नाही.’

टीना पुढे सांगते, एकदा शिल्पा शेट्टीने तिला चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित केले होते. तिथे मला पाहिल्यानंतर तिला माझे वजन खूप वाढले आहे हे समजले. शिल्पा शेट्टीचे आभार मी मानते की त्यांनी मला स्क्रीनिंगसाठी आमंत्रित केले. मी नुकतीच लंडनहून सुट्टी घेऊन आली होती आणि मी स्वत:ला परी समजून गेले, पण त्यानंतर मला इन्स्टाग्रामवर एक टॅग दिसला आणि मला तेव्हा वाटले की मी खूप जाड झाले आहे.

टीना सांगते, “मी खूप जाड झाले आणि मला ते कळलेही नाही. मी व्यायाम करत नव्हती आणि खूप खात होती. मी आता वजन कसे कमी करावे यावर एक पुस्तक लिहू शकते. मला आता सर्व आरोग्यदायी ट्रिक्स आणि टिप्स माहीत आहेत.” तिची आई सुनीतासुद्धा तिला निरोगी राहण्यास मदत करते.

टिना आहुजाचा प्रवास वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक कोणत्या टोकाला जातात आणि याचा दीर्घकालीन आरोग्यावर कसा परिणाम होतो, याविषयी प्रश्न निर्माण होतात.

खूप जास्त प्रमाणात कॅलरीच्या सेवनावर निर्बंध लादल्याने दीर्घकालीन चयापचय क्रिया आणि एकूण आरोग्यावर कसा परिणाम होतो?

वरिष्ठ न्युट्रिशनिस्ट आश्लेषा जोशी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “कॅलरी सेवनावर जास्त निर्बंध लादल्याने हळू हळू मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रभाव दिसू शकतो. जेव्हा शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर पडतो. चयापचय क्रिया मंद झाल्याने वजन कमी करणे कठीण जाते. पोषक घटकाची कमतरता, थकवा आणि बिघडलेली दैनंदिन शारीरिक क्रिया यामुळे दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.”

ती पुढे सांगते की, कॅलरीच्या सेवनावर निर्बध घातल्याने आपण अनहेल्दी आहार घेतो. यामुळे शरीरासाठी पोषक नसलेल्या अन्नपदार्थाला प्रोत्साहन मिळते, यामुळे तणाव आणि एंग्झायटी इत्यादी समस्या आणखी वाढू शकतात. निराशा आणि स्वत:वर टीका करण्याचे एक चक्र निर्माण होते, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.

Quick-fix आहाराचा धोका

Quick-fix आहार म्हणजे जसे की पूर्णपणे कॉफीवर अवलंबून राहणे किंवा कमीत कमी जेवण करणे. “असा आहार शरीराला आवश्यक पोषक घटकांपासून दूर ठेवतो, ज्यामुळे स्नायूंची झीज होते, प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि हार्मोन्स असंतुलित होतात. याशिवाय असा आहार तणावाची पातळी वाढवू शकतात आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे जेवण केल्यानंतरसुद्धा व्यक्ती जास्त प्रमाणात खाऊ शकतो,” असे जोशी सांगतात.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दीर्घकाळ टिकणारा आणि संतुलित दृष्टिकोन कसा स्वीकारावा?

जोशी सांगतात, दीर्घकाळ टिकेल अशा दृष्टिकोनासाठी खाण्याच्या सवयींमध्ये हळूहळू बदल करा. यामध्ये विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि ऊर्जा टिकवून ठेवेल असे अन्नपदार्थ निवडा. आपण काय खातो यावर लक्ष केंद्रित केल्याने व्यक्तीला योग्य पोषक आणि संतुलित आहार घेता येतो.

Story img Loader