Food For High BP : उच्च रक्तदाबाची स्थिती हृदयासह मेंदूच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी औषध वेळेवर घेण्यासह आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. काही काळापुर्वी उच्च रक्तदाबाची समस्या केवळ जेष्ठ मंडळींमध्ये आढळून येत असे. परंतु आता युवा पिढीदेखील या आजाराला बळी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर सुरूवातीच्या काळात याची लक्षणे प्रभावीपणे दिसुन येत नाहीत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असते. यासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा जाणून घ्या.
केळी
बहुतांश सर्व घरात नाश्त्यामध्ये केळ्यांचा समावेश केला जातो. केळ्यांमध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे ४२२ मीलीग्रॅम पोटॅशियम आढळते अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते पोटॅशियम शरीराचे सोडियममुळे होणारे नुकसान कमी करून, रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते
पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. पालक, मेथी, कांद्याची पात यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
आणखी वाचा : Heart Attack येण्यापुर्वी महिलांमध्ये दिसतात ही १२ लक्षणं; वेळीच व्हा सावध
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट आढळते. या अँटिऑक्सिडंटमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
बेरी
ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे अँथोसायनिन अँटिऑक्सिडंट रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे यांचा रोजच्या डाएटमध्ये समावेश करणे फायदेशीर ठरेल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)