तूप हे भारतीय स्वयंपाकघरांमधील एक प्रमुख पदार्थ आहे. तुम्ही भातावर किंवा पराठ्यावर थोडेसे तूप लावू शकता किंवा तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकू शकता. नियमित तुपाच्या सेवनामुळे निरोगी फॅट्स देणे आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्याबाबत ते इतर अनेक फायदेही देतात. पण, तुपाचे सेवन किती प्रमाणात केले पाहिजे? किती चमचे तुपाचे सेवन केल्यास ते अतिसेवन ठरू शकते. याबाबत एका डिजिटल क्रिएटर आणि आतड्याचे आरोग्यतज्ज्ञ प्रशांत देसाई यांनी एका इन्स्टाग्राम रीलमध्ये खुलासा केला आहे की, “ते दिवसातून १६ चमचे तूप खातात, ज्यामुळे पोट भरलेले राहते, ग्लुकोजच्या वाढीस त्यामुळे प्रतिबंध होतो आणि चयापचयात लवचिकता येते. पोषणतज्ज्ञ हेतल छेडा यांनी कमेंटमध्ये नमूद केले आहे की, “ज्या दिवशी ते १६ चमचे तूप खातात, तेव्हा ते जाणून बुजून किंवा नकळत केटो दिनचर्या (कमी कार्बोहायड्रेट, जास्त फॅट्सयुक्त आहार घेणे ज्यामुळे शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी फॅट्सचा वापर करते) पाळतात आणि त्या दिवशी तूप (फॅट्स) हे शरीरात ऊर्जा तयार करते.”

१६ चमचे तूप खाणे सुरक्षित आहे की नाही आणि त्याशी संबंधित आरोग्य धोके जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने पोषणतज्ज्ञाशी संवाद साधला

Protein Digestion
तुमचे शरीर प्रथिने पचवू शकत नाही? तज्ज्ञांनी सांगितली पाच लक्षणे…
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
_sex parties at davos
सेक्स पार्टी अन् नऊ कोटींमध्ये मुलींची बुकिंग; दावोस परिषदेदरम्यानचा धक्कादायक अहवाल समोर, प्रकरण काय?
Anjali Damania Post About Dhanajay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांची पोस्ट, “माझा आणि अजित पवारांचा ३६ चा आकडा आहे, पण धनंजय मुंडे….”
Torres Scam
Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई

“तुपाचे संभाव्य फायदे असले तरी दिवसातून १६ चमचे सेवन करणे हे एक महत्त्वपूर्ण प्रमाण आहे. कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण विचारात घेणे महत्त्वाचे आहे. तुपात सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयरोगास कारणीभूत ठरू शकते,” असे क्लिनिकल आहारतज्ज्ञ सना शेख म्हणाल्या.

“जरी तूप हे उच्च फॅट्सयुक्त आणि कमी कार्बोहायड्रेट घटकांमुळे केटो-फ्रेंडली अन्न आहे, तरीही दिवसातून १६ चमचे सेवन करणे हे प्रमाण जास्त आहे. या प्रमाणात कॅलरीज आणि फॅट्सचे अतिसेवन होऊ शकते, ज्यामुळे केटोजेनिक आहाराचे फायदे कमी होऊ शकतात,” असे त्या पुढे म्हणाल्या.

तुपाला तुमच्या नियमित आहाराचा समावेश करण्याचे फायदे सांगताना शेख यांनी नमूद केले की, “ते जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के, तसेच दृष्टी, हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती यासह विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या आवश्यक फॅटी ॲसिडने समृद्ध आहे. त्याचे दाहकविरोधी गुणधर्म हृदयरोग आणि संधिवातसारखे दीर्घकाळ टिकणारे आजार कमी करण्यास मदत करतात.

शेख यांच्या मते पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींमध्ये पचन सुधारण्यासाठी तुपाचा वापर बराच काळ केला जात आहे; कारण ते पचनसंस्थेला शांत करण्यास आणि पोषक तत्वांचे योग्य शोषण करण्यास मदत करते असे मानले जाते.

तुम्ही दररोज किती तूप सेवन करावे? (How much ghee should you consume on a daily basis?)

शेख यांनी सांगितले की, “बहुतेक आरोग्यतज्ज्ञ दररोज तुपाचे सेवन १-२ चमचे मर्यादित ठेवण्याचा सल्ला देतात आणि तुमच्या विशिष्ट गरजा एकूण आहार, व्यायाम पातळी आणि आरोग्य स्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून बदलू शकतात.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केटो आहार घेतानादेखील संयम महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीबद्दल किंवा इतर आरोग्य स्थितींबद्दल चिंता वाटत असेल तर वैयक्तिक मार्गदर्शनासाठी नोंदणीकृत आहारतज्ज्ञ किंवा आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घेणे योग्य आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.

Story img Loader