तूप हे भारतीय स्वयंपाकघरांमधील एक प्रमुख पदार्थ आहे. तुम्ही भातावर किंवा पराठ्यावर थोडेसे तूप लावू शकता किंवा तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकू शकता. नियमित तुपाच्या सेवनामुळे निरोगी फॅट्स देणे आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्याबाबत ते इतर अनेक फायदेही देतात. पण, तुपाचे सेवन किती प्रमाणात केले पाहिजे? किती चमचे तुपाचे सेवन केल्यास ते अतिसेवन ठरू शकते. याबाबत एका डिजिटल क्रिएटर आणि आतड्याचे आरोग्यतज्ज्ञ प्रशांत देसाई यांनी एका इन्स्टाग्राम रीलमध्ये खुलासा केला आहे की, “ते दिवसातून १६ चमचे तूप खातात, ज्यामुळे पोट भरलेले राहते, ग्लुकोजच्या वाढीस त्यामुळे प्रतिबंध होतो आणि चयापचयात लवचिकता येते. पोषणतज्ज्ञ हेतल छेडा यांनी कमेंटमध्ये नमूद केले आहे की, “ज्या दिवशी ते १६ चमचे तूप खातात, तेव्हा ते जाणून बुजून किंवा नकळत केटो दिनचर्या (कमी कार्बोहायड्रेट, जास्त फॅट्सयुक्त आहार घेणे ज्यामुळे शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी फॅट्सचा वापर करते) पाळतात आणि त्या दिवशी तूप (फॅट्स) हे शरीरात ऊर्जा तयार करते.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा