H3N2 विषाणू हा इन्प्लूएंझा A च्या H1N1 च्या म्युटेट व्हेरिंएट प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी H1N1 व्हायरसचा प्रसार झाला. H3N2 त्याचा बदलेला प्रकार आहे. हा एक सामान्य इन्फ्लूएंझा स्ट्रेन आहे. हा व्हायरस कोविड प्रमाणेच पसरतो. दरम्यान अचानक रुग्ण वाढले असून देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. सीडीसीच्या मते, या विषाणूची लक्षणे इतर कोणत्याही साधारण आजारासारखी असू शकतात, ज्यामध्ये खोकला, नाक वाहणे, मळमळ, अंगदुखी, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश असू शकतो. H3N2 हा विषाणू पहिल्यांदा 2010 मध्ये डुकरांमध्ये आढळून आला होता. त्यानंतर 2011 मध्ये पहिल्यांदा लोकांमध्ये आढळला होता. इन्फ्लूएंझाचा H3N2 स्ट्रेन डुकरांपासून मानवांमध्ये आणि मानवाकडून डुकरांमध्ये पसरू शकतो. हा विषाणू मुख्यतः खोकताना आणि शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे दुसर्‍या व्यक्तीला संक्रमित करतो. संक्रमित पृष्ठभाग किंवा विष्ठेच्या संपर्कातून देखील हा व्हायरस पसरू शकतो. दरम्यान यावर्षी या विषाणूचा भारतात वेगाने प्रसार होतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे.

आजकाल डीएनए विषाणू असलेल्या एडेनोव्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. याचा विशेषतः ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, गरोदर स्त्रिया, ५ वर्षांपेक्षा लहान मुलांवर परिणाम होत आहे. तसेच दमा, मधुमेह, हृदयविकार, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं –

तज्ञांच्या मते खोकला, नाक वाहणे आणि उच्च ताप, अंग दुखणे, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही फ्लूची सामान्य लक्षणे आहेत.

H3N2 विषाणूपासून संरक्षण कसं कराल ?

  • बाहेर पडताना मास्क वापरा.
  • हातांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
  • आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
  • प्लूवरील वार्षिक लस घ्या.

H3N2 विषाणूवरील उपचार –


H3N2 विषाणू असलेल्या मुलांवर आणि प्रौढांवर ओसेल्टामिविर, झानामिविर, पेरामिविर आणि बालोक्सावीर या औषधांनी उपचार केले जाऊ शकतात, मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी अँटीव्हायरल औषध लिहून दिलं, तर त्याचं सेवन डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेणं गरजेचं आहे.

Story img Loader