प्रदुषण ही सध्या सर्व जगासाठी मोठी समस्या ठरत आहे. प्रदुषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहे त्याचबरोबर वाढत्या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम देखील समोर येत आहे. हे दुप्षरिणाम टाळण्यासाठी आपण त्वचेची किंवा चेहऱ्याची काळजी घेतो पण आपल्या केसांची काळजी घ्यायला मात्र आपण विसरतो. शहरांमधील वायू प्रदूषणामुळे आपल्या केसांना हानी पोहोचते आणि आपल्या टाळूवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. “हवेतील प्रदूषक जसे की सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि पार्टिक्युलेट घटक टाळू आणि केसांवर जमा होऊ शकतात ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे आणि कोंडा या समस्या होतात. हे केसांच्या कूपांना बंद करू शकतात ज्यामुळे केस पातळ होतात आणि केस गळतात,” डॉ श्रव्या सी टिपरनेनी, त्वचाशास्त्रज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्ट म्हणतात.

”हवेतील रसायनांमुळे ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे केस निस्तेज होऊ शकतात आणि केस पांढरे होऊ शकतात, असे त्वचाशास्त्रज्ञ डॉ शिबानी भाटिया यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले.

Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

तुमच्या केसांवर वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल उपाय वापरू शकता.

तुमचा टाळू स्वच्छ करा :

हवेतील प्रदुषकांमुळे तुमची टाळू आणि केस तेलकट होऊ शकतात. तसेच कोंड्याची समस्या देखील होऊ शकते. सॅलिसिलिक अॅसिड आणि सल्फेट मुक्त अशा चांगल्या शँपूची निवड करा. तुमचे केस नियमित धूवा आणि घाम, तेलकटपणा आणि धूळ काढून टाकून टाळू स्वच्छ करा. तुम्ही आठवड्यातून एकदा शॅम्पू वापरून टाळू स्वच्छ करू शकता.

केसांना कंडिशनर लावा :

उष्णता आणि प्रदुषणामुळे केस त्यांचा नैसर्गिक ओलावा गमावतात त्यामुळे तुमच्या केसांना कंडिशनर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. आठवड्यातून किमान एकदा तरी हे करा ज्यामुळे तुमचे केस निरोगी राहतील.

केसांना झाकून ठेवा :

जर तुम्ही प्रवास करत असाल तर विशेषत: दुचाकीने तर तुमच्या केसांना स्कार्फ किंवा कॅपने झाका. सतत धुळ आणि वाऱ्याच्या संपर्कात राहिल्यास तुमचे केस रुक्ष होऊ शकतात.

हेही वाचा : तासनतास मोबाईल, लॅपटॉप वापरून डोळ्यांवर ताण येतोय? ‘अशी’ घ्या काळजी

कोलेजन:

केस केराटिन आणि अमीनो ऍसिडपासून बनलेले असतात. कोलेजन सप्लिमेंटचा तुमच्या दिनचर्येत समावेश करणे फायदेशीर ठरू शकते कारण वायू प्रदूषणामुळे तुमच्या केसांना फ्री रॅडिकल नुकसान होऊ शकते.

अँटिऑक्सिडंट्स:

व्हिटॅमिन सी आणि ई सारखी अँटिऑक्सिडंट्स असलेली उत्पादने तुमच्या आहारात समाविष्ट करून प्रदूषणामुळे तुमच्या केसांना येणारा ऑक्सिडेटिव्ह ताण तटस्थ करा.

हेही वाचा : उष्णतेच्या लाटेचा सामना करताना ‘या’ पदार्थांचे करा सेवन, डॉक्टरांकडून जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे

क्लीनिंग मास्क किंवा स्क्रब:

१०-१५ दिवसांतून एकदा चांगला एक्सफोलिएटिंग स्क्रब किंवा हेअर मास्क, तुमच्या टाळूतील छिद्रांना ब्लॉक करणारे प्रदूषक काढून टाकेल. ते दररोज वापरू नका कारण ते तुमचे केस कोरडे करू शकतात.

जर तुमच्या केसांचे नुकसान होत असेल पण कारण समजत नसेल तर हवेतील प्रदूषक हे कारण असू शकते. तुमचे केस निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.