Hair Perfume Benefits : तुमच्यापैकी अनेक महिलांना वाटते की, आपलेही लांबसडक, घनदाट केस असावेत. अशावेळी केसांची निगा राखण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महिला वेगवेगळे उपाय करत असतात. यात अनेक महिला केसांना घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी हेअर परफ्यूम किंवा हेअर सिरमचा वापर करतात. विशेषत: कोणत्याही कार्यक्रमानिमित्त बाहेर जाताना हेअर सिरम किंवा हेअर परफ्यूम वापरला जातो. त्यामुळे हल्ली अनेक महिलांच्या मेकअप किटमध्ये तुम्हाला आता असे सुगंधित हेअर परफ्यूमदेखील पाहायला मिळतात.

यामुळे हल्ली बाजारातही विविध ब्रँड्सचे हेअर परफ्यूम पाहायला मिळतात. यातील काही ब्रँड्स केसांना खूपवेळा सुगंधित ठेवण्याचे वचन देतात. परंतु, आपण नियमित कपड्यांवर वापरत असलेले परफ्यूम हे त्वचेसाठी त्रासदायक असतात अशी चर्चा रंगते. अशावेळी केसांचे परफ्यूम केसांच्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असतात का? किंवा यामुळे केसांचे काही नुकसान तर होत नाही ना, अशी चर्चा रंगतेय.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?

याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हेअरकेअर तज्ज्ञांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे, ती आपण जाणून घेऊ. यात त्यांनी केसांची कोणतीही काळजी न करता तुम्ही नियमितपणे हेअर परफ्यूम वापरू शकता की नाही हे सांगितले आहे.

यावर आयना क्लिनिक्सच्या संस्थापिका, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सिमल सोईन म्हणाल्या की, नाजूक सुगंध, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांनी युक्त असे हेअर परफ्यूम पोषक एजंट म्हणून कार्य करतात, ज्यामुळे कडक उन्हातही केस सुगंधी आणि फ्रेश ठेवण्यास मदत होते.

हेअर परफ्यूम केसांसाठी हानिकारक आहेत का?

केसांसाठी हानिकारक असलेल्या उत्पादनांच्या वापराबाबत बरेच वादविवाद झाले आहेत, विशेषत: जेव्हा काळजी घेण्यासंबंधित उत्पादने असतात. पण, हेअर परफ्यूम तुमच्या केसांसाठी खरोखर उत्तम मानले जातात, कारण ते पौष्टिक घटकांसह तयार केले जातात. तसेच हे परफ्यूम सहसा वॉटरबेस असतात. तुम्ही हे परफ्यूम वापरल्यानंतर काही मिनिटांत ते अल्कोहोल बेस तर नाही ना याची खात्री करू शकता. जर अल्कोहोल बेस असेल तर वापरल्यानंतर तुमचे केस काही मिनिटांत कोरडे दिसू लागतील.

हे हेअर परफ्यूम सर्व प्रकारच्या केसांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत, ते तेलकट केसांना ताजेतवाने करण्याचे तसेच कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना पोषण देण्याचे काम करतात.

डॉ. सिमल सोईन म्हणाले की, हेअर परफ्यूम सर्व प्रकारच्या केसांसाठी पूर्णपणे सुरक्षित असले तरी तुम्हाला शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा त्याऐवजी तुम्बी तेल, हेअर मिस्ट किंवा सिरम हे पर्याय निवडा.

तुम्ही नेहमी विविध प्रकारच्या सुगंधित तेलाचाही वापर करून पाहू शकता, कारण अशाप्रकारचे तेल नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात; ज्यामुळे केसांना अतिशय सौम्य आणि जैविक सुगंध मिळतो. तसेच, घरगुती हेअर मिस्ट हे केमिकलयुक्त उत्पादनांवर विसंबून न राहता केसांना ताजे सुगंधित ठेवण्यासाठी चांगला पर्याय आहे.

यात हेअर सीरमदेखील सुगंध आणि पोषण यांचे परिपूर्ण संयोजन आहेत, ज्यामुळे तुमच्या केसांची मुळे निरोगी ठेवता येतात.

हेअर परफ्यूम निवडताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

हेअर परफ्यूम निवडणे हा नक्कीच एक व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे. पण, तुमच्या केसांची रचना आणि प्रकार पाहून त्यानुसार हेअर परफ्यूम निवडणे फायद्याचे असेल, असा सल्ला डॉ. सिमल सोईन यांनी दिला.

हेअर परफ्यूम निवडताना नेहमी अनुकूल फॉर्म्युलेशन आणि अल्कोहोल फ्री सुगंधांसह येणारे परफ्यूम निवडता. कारण अशा हेअर परफ्यूममध्ये नैसर्गिकरित्या हायड्रेटिंग घटक असतात.

कोणतीही अॅलर्जी किंवा गंभीर नुकसान टाळण्यासाठी पॅच चाचणी घेणे नेहमीच शहाणपणाचे असते. यासाठी आधी तुम्ही तुमच्या केसांमध्ये कोणती जखम, अॅलर्जी तर नाही ना याची खात्री करा. यानंतर तुम्ही विकत घेत असलेल्या हेअर परफ्यूमवरील ग्राहकांचे रिव्ह्यू वाचा. यात तुम्हाला हे परफ्यूम खरंच फायदेशीर आहे ना, याच्या वापरामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही ना याची माहिती मिळेल.

यानंतरही तुम्हाला हेअर परफ्यूमसंदर्भात काही प्रश्न असल्यास तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांची मदत घ्या. कारण ते तुम्हाला योग्य हेअर परफ्यूम निवडण्यास मदत करू शकतात.

Story img Loader