Hair serums demystified: आताशा बहुधा केस गळण्याची समस्या तिशी, चाळिशीनंतर सर्वाधिक प्रमाणात उद्भवताना दिसते. खाण्यापिण्यातील बदल आणि अनियमितता यांमुळे कमी वयातच केस गळण्याची समस्या लोकांना त्रस्त करीत आहे. केसगळती थांबवून, केसांच्या वाढीसाठी नवीन तेले, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. काही जण केस गळू नये म्हणून कंगवासुद्धा बदलतात. महिलांमध्ये लाकडाच्या कंगव्यांची क्रेझ आहे. केस जास्त गळू नयेत यासाठी अनेक जणी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात; पण त्याचा हवा तसा परिणाम दिसून येत नाही. हेअर केअर उत्पादनांमध्ये हेअर सीरमसुद्धा असते. मात्र कोणते सीरम वापरावे हे बऱ्याचदा कळत नाही. या संदर्भात त्वचाविज्ञानी व स्किन बियॉण्ड बॉर्डर्सचे सह-संस्थापक डॉ. प्रवीण बानोडकर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेअर सीरमचा वापर कोणीही करू शकते. फक्त तुमच्या केसांच्या गरजेनुसार कोणते हेअर सीरम चांगले असेल हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. ते समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटीशियनची मदत घेऊ शकता. कारण- कोरड्या केसांसाठी मॉइश्चरायझिंग सीरम असते आणि तेलकट केसांसाठी विविध प्रकारचे न्युट्रिशनिंग सीरम उपलब्ध असते. हेअर सीरम नेहमी स्वच्छ केसांमध्ये वापरावे. डॉक्टर बानोदकर यांच्या मते, बाजारात उपस्थित असलेले अँटी-फ्रिज सीरम आर्द्रतेपासून संरक्षण करण्यास मदत करते आणि कुरळे, लहरी किंवा अगदी कुरळे केस असलेल्यांसाठी ते उत्तम आहे. “कोरडे केस असलेल्या लोकांनी स्किनकेअरमध्ये हायड्रेटिंग सीरम शोधले पाहिजेत. ते थंड हवामानामुळे होणाऱ्या कोरडेपणाचा यशस्वीपणे सामना करताना ओलावा रोखण्यास मदत करते,” असे डॉक्टर बानोदकर यांनी स्पष्ट केले आहे.

तर ज्यांचे केस सुळसुळीत आहेत त्यांच्यासाठी व्हॉल्युमायजिंग सीरमची शिफारस त्यांनी केली आहे. केसांना अतिरिक्त व्हॉल्यूम देण्यामध्ये हे सीरम सर्वोत्तम भूमिका बजावू शकते. “जर तुमचे केस खराब झाले असतील, तर बॉण्ड रिपेअरिंग सीरम तुमचे खराब झालेले केस मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते,” असेही डॉ. बानोदकर यांनी सांगितले.

हिवाळ्यात वापरण्यासाठी सर्वात चांगले सीरम कोणते आहेत?

हिवाळ्यात तापमान कमी होते आणि आर्द्रतेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे केस आणि टाळू दोन्हीमध्ये कोरडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या केसांचे जास्त नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉ. बानोदकर यांनी हायड्रेटिंग हेअर सीरम वापरण्याची शिफारस केली. कारण ते जास्त कोरडेपणा आणि खडबडीतपणा टाळून आर्द्रता राखण्यास मदत करतात. ते म्हणाले, “हे सीरम संरक्षक कवच म्हणून काम करते आणि कठोर पर्यावरणीय परिस्थितीपासून केसांचे रक्षण करते.” त्यांनी पुढे बजावून सांगितले, “जेव्हा शंका असेल, तेव्हा तुमच्या केसांचा प्रकार आणि चिंतांसाठी सर्वांत योग्य सीरम शोधण्यासाठी नेहमी त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्या.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair serums demystified guide to help you choose one based on your hair type which hair serum for hair growth srk