How To Get Rid Of Phlegm/Cough: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरल्यापासूनच आजार सुद्धा डोकं वर काढतायत. जिथे पाहावं तिथे सर्दी, खोकला, ताप, कफ झाल्याच्या तक्रारी करणारे रुग्ण दिसतायत. डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर तर पेशंट्सच्या रांगा दिसू लागल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी अगदी गंभीर स्थिती नसल्यास किंवा काही जुनाट आजार नसल्यास आपण प्रथमोपचार म्हणून काही घरगुती उपाय करू शकतात. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी कफ झाल्यास करायचे चार उपाय सुचवले आहेत. हे उपाय खरोखरच आपल्या कामी येऊ शकतात का? याविषयी आज आपण तज्ज्ञांचे मत सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग सर्वात आधी कफ मोकळा करणारे उपाय पाहूया..

१) एका इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये सद्गुरू यांनी, सर्वप्रथम दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
पायातील रक्तवाहिन्यांचे आजार, अशी घ्या काळजी
Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय”, शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कोणतं इंजेक्शन…”
Chaurai Devi Mandir | Trekking point located at hill near Somatane Talegaon Dabhade | pimpri chinchwad
Pune Video : पिंपरी चिंचवडपासून २० किमीवर डोंगरावर स्थित असलेले देवीचे हे सुंदर मंदिर पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
फिश्टूला म्हणजे काय? लक्षणे आणि उपचार काय ?
त्रासदायक कोरडा खोकला!

२) तसेच कपालभाती सारख्या प्राणायामाच्या नियमित सरावाने सुद्धा कफ नैसर्गिकरीत्या काढून टाकू शकता.

३) तिसरा उपाय म्हणजे १० ते १२ काळी मिरीचे दाणे मधात भिजवून ठेवा, पावडर करू नका पण वाटल्यास जाडी भरड काढून घ्या. रात्रभर ८ ते १२ तास मिरी व मधाचे मिश्रण तसेच ठेवा व सकाळी चावून खा.

४) चौथा व शेवटचा उपाय म्हणजे हळद. सद्गुरू सांगतात की, “जर तुम्हाला दमा, सायनस किंवा श्लेष्माशी संबंधित आजार असतील तर तुम्ही हळद खाऊन कफ कमी करू शकता, विशेषत: मिरपूड, कडुलिंब, ओव्याची पानं हळदीसह मिसळून आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या स्वरूपात खाऊ शकता.”

कफ म्हणजे काय?

डॉ रेणू सोनी, एमडी, सल्लागार, पल्मोनोलॉजिस्ट, NIIMS मेडिकल कॉलेज, ग्रेटर नोएडा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, श्वसनमार्गात जमा होणारा श्लेष्म म्हणजे कफ. जाड, चिकट श्लेष्म, पाणी, पेशी व श्वास घेताना शरीरात प्रवेश केलेल्या धुळीच्या कणांपासून कफ तयार होतो. रोगजनक बॅक्टेरिया किंवा धुळीचे कण पकडून ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी हा कफ एक माध्यम ठरतो. या बॅक्टेरियाचे शरीरात वाढलेले संक्रमण, ऍलर्जी अशा गोष्टींमुळे कफ तयार होण्याचं प्रमाणही वाढते. ज्यामुळे खोकला किंवा कंजेशन (रक्तसंचय) असे त्रास वाढतात.

सद्गुरू यांनी सांगितलेले उपाय खरंच काम करतात का?

NIIMS मेडिकल कॉलेज, ग्रेटर नोएडा येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ सोनी, यांनी सद्गुरू यांनी सांगितलेल्या उपायांचे फायदे अधोरेखित केले आहेत. डॉ सोनी सांगतात की,

१) कफ कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ टाळावे. कारण श्लेष्माचे उत्पादन वाढवण्यासाठी किंवा अगोदरच श्वास नलिकेत साचलेला कफ घट्ट करण्यासाठी दूध कारणीभूत ठरू शकते. यामुळे घशात अस्वस्थता (खवखव) जाणवू शकते. दुधाचे सेवन कमी केल्याने संबंधित लक्षणे कमी होऊ शकतात.

२) मिरपूड/काळी मिरी, ही ‘कफनाशक गुणधर्मासाठी’ ओळखली जाते. काळ्या मिरीयामध्ये पाइपरिनसारखी संयुगे असतात जी श्लेष्मा पातळ करण्यास मदत करतात आणि श्वसनमार्गातून कफ बाहेर काढण्यास मदत करतात.

३) प्राणायाम करताना नियंत्रित श्वासोच्छवासाचा सराव करावा लागतो. यामुळे फुफ्फुसाची क्षमता सुधारून, श्वसनाच्या स्नायूंची ताकद वाढते. ऑक्सिजनचा पुरवठा वाढून कफ निघून जाण्यास मदत होऊ शकते. कपालभाती आणि भस्त्रिका या तंत्रांनी दीर्घ श्वास घेतला जातो ज्यामुळे अतिरिक्त श्लेष्म बाहेर काढण्यास मदत होते. याची एकूणच श्वसन आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

४) हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे श्लेष्माचे उत्पादन व खोकला कमी करण्यास मदत करू शकतात.

हे ही वाचा<< ‘मुंज्या’तील पम्मी म्हणजे मोना सिंगने १५ किलो वजन कमी वेळात घटवलं! वजन कमी करताना व्यायाम व झोप किती असावी? डॉक्टरांकडून ऐका

डॉ. सोनी यांनी खालील उपाय देखील सांगितले आहेत, जसे की..

  • हायड्रेटेड रहा: श्लेष्मल पातळ करण्यासाठी पाणी, हर्बल टी किंवा मटणाचा कोमट रस्सा/ सूप अशा द्रवपदार्थांचे सेवन करा
  • वाफ घ्या: गरम पाण्यातून किंवा शॉवर दरम्यान वाफ घेतल्याने नाक चोंदण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या: कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा खवखवणे कमी होते व कफ बाहेर पडतो.
  • ह्युमिडिफायरचा वापर: ह्युमिडिफायर वापरल्याने हवेत आर्द्रता वाढते, अनुनासिक परिच्छेद ओलसर राहतो आणि कफ कमी उत्पादित होतो.
  • सिगारेटचा धूर, उग्र गंध आणि इतर त्रासदायक पदार्थांपासून दूर रहा
  • संतुलित आहार ठेवा, नियमित व्यायाम करा आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यावर भर द्या.

यानंतरही त्रास कमी न झाल्यास आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.